Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

Updated:May 19, 2026 17:51 IST2026-05-19T17:42:09+5:302026-05-19T17:51:24+5:30

Payal Kapadia : पायल यांनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'क्रिटिक्स वीक'च्या ज्युरी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. असा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय ठरल्या आहे.

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद क्षण समोर आला आहे. भारतीय चित्रपट निर्माती पायल कपाडिया यांच्यावर ६५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली.

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

पायल यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'क्रिटिक्स वीक'च्या ज्युरी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. असा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय ठरल्या आहे.

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवरील सेलेब्रिटींचं नेहमीचं कौतुक होतं. त्यांच्या कपड्यांची जोरदार चर्चा रंगते. पण यात पायल यांनी आपल्या कौतुकास्पद कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा अत्यंत मोठा सन्मान आहे.

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

गेल्या वर्षी आपल्या 'ऑल वी इमेजिन एज लाइट'साठी प्रतिष्ठित 'ग्रँड प्रिक्स' जिंकून इतिहास रचणाऱ्या पायल आता कान्सच्या या जागतिक मंचावर ज्युरीचं नेतृत्व करतील. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत.

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

'द हॉलीवूड रिपोर्टर'च्या रिपोर्टनुसार, या ज्युरीमध्ये पायल यांच्यासोबत अभिनेता थिओडोर पेलरीन, गायक-गीतकार ओक्लू, निर्माता अमा अम्पाडू आणि बँकॉक वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलचे संचालक डॉनसरन कोविटवानिचा यांचाही समावेश आहे. कान्समध्ये १३ ते २१ मे दरम्यान 'क्रिटिक्स वीक'चं आयोजन केलं आहे.

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

पायल कपाडिया यांच्या चित्रपटविषयक दृष्टिकोनाचं कान्स क्रिटिक्स वीकने भरभरून कौतुक केलं आहे. क्रिटिक्स वीकने म्हटलं आहे की, पायल कपाडिया यांनी सहा शॉर्ट फिल्म्स आणि फीचर फिल्म्सच्या माध्यमातून अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे जे महिलांच्या जीवनातील वास्तव समोर आणतात.

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

'व्हरायटी'च्या रिपोर्टनुसार, ज्युरीबद्दल बोलताना पायल म्हणाल्या, "फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटांच्या निवडीमुळे एक चित्रपट निर्माती म्हणून माझ्या सुरुवातीच्या प्रवासाला मोठा पाठिंबा मिळाला."

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

"मला जगभरातील माझ्यासारख्या विचारसरणीच्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली, ज्यामुळे मला भविष्यातील सहकाऱ्यांचा एक गट तयार करण्यास मदत झाली. 'क्रिटिक्स वीक'सारख्या विभागांमध्ये चित्रपटांना प्रोत्साहन दिल्याने आधीच प्रस्थापित झालेल्या चित्रपट निर्मात्यांच्या कामाच्या गर्दीतही या नव्या चित्रपटांना बहरण्यास मदत होते."

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

पायल कपाडिया यांच्या 'आफ्टरनून क्लाउड्स' आणि 'अँड व्हॉट इज द समर सेइंग' या शॉर्ट फिल्म्सची सिनेफॉन्डेशन आणि बर्लिनालेसाठी निवड झाली होती. यापूर्वी त्यांची पहिली फिचर डॉक्युमेंट्री चित्रपट 'ए नाईट ऑफ नोइंग नथिंग' २०२१ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती.

Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीसाठीचा 'ल'ओइल डी'ओर' पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर पायल यांच्या 'ऑल वी इमेजिन एज लाइट' या दुसऱ्या फीचर फिल्मचं २०२४ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रचंड कौतुक झालं होतं.