The three, including the young girl, took poison and ended their lives | धक्कादायक! तरुणीसह तिघांनी घेतला विषाचा घोट अन् संपवले जीवन 

धक्कादायक! तरुणीसह तिघांनी घेतला विषाचा घोट अन् संपवले जीवन 

ठळक मुद्देवाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे वासुदेव गुलाबराव थोटे (वय ४७) यांनी १२ ऑगस्टला विष प्राशन केले.

नागपूर : पारडी येथील एका तरुणीसह तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारडी पूनापुर मार्गावरील शाम नगरात राहणारी कल्पना विनोद भारद्वाज (वय २२) हिने ८ ऑगस्टच्या सकाळी विष प्राशन केले. उपचारासाठी तिला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी सकाळी ५.२५ च्या सुमारास डॉक्टरांनी कल्पनाला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून पारडीचे हवलदार बाळकृष्ण धुर्वे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.


वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे वासुदेव गुलाबराव थोटे (वय ४७) यांनी १२ ऑगस्टला विष प्राशन केले. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. इमामवाडा बारा सिंगल परिसरात राहणारे मनोज काशिनाथ बसेला (वय ५३) यांनी ६ ऑगस्टला विष घेतले होते. त्यांना मेडिकल मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

 

Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

 

स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

Web Title: The three, including the young girl, took poison and ended their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.