The woman's live was save after being pulled by a car and started treatment at the hospital | Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

ठळक मुद्देहा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चितळसर पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत.

ठाणे : गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मीना शामिल नाडमीकेरी नावाच्या 40 वर्षीय महिलेला भरधाव कारने धडक मारून सुमारे 50 मीटर अंतरापर्यत फरफटत नेल्याची घटना सिद्धांचल,पवारनगर येथे घडली. अपघातानंतर महिलेची विचारपूस न करता मूजोर कारचालकाने कारसह धूम ठोकली. मात्र, कारची जोरदार धडक बसूनही सुदैवाने महिला बचावली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चितळसर पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत. ठाण्यातील पोखरण रोड नं.2 वडारवाडी येथे राहणाऱ्या मिना नाडमीकेरी या घरकाम करणाऱ्या महिला काम आटपून पायी घरी जात होत्या. तेव्हा,सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सिद्धाचल फेज - 6 रस्त्यावर अचानक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक लागून कारच्या बोनेटवर पडलेल्या मीना यांना कारचालकाने 50 मीटरपर्यंत फरफटत नेले. पळून जाताना चालकाने कार उजव्या दिशेला वळवल्याने मीना कारच्या बोनेटवरुन खाली कोसळल्या.

 

 

तर, कारचालक घटनास्थळावरून कारसह पसार झाला. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ जखमी मीना यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. कारची धडक बसूनही मीना यांचा जीव बचावल्याने देव तारी त्याला कोण मारी याचाच जणू प्रत्यय आला. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चितळसर पोलिसांनी कारचा माग काढला आहे, अशी माहिती सहा. पोलीस निरिक्षक तानाजी रोडे यांनी दिली. दरम्यान, गुरूवारी सांयकाळी घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठानजीक आणखी एक अपघात घडला. भरधाव कारची धडक बसून 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

Web Title: The woman's live was save after being pulled by a car and started treatment at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.