After a quarrel with her husband, the wife jumped in front of the train with her 3 children | पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

ठळक मुद्देजाणाऱ्या वाटसरूने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी त्या वाटसरूला १ लहान बाळ जखमी झालेल्या शरीरापाशी बसलेलं आढळलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रात्री या महिलेचे पतीसोबत भांडण झाले असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. 

नवी दिल्ली - दिल्लीच्या मंडावली स्थानक परिसरात एक ३० वर्षीय महिलेने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या महिलेने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या केली, मात्र यात दुर्दैवाने २ चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर १ वर्षाचं बाळ बचावलं. पोलिसांनी हा आत्महत्याचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली आहे. रात्री तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. रेल्वेपोलिसांना या घटनेची माहिती देणारा कॉल ३.४० वाजताच्या सुमारास आला. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जाणाऱ्या वाटसरूने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी त्या वाटसरूला १ लहान बाळ जखमी झालेल्या शरीरापाशी बसलेलं आढळलं. ३ मुलांपैकी त्या एका वर्षाच्या बाळाची प्रकृती गंभीर होती. मात्र, पोलिसांच्या पथकाने तात्काळ या मुलाला लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात  दाखल केले. त्यानंतर तिन्ही मृतहेद रेल्वे ट्रॅकवरून हटवण्यात आले.
मृत महिलेचे नाव किरण असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, ही महिला रेल्वे कॉलनीमध्ये राहत असून, हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत महिलेसह मृत २ मुलींचे वय ५ आणि ६ वर्ष आहे. तसेच थोडक्यात बचावलेलं मुलं हे एका वर्षाचं होतं. सध्या तिन्ही मृतहेद शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात  पाठवण्यात आले आहेत. आधी मृतांचा कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. दरम्यान मृत महिलेच्या नवऱ्याचा आणि परिवाराचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रात्री या महिलेचे पतीसोबत भांडण झाले असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती 

Web Title: After a quarrel with her husband, the wife jumped in front of the train with her 3 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.