शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

चोरट्यांनीही घेतली कोरोनाचा धास्ती; चोरी करताना मास्क, पीपीई किटचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 2:20 PM

पोलिसांना या चोरट्यांची चेहरेपट्टी मिळू शकली नाही़ आता बॉडी लँग्वेजवरुन त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.

पुणे : पाषाण येथे एकाच रात्रीत ४ दुकाने फोडून चोरट्यांनीचोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका दुकानातून त्यांनी १५ हजार रुपये लंपास केले़ यावेळी दुकानात शिरलेले चोरटे हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यावरुन चोरट्यांनीही कोरोनाचा धास्ती घेतल्याचे दिसून आले़ हे चोरट्यांनी पीपीई किट सारखे संपूर्ण शरीर झाकलेले व तोंडाला मास्क लावले आढळून आले. त्यामुळे आता पोलिसांना या चोरट्यांची चेहरेपट्टी मिळू शकली नाही़ आता बॉडी लँग्वेजवरुन त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.याप्रकरणी अनिल सोहनलाल आगरवाल (वय ५१, रा़ डिव ड्रॉप्स सोसायटी, बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आगरवाल यांचे पाषाण येथील आकाश कॉम्प्लेक्समध्ये आगरवाल सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. ३० जून रोजी त्यांनी रात्री ६ वाजता दुकान बंद केले. त्यानंतर १ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले. त्या दरम्यान चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानाच्या काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील १५ हजार रुपये चोरुन नेले. त्याचप्रमाणे दिनेश सयाराम चौधरी यांचे उत्तम सुपर मार्केट स्टोअर्स, प्रकाश ओमपुरी गोस्वामी यांचे हरिओम सुपर मार्केटमध्ये शिरुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. पाषाण येथील बालाजी सुपर मार्केट या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तीनही दुकानातून चोरट्यांना काहीही रोकड मिळू शकली नाही.  

कामगारामुळे वाचली चोरीचोरट्यांनी पाषाणमधील तीन दुकाने फोडल्यानंतर त्यांनी दिनेश चौधरी यांच्या उत्तम सुपर मार्केटचे शटर उकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. चोरट्यांचा आवाज ऐकून आत झोपलेले कामगार जागे झाले. तेवढ्यात चोरट्यांनी शटर वाकवून आत जाऊ लागले. आतमध्ये कामगार पाहून चोरटे पळून गेले. आत कामगार असल्यामुळे दुकानातील चोरी वाचली. एका दुकानात चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यांनी तोंडाला मास्क लावला असून संपूर्ण अंग झाकून घेतले जाईल, असे पीपीई किटसारखा ड्रेस घातला असल्याचे दिसून आले आहे़ पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत........

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThiefचोरtheftचोरीPoliceपोलिस