TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:52 PM2020-06-29T14:52:49+5:302020-06-29T14:54:42+5:30

आरोपी शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बेडमध्ये लपून ठेवण्यात आला आणि तेथून तो फरार झाला.

TikTok star Shivani strangled to death; The body was found inside the bed | TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी मृताच्या बहिणीच्या मित्राने बेड उघडला असता तिचा मृतदेह आढळला. यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या घटनेच्या दोन दिवसानंतर श्वेताचा मित्र नीरजने ब्युटी पार्लर उघडले, त्याला दुर्गंध येऊ लागला. नीरजने ब्युटी पार्लरच्या बेड उघडला आणि त्यात शिवानीचा मृतदेह आढळला.

सोनीपत -  हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील कुंडली भागात Tik Tok स्टार शिवानीची गळा आवळून हत्या करण्यात आली. कुंडलीत राहणारा आरिफ याच्यावर खुनाचा आरोप आहे. आरोपी शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बेडमध्ये लपून ठेवण्यात आला आणि तेथून तो फरार झाला. रविवारी मृताच्या बहिणीच्या मित्राने बेड उघडला असता तिचा मृतदेह आढळला. यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, शिवानी खोबियान येथील कुंडली भागात टच अँड फेअर नावाचे सलून चालवत असे. टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

शिवानीची बहीण श्वेतानुसार २६ जून रोजी आरिफ तिच्या ब्युटी पार्लरमध्ये शिवानीला भेटायला आला होता. ही गोष्ट शिवानीने श्वेताच्या फोनवर सांगितली. त्या रात्री शिवानी घरी परत आली नाही. तेव्हा रात्री श्वेताने मेसेज केला. मेसेजला शिवानीने ती हरिद्वारला आली आहे आणि मंगळवारी परत येईल, असे उत्तर दिले.

बहिणीच्या मित्राने दार उघडले तेव्हा तिला शिवानीचा मृतदेह सापडला


या घटनेच्या दोन दिवसानंतर श्वेताचा मित्र नीरजने ब्युटी पार्लर उघडले, त्याला दुर्गंध येऊ लागला. नीरजने ब्युटी पार्लरच्या बेड उघडला आणि त्यात शिवानीचा मृतदेह आढळला. शिवानीचे वडील विनोद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरिफविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लवकरच आरोपींना अटक केली जाईल

सलून चालवणाऱ्या तरुणीचा गळा आवळून हत्या करून मृतदेह पलंगावर ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलीच्या वडिलांच्या जबाबानुसार तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हील रुग्णालयात पाठविला आहे. सोमवारी मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

Read in English

Web Title: TikTok star Shivani strangled to death; The body was found inside the bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.