Acid-burned faces, rotten bodies of lovers found hanging from trees | अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह 

ठळक मुद्दे एएसपी संभल आलोक जयस्वाल यांनी सांगितले की, प्रेमीयुगुल असलेल्या बंटी आणि सुखिया यांचे मृतदेह सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीच हत्या करून टाकले आहेत. ही आत्महत्या आणि हत्या आहे का याबाबत आता सांगता येत नाही. या दोघांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. त्याचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील चंदौसी जिल्ह्यात भीषण हत्येची एक वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. सात दिवसांपूर्वी बेपत्ता प्रेमीयुगुलाचे मृतदेह बुधवारी जंगलात गुलाबाच्या झाडावर लटकलेले आढळले. पोलीस देखील या भयानक हत्याकांडाने हादरून गेले. दोघांचे देखील चेहरे अ‍ॅसिडने भाजले होते. शेतात काम करणाऱ्या मजुरांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली.

या मृत युवकाचे २८ जून रोजी लग्न होणार होते. पोलिसांनी महिलेचे वडील, काका, मेव्हणी आणि आई यांना ताब्यात घेतले आहे, मात्र, याबाबत चौकशी केली जात नाही आहे. इतर नातेवाईक घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. धनारी पोलिस स्टेशन परिसरातील गढा गाव येथील रहिवासी असलेल्या बंटी (वय 20) यांचे शेजारील रहिवासी सुखिया (वय 18 ) या तरुणीशी प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी बंटीचे लग्न निश्चित केले होते आणि २८ जून रोजी लग्न करणार होते. लग्नाआधी २५ जूनला बंटी आणि सुखिया घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते .

बुधवारी सायंकाळी खेड्यातील रहिवासी असलेले चंद्रपाल सिंग यांच्या शेतात मजूर मेंथाचे पीक काढत होते. दुर्गंध येताच मनवीर आणि प्रेमपाल हे मजूर शेतात आत गेले आणि त्यांनी बंटी आणि सुखियाचा मृतदेह झाडावर लटकलेलय अवस्थेत पहिले. त्यांनी या घटनेची माहिती शेताचे मालक चंद्रपाल सिंग यांना दिली. त्यांनी घटनेची माहिती गावप्रमुख महेंद्रसिंग यांना दिली. ग्रामप्रमुखांची माहिती मिळताच सीओ व प्रभारी निरीक्षक पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे दोन्ही चेहरे अ‍ॅसिडने जळाले आहेत. दोघांचे मृतदेह मिळताच युवकाचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले, पण मुलीचे कुटुंब पोहोचले नाही.

एएसपी संभल आलोक जयस्वाल यांनी सांगितले की, प्रेमीयुगुल असलेल्या बंटी आणि सुखिया यांचे मृतदेह सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीच हत्या करून टाकले आहेत. दोघांच्याही शरीरात किडे निर्माण झाले आहेत. यावेळी, अनेकवेळा  रिमझिम पाऊस देखील पडला. त्यामुळे मृत शरीर उन्हाळ्यापासून आणि पावसाच्यादरम्यान, झुडुपात असलयाने सुजलेले आहेत. मृतदेहांवर इजा झालेल्या खूण दिसून येत नाहीत. ही आत्महत्या आणि हत्या आहे का याबाबत आता सांगता येत नाही. या दोघांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. त्याचा तपास सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच काही निष्कर्ष काढता येईल.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित 

Web Title: Acid-burned faces, rotten bodies of lovers found hanging from trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.