आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

Updated:May 19, 2026 19:05 IST2026-05-19T19:00:16+5:302026-05-19T19:05:02+5:30

why add betel leaf in ghee : benefits of betel leaf in ghee : how to make aromatic ghee at home : betel leaf while making ghee : साजूक तूप करताना नागवेलीचं पान का टाकतात? ९०% लोकांना माहित नाही हे कारण...

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

भारतीय स्वयंपाकघरात 'साजूक तूप' हा केवळ जेवणाची चव वाढवणारा पदार्थ नसून, ते आरोग्यासाठी एक वरदान मानले जाते. यासाठीच आजही कित्येक घरात तूप विकत आणण्याऐवजी घरीच साय साठवून - कढवून शुद्ध तूप तयार करण्याला प्राधान्य दिलं जातं. तूप कढवताना प्रत्येक गृहिणीची एक वेगळी पद्धत असते; कोणी त्यात लवंग टाकतं, कोणी वेलची तर कोणी तुळशीची पाने. पण तुम्ही कधी तूप तयार करताना त्यात 'नागवेलीचे' म्हणजेच खायचे पान टाकले आहे का?

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

पोळीपासून खिचडीपर्यंत अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी साजूक तूप वापरलं जातं. घरच्याघरीच लोण्यापासून तयार केलेलं साजूक तूप अधिक पौष्टिक आणि सुगंधी मानलं जातं. पण अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजूक तूप तयार करताना त्यात नागवेलीचं पान टाकण्याची खास पद्धत आजही पाळली जाते.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

अनेकांना ही पद्धत फक्त चवीसाठी असावी असं वाटतं, पण आयुर्वेदानुसार त्यामागे अनेक आरोग्यदायी फायदे देखील लपलेले आहेत. नागवेलीच्या पानामुळे साजूक तूपाला खास सुगंध येण्यासोबतच त्याची चव आणि औषधी गुणधर्म अधिक वाढण्यास मदत होते. साजूक तूप बनवताना त्यात नागवेलीचं पान टाकण्याचे नेमके फायदे कोणते आणि ते का टाकावं ते पाहूयात.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

साजूक तूप जितके दाणेदार आणि सुवासिक असेल, तितके ते खायला उत्तम लागते. तूप कढवताना सगळ्यात शेवटी खायचे पान टाकल्याने तुपाचा उग्र वास निघून जातो आणि त्याला एक अतिशय सुंदर, खमंग सुवास येतो. तसेच यामुळे तूप छान रवाळ दाणेदार बनते.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

नागवेलीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा आपण हे पान तुपात टाकतो, तेव्हा तुपाचे ऑक्सिडायझेशन (Oxidization) रोखले जाते. यामुळे तूप लवकर खराब होत नाही, त्याला बुरशी लागत नाही आणि ते वर्षभर अगदी ताजे राहते.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

अनेकदा बऱ्याच दिवसांची साय साठवून तूप बनवले की तुपाला एक प्रकारचा आंबट किंवा खवट वास येतो. नागवेलीचे पान तुपातील हा खराब वास पूर्णपणे शोषून घेते आणि तुपाची मूळ चव टिकवून ठेवते.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

आयुर्वेदामध्ये नागवेलीचे पान पाचक मानले गेले आहे. जेव्हा हे पान तुपात कढवले जाते, तेव्हा पानातील पाचक अर्क तुपात उतरतो. असे तूप जेवणात वापरल्याने गॅस, अपचन, आणि ॲसिडिटी सारख्या समस्या दूर होतात आणि पचनक्रिया सुधारते.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

उन्हाळ्यात किंवा उकाडा फार असताना शरीरात पित्त वाढण्याचा धोका असतो. साजूक तूप स्वतः थंड प्रकृतीचे असते आणि त्यात नागवेलीचे पान टाकल्याने त्याचे पित्तशामक गुणधर्म दुप्पट होतात. हे तूप शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करण्यास मदत करते.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

नागवेलीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे या पद्धतीने तयार केलेले साजूक तूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरातील लहान - सहान इन्फेक्शन्स दूर ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

अनेकदा साय व्यवस्थित न निथळल्यामुळे किंवा लोण्यात पाण्याचे प्रमाण जास्त राहिल्यामुळे तूप कढवल्यानंतरही त्यात थोडा ओलसरपणा राहून जातो. तुपात जराही ओलसरपणा उरला, तर तूप लवकर खराब होते, त्याला बुरशी लागते किंवा बुरशीचा वास येऊ लागतो. तूप तयार करताना त्यात नागवेलीचे पान टाकल्याने, हे पान तुपातील तो अतिरिक्त ओलसरपणा आणि पाण्याचा अंश पूर्णपणे शोषून घेते. यामुळे तूप अगदी शुद्ध कढवले जाते, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.

आई - आजी सांगते साजूक तुपात घालायलाच हवं एक विड्याचं पान कारण...फायदे मोजाल तितके कमी!

अनेकदा घरी साय कढवून तूप बनवताना भांड्यात खूप जास्त प्रमाणात फेस तयार होतो. काहीवेळा हा फेस इतका वाढतो की तूप भांड्यातून ओसंडून बाहेर जाण्याची किंवा करपण्याची भीती असते. तूप तयार करताना त्यात नागवेलीचे पान टाकल्याने या समस्येपासून सुटका मिळते. हे पान तुपातील अतिरिक्त फेसाचे प्रमाण नियंत्रित करते आणि कमी करते. यामुळे तूप शांतपणे आणि व्यवस्थित कढवले जाते, ज्यामुळे तूप वाया जाण्याचा किंवा करपण्याचा धोका टळतो.