UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना केले निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 08:00 PM2020-07-03T20:00:29+5:302020-07-03T20:03:20+5:30

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता याप्रकरणी UN च्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  

sex in a UN car; Two UN staff suspended after video goes viral | UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना केले निलंबित 

UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना केले निलंबित 

googlenewsNext
ठळक मुद्दे व्हायरल क्लिपमध्ये हे स्पष्ट झाले होते की, लाल पोशाख घातलेली एक महिला एका पुरुषासह कारच्या मागील सीटवर बसली असून या व्यतिरिक्त कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर एक व्यक्ती देखील दिसत आहे.यापूर्वी व्हिडिओमध्ये ड्रायव्हरचा चेहरा स्पष्ट दिसत होता. वाहतूक सिग्नलवर वाहन थांबल्यानंतर कोणीतरी हा व्हिडिओ इमारतीच्या वरून काढला. हा व्हिडीओ १८ सेकंदाचा आहे. 

युनायटेड नेशन्सच्या (UN) अधिकाऱ्याने एका महिलेसह कारमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इजयारलची राजधानी तेल अवीव येथून हा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता याप्रकरणी UN च्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  

व्हायरल क्लिपमध्ये हे स्पष्ट झाले होते की, लाल पोशाख घातलेली एक महिला एका पुरुषासह कारच्या मागील सीटवर बसली असून या व्यतिरिक्त कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर एक व्यक्ती देखील दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, UNने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीची ओळख पटविण्यात ते अगदी जवळ पोहचले होते आणि आता त्या व्यक्तींची ओळख पटली आहे. UNकडून सांगण्यात आले होते की, इजयारलमधील शांतता संघटनेच्या कर्मचार्‍यांवरही संशय व्यक्त केला जात होता. व्हिडिओ तेल अवीवमधील मुख्य रस्त्यावरचा आहे. यापूर्वी व्हिडिओमध्ये ड्रायव्हरचा चेहरा स्पष्ट दिसत होता. वाहतूक सिग्नलवर वाहन थांबल्यानंतर कोणीतरी हा व्हिडिओ इमारतीच्या वरून काढला. हा व्हिडीओ १८ सेकंदाचा आहे. 


संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक म्हणाले की, १८ सेकंदाचा हा व्हिडिओ घृणास्पद आहे. आम्ही या कृत्याच्या विरोधात आहोत. अशी प्रकरणे यूएनच्या कर्मचार्‍यांद्वारे समोर आली आहेत. पुढे ते म्हणाले, "ही कार 'युनायटेड नेशन्स ट्रस सुपरव्हिझन ऑर्गनायझेशन'ची असल्याचे आतापर्यंत उघड झालेल्या माहितीवरून समजले आहे. कारमधील सेक्स दोन लोकांच्या संमतीने केले गेले होते किंवा त्यासाठी पैसे दिले गेले होते, याचा गांभीर्याने तपास करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

Web Title: sex in a UN car; Two UN staff suspended after video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.