आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 08:41 PM2020-07-01T20:41:53+5:302020-07-01T20:45:22+5:30

याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक केली आहे. 

First the throat was choked, then the head was drowned in a bucket full of water, kid's murder caused a stir in Mumbai | आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

Next
ठळक मुद्देसहार रोड येथील संतोषी माता नगर येथे राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेनं जुन्या वादातून एका ४ वर्षाच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केली. मधू गाधे (२९) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला सहार पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबई - कोरोनाच्या संकटाशी आपण सर्वजण लढत असताना मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात सहार रोड येथे एक धक्कादायक प्रकार घडला. सहार रोड येथील संतोषी माता नगर येथे राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेनं जुन्या वादातून एका ४ वर्षाच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनं सर्व परिसर हादरून गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा मृत मुलाच्या आई-वडिलांशी वाद होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, महिलेने बदला घेण्यासाठी ४ वर्षांच्या श्रेयस कदमची हत्या केली. मधू गाधे (२९) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला सहार पोलिसांनीअटक केली आहे. तिने ४ वर्षांच्या चिमुरड्याला सोमवारी रात्री पहिल्या माळ्यावरील घरी बोलवलं. त्यानंतर आरोपी महिलेनं लेगीज पँटीने चिमुरड्याचा गळा आवळला, इतकेच नव्हे तर निर्दयी असलेल्या तिने तिच्या बाथरुममध्येच पाण्याने  भरलेल्या बादलीत त्याचं डोकं बुडवलं आणि जीवे ठार मारलं अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक केली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

 

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

 

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

 

लॉकडाऊनने घेतले पुन्हा दोन बळी, तरुणाचा गळफास घेऊन तर वृद्धाने रेल्वेखाली केली आत्महत्या

Web Title: First the throat was choked, then the head was drowned in a bucket full of water, kid's murder caused a stir in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.