प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४९ व्या वर्षी तिसरं लग्न करणार? शाहरुख-सलमानसोबतही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:22 IST2026-05-19T17:21:46+5:302026-05-19T17:22:34+5:30

ओळखलंत का या अभिनेत्रीला?

Dipshikkha Nagppal dancing with mystery man viral video her third marriage rumours all over | प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४९ व्या वर्षी तिसरं लग्न करणार? शाहरुख-सलमानसोबतही केलंय काम

प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४९ व्या वर्षी तिसरं लग्न करणार? शाहरुख-सलमानसोबतही केलंय काम

सलमान खान आणि गोविंदाच्या 'पार्टनर' सिनेमात दिसलेली दीपशिखा नागपाल आठवतेय? तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. सध्या दीपशिखा अभिनयापासून दूर आहे मात्र ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. दीपशिखाने आतापर्यंत अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं. सध्या दीपशिखा मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. तिच्या डेटिंगच्या चर्चा जोरात सुरु आहेत.

दीपशिखा नागपालने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. हा एका पार्टीतला व्हिडीओ आहे ज्यात ती मस्ती मूडमध्ये दिसत आहे. यामध्ये ती मिस्ट्री मॅनसोबत कपल डान्स करत आहे. दोघांमधील  जवळीक पाहून तिच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. पूर्ण व्हिडीओत ती पार्टनरच्या डोळ्यात हरवलेली दिसत आहे. तिने व्हिडीओला कॅप्शन देत लिहिले, 'एकमेकांचा आधार हीच आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट असते'. यासोबत तिने हॅशटॅगमध्ये 'कपल टुगेदर' लिहिलं आहे.


दीपशिखा आता ४९ वर्षांची आहे. तिचा याआधी दोन वेळा घटस्फोट झाला आहे. १९९७ साली तिने जीत उपेंद्रसोबत लग्न केलं आणि २००७ साली ते वेगळे झाले. नंतर २०१२ साली तिने केशव अरोरासोबत लग्नगाठ बांधली. मात्र २०१६ साली त्यांचा संसार मोडला. आता दीपशिखा वयाच्या पन्नाशीत तिसऱ्यांदा लग्न करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दीपशिखाने 'कोयला','बादशाह','रिश्ते','करण अर्जुन','दिल्लगी' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तसंच ती टेलिव्हिजनवरही दिसली. 'बालवीर','सोनपरी','मधुबाला','शक्तिमान' या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या.
 

 

Web Title : 49 साल की अभिनेत्री दीपशिखा नागपाल तीसरी बार शादी करने की अफवाह?

Web Summary : 'पार्टनर' के लिए जानी जाने वाली दीपशिखा नागपाल एक रहस्यमय व्यक्ति के साथ डेटिंग की अफवाहों से चर्चा में हैं। दो तलाक के बाद, 49 साल की उम्र में संभावित तीसरी शादी की अटकलें लगाई जा रही हैं। उन्होंने लोकप्रिय फिल्मों और टीवी शो में काम किया है।

Web Title : Actress Deepshikha Nagpal, 49, rumored to marry for third time?

Web Summary : Deepshikha Nagpal, known for 'Partner,' sparks dating rumors with a mystery man. After two divorces, speculation arises about a possible third marriage at 49. She has worked in popular movies and TV shows.