शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

'एक हात मदतीचा'! संकटात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सरसावल्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:26 IST

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात विविध पातळीवर होत असलेली मदत ही शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरत आहे.

- संतोष वीरभूम (धाराशिव) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने नदीकाठी राहणाऱ्या शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या शेतात, गोठ्यात व घरात पाणी घुसल्याने शेतीसह पशुधन वाहून गेले, तर घरातले अन्नधान्य ही पाणी घरात शिरल्याने भिजून खराब झाले होते. या गंभीर परिस्थितीत नागरिकांपुढे खाण्या-पिण्याचे संकट उभे राहिले होते. यामुळे या संकटसमयी अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी एक हात मदतीचा पुढे करत दिलासा दिला.

यामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी मात्रे वाडीतील लक्ष्मण पवार या शेतकऱ्याने अतिवृष्टीमध्ये जमीन वाहून गेल्याने व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे या विवेचनेतून व नुकसानीमुळे हताश होऊन आपले जीवन संपवले होते, त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बेलगाव व पिंपळगाव येथे अडीचशे बॉक्स पिण्याचे पाण्याचे, तसेच साडेसांघवी येथे ३५ खाण्यापिण्याच्या किट्स वाटप करून ग्रामस्थांना तातडीचा दिलासा दिला आहे.

याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रानबागुल यांनी परंडा तालुक्यातील देवगाव येथे ४०, माणकेश्वर येथे ४५, साडेसांगवी येथे ३५, तसेच नवलगाव येथे १५ किट्स खाण्यापिण्याच्या वाटप केल्या. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे जनावरे पुरात वाहून गेली आहेत, त्यांनाही त्यांनी आर्थिक मदत देत आधार दिला आहे.

दरम्यान, पिंपळगाव येथील शेतकरी आत्माराम दातखिळे यांच्या गोठ्यातील तब्बल १७ गायी पुराच्या प्रवाहात जागीच दगावल्या तर तर १० गायी वाहून गेल्या होत्या . या प्रचंड नुकसानीमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. याची दखल घेत राष्ट्रवादीचे नेते प्रतापसिंह पाटील यांनी आमदार रोहित पवारांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यासोबतच उमेशराजे निंबाळकर यांनीही १० हजार रुपयांची मदत देऊन या कुटुंबाला आधार दिला आहे.

यामुळे पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात विविध पातळीवर होत असलेली मदत ही शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरत आहे. नागरिकांनीही या मदत कार्याचे स्वागत केले असून, “संकटाच्या काळात मिळणारा हा हातभार खऱ्या अर्थाने आधार ठरत आहे,” अशा भावना नुकसान ग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Helping Hand: Leaders Aid Flood Victims in Dharashiv District

Web Summary : Political and social workers are providing relief to flood-affected people in Dharashiv. Aid includes financial assistance, food kits, and water, offering crucial support during this crisis. Leaders stepped up after heavy rain caused significant damage.
टॅग्स :dharashivधाराशिवRainपाऊसfloodपूर