काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 11:34 AM2020-05-17T11:34:06+5:302020-05-17T12:29:09+5:30

चकमकीच्या ठिकाणी हिजबुलचे दोन दहशतवादी लपले असल्याचे समजते. यापैकी एका दहशतवाद्याला जवानांनी ठार केले आहे.

indian army terrorists encounter doda; 1 jawan martyred, 1 terrorist killed hrb | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद

googlenewsNext

जम्मू: काश्मीरमधील डोडामध्ये दहशतवाद्यांना जवानांनी घेरले असून जोरदार चमकम सुरु आहे. यामध्ये आपला एक जवान शहीद झाला असून एका दहशतवाद्यालाही ठार करण्यात आले आहे. 


चकमकीच्या ठिकाणी हिजबुलचे दोन दहशतवादी लपले असल्याचे समजते. यापैकी एका दहशतवाद्याला जवानांनी ठार केले आहे. या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी काश्मीरचा असल्याचे स्थानिकांनी लष्कराला सांगितले आहे. ही चकमक डोडा जिल्ह्याच्या गुडुनामध्ये होत आहे. दोन्ही बाजुंनी जोरदार गोळीबार केला जात आहे. 


भारतीय जवानांनी दहशतवादी लपलेल्या भागाला चारी बाजुंनी घेरले आहे. दहशतवाद्यांनी घरांचा आसरा घेतला आहे. डोडामध्येच या महिन्याच्या सुरुवातीला हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यत आली होती. ७ मे ला २२ वर्षांच्या दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक वायरलेस सेट जप्त करण्यात आला होता. 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

न भूतो! रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर

CoronaVirus चीनला मोठा झटका! कायमचा बायबाय करत 'ही' जुनी कंपनी येतेय भारतात

एका पॉर्न मॅगझिनने Kim Jong Unचे वाटोळे केले; हुकूमशहा पित्याने दिली मोठी शिक्षा

CoronaVirus बापरे! देश हादरला; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने चीनलाही टाकले मागे

सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

 

Web Title: indian army terrorists encounter doda; 1 jawan martyred, 1 terrorist killed hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.