ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतेय ८ भागांची 'ही' रोमँटिक सीरिज, IMDb वर ८.२ रेटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:52 IST2026-05-19T17:44:04+5:302026-05-19T17:52:17+5:30

८.२ IMDb रेटिंग असलेली एक रोमँटिक वेबसीरिज सध्या ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

Off Campus Web Series Trending At Number One On Prime Video | ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतेय ८ भागांची 'ही' रोमँटिक सीरिज, IMDb वर ८.२ रेटिंग!

ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतेय ८ भागांची 'ही' रोमँटिक सीरिज, IMDb वर ८.२ रेटिंग!

जर तुम्ही सध्या ओटीटीवर एखादी उत्तम रोमँटिक वेब सीरिज पाहण्याच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक गूड न्यूज आहे. 'प्राइम व्हिडीओ'वर (Amazon Prime Video) नुकतीच एक नवीन सीरिज प्रदर्शित झाली आहे. संपूर्ण भारतात या सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून ती सध्या टॉप ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ८.२ असे तगडे IMDb रेटिंग असलेली ही ८ भागांची सीरिज सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.

तर ती सीरिज आहे 'ऑफ-कॅम्पस' (Off-Campus). लेखिका 'एल केनेडी'  यांच्या जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खपाच्या पुस्तक मालिकेवर ही सीरिज आधारित आहे. या पहिल्या सीझनची कथा पहिल्या पुस्तकावरून म्हणजेच 'द डील' (The Deal) वरून प्रेरित आहे. या कथेचा केंद्रबिंदू 'हॅना वेल्स' (Hannah Wells) आणि 'गॅरेट ग्रॅहम' (Garrett Graham) हे आहेत. हॅना ही संगीताचा अभ्यास करणारी एक अत्यंत हुशार आणि साधी तरुणी आहे, तर दुसरीकडे गॅरेट हा कॉलेजमधील मुलींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला स्टार हॉकी खेळाडू आहे. हॅनाला हॉकी या खेळाचा प्रचंड तिरस्कार असतो, त्यामुळे सुरुवातीला या दोघांचे स्वभाव एकमेकांपासून अगदी भिन्न असतात.

स्वभाव वेगळे असले तरी एका विशिष्ट कराराच्या निमित्ताने हे दोघे एकत्र येतात. या करारानंतर त्यांच्यात आधी मैत्री होते आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. मात्र, एका स्टार खेळाडूची आणि साध्या मुलीची ही प्रेमकहाणी एवढी सोपी नाही. यात अनेक चढ-उतार, सस्पेन्स आणि अनपेक्षित वळणे पाहायला मिळतात, जे प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. जर तुम्हाला कॉलेज लाईफ, रोमान्स आणि उत्तम संगीत आवडत असेल, तर ८ भागांची ही 'मस्ट-वॉच' सीरिज वीकेंडला तुमच्या लिस्टमध्ये नक्की असायला हवी.

Web Title : रोमांटिक 'ऑफ-कैंपस' सीरीज ओटीटी पर ट्रेंडिंग, उच्च आईएमडीबी रेटिंग के साथ।

Web Summary : एल. कैनेडी की पुस्तक पर आधारित अमेज़ॅन प्राइम वीडियो की 'ऑफ-कैंपस' ट्रेंड कर रही है। श्रृंखला हन्ना, एक संगीत छात्रा, और गैरेट, एक हॉकी स्टार का अनुसरण करती है। उनका अप्रत्याशित संबंध कॉलेज जीवन की चुनौतियों के बीच रोमांस की ओर ले जाता है, जिससे यह देखने लायक बन जाता है।

Web Title : Romantic 'Off-Campus' Series Trending on OTT with High IMDb Rating.

Web Summary : Amazon Prime Video's 'Off-Campus', based on L. Kennedy's book, is trending. The series follows Hannah, a music student, and Garrett, a hockey star. Their unlikely connection leads to romance amidst college life's challenges, making it a must-watch.