Sushant Singh Rajput Suicide : Evidence found in ED's hands, Sandeep Singh's interrogation can now take place by ED | Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

ठळक मुद्देआता सुशांतचा मित्र संदीप सिंग याची देखील ईडी चौकशी करू शकते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. संपूर्ण बॉलिवूड जग हादरून गेले आहे. अलीकडे सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती यांच्यासह 6 जणांविरूद्ध एफआयआर दाखल केला. ते म्हणाले की, रियाने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यांचे पैसे गायब झाले आणि त्यांना कुटुंबापासून वेगळे केले. हे प्रकरण आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीबीआयने रिया आणि 6 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. तपास सुरू झाला आहे. आता सुशांतचा मित्र संदीप सिंग याची देखील ईडी चौकशी करू शकते.

ताज्या माहितीनुसार, ईडीच्या हाती एक बँक स्टेटमेंट लागली आहे. ज्यामध्ये संदीप सिंग आणि सुशांत यांच्यात पैशाचा व्यवहार झाला होता. संदीप सिंग सुशांतचा जवळचा मित्र होता. त्यांनी 14 जून रोजी सर्व औपचारिकता पूर्ण केली. अलीकडेच एका वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणात सुशांतची मैत्रीण स्मिता पारीख म्हणाली की, संदीपला कुटूंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही. संदीपने सुशांतच्या वस्तू कूपर हॉस्पिटलमधून गोळा केल्या. संदीपच्या पीआरने त्याची आणि सुशांतच्या बहिणीची छायाचित्रे क्लिक केली होती. सुदीप सुशांतचा जवळचा असेल. पण खूप पूर्वी असेल., अशी माहिती लाईव्ह हिंदुस्थानने दिली आहे. 


ईडीकडून रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. याशिवाय सुशांतची माजी बिझिनेस मॅनेजर श्रुती मोदीही ईडीच्या कार्यालयात हजर होती. तिघांनाही दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीच्या रडारवर आता संदीप सिंग असण्याची दाट शक्यता आहे.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

Web Title: Sushant Singh Rajput Suicide : Evidence found in ED's hands, Sandeep Singh's interrogation can now take place by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.