लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 02:25 PM2020-05-17T14:25:45+5:302020-05-17T14:26:22+5:30

जालन्यामध्ये शनिवारी ही बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

SHOCKING! even in lockdown; miner girl Raped by cousin in Jalana hrb | लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

Next

जालना : गेल्या काही वर्षांपासून बलात्काराच्या घटनांनी अवघा देश हादरून गेला होता. दिल्ली, हैदराबाद, उन्नाव येथील बलात्कार हे मुली घराबाहेर पडल्यानंतर झाले होते. मात्र, घरातही मुली सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यामध्ये घडला आहे. सख्ख्या चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केला आहे. 


जालन्यामध्ये शनिवारी ही बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ज्या भावाकडून संरक्षण व्हायला हवे त्याच भावाने अब्रू लुटल्याचा प्रकार घडल्याने संतापाचे वातावरण आहे. 


शहरातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावाने बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने सदरबाजारा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार या नराधम भावाववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला लगेचच अटक करण्यात आली आहे. पीडितेला उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात तिची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या....

CoronaVirus चीनच दोषी! अमेरिकेचे आरोप खरे ठरले; कोरोनाचे सॅम्पल नष्ट केल्याचे मान्य

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद

'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

न भूतो! रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर

CoronaVirus चीनला मोठा झटका! कायमचा बायबाय करत 'ही' जुनी कंपनी येतेय भारतात

Web Title: SHOCKING! even in lockdown; miner girl Raped by cousin in Jalana hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.