Shocking! A minor girl who protested against the rape was burnt alive, crying out for help | धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती 

ठळक मुद्देआगीत ९० टक्के भाजलेल्या मुलीला तिचा दोन दिवसांनी म्हणजेच आज गुरुवारी मृत्यू झाला. बबलू भास्कर (३०) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवून घेतला. मात्र, उपचार मिळण्याआधीच तिचा आज मृत्यू झाला. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बबलू भास्करला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायपूर - बलात्काराला विरोध करणाऱ्या एका  १४ वर्षीय अल्पवीयन मुलीला जिवंत जाळल्याची वेदनादायी घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. राज्यातल्या मुंगेली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ही घटना घडली.  त्यावेळीपीडित मुलगी घरात एकटीच होती. तिच्या पाठलागावर असलेला तरुण घरात आला आणि त्याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या त्या तरुणाने रॉकेल टाकून त्या अल्पवयीन मुलीला पेटवून दिलं. आगीत ९० टक्के भाजलेल्या मुलीला तिचा दोन दिवसांनी म्हणजेच आज गुरुवारी मृत्यू झाला. बबलू भास्कर (३०) असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

बबलू हा पीडित मुलीच्या गावचा रहिवासी आहे. मुलीच्या घरातील सदस्य कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी ती एकटीच घरात होती. याच संधीची फायदा घेत बबलू हा तिच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याला विरोध करताच त्याने रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. मुलगी जोरजोरात रडत होती असून देखील आगीत विव्हळत ठेवत त्या नराधमाने पळ काढला.आजुबाजूच्या लोकांना घटनेची माहिती मिळताच ते धावून आले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं. त्यावेळी ती मुलगी ९० टक्के भाजली होती. या घटनेने मुलीचं सगळं कुटुंबच उद्धवस्त झालं आहे. ३० जून रोजी रात्री तरुणी घरी एकटी असताना ही दुर्दैवी घटना घडली.


पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवून घेतला. मात्र, उपचार मिळण्याआधीच तिचा आज मृत्यू झाला. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बबलू भास्करला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे या परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. अलीकडेच सातवीत शिकणाऱ्या बेमेटारा जिल्ह्यातील मुलीला दोन नराधमांनी २२ जूनला बलात्कारास विरोध केल्याने जाळून टाकले. तिला आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २४ जूनला तिची मृत्यूची झुंज संपली.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

Web Title: Shocking! A minor girl who protested against the rape was burnt alive, crying out for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.