The thorn of the lover removed together with the new lover; murder mixed with poison in milk | नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

ठळक मुद्दे बडी बरखेडी येथील रहिवासी कुलदीप सिंग (वय 22) हे गुरजितसिंग ठाकूरद्वारा येथील वी गॉर्ड कंपनीत काम करत होता.पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे नमूद केले आहे. विष दिल्याची माहिती काढण्यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे.

उत्तराखंडच्या काशीपुरात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुलदीपचा मृतदेह नाल्यातून सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या प्रेमसंबंधातील त्रिकोणामुळे घडले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृत तरुणाचा मोबाईल घटनास्थळावरुन ताब्यात घेतला आहे.

बडी बरखेडी येथील रहिवासी कुलदीप सिंग (वय 22) हे गुरजितसिंग ठाकूरद्वारा येथील वी गॉर्ड कंपनीत काम करत होता.२९ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास तो फिरायला बाहेर गेला. त्यानंतर तो रहस्यमयपणे बेपत्ता झाला होता. त्याच्या आजोबांनी (बूटा सिंग) पैगा पोलीस चौकीत हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुलदीपच्या दोन मोबाइल फोनचे नंबरचा तपास केला असता, एक तरुणी त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले. माहिती मिळताच या तरुणीच्या संपर्कात गावातीलच एक दुसर्‍या युवक असल्याचेही आढळले. गुरुवारी गावच्या बाराटघरपासून २०० मीटर अंतरावर नाल्यातून कुलदीपचा सडलेला मृतदेह सापडला.

माहिती मिळताच एएसपी राजेश भट्ट, सीओ मनोज ठाकूर, एसओ कुलदीप अधिकारी, पैगा चौकी प्रभारी अशोक फरातल घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या शरीरावर दुखापतीचे कोणत्याच्या खुणा सापडल्या नाही. डॉ.शांतनु सारस्वत आणि डॉ.के.पी. सिंह यांच्या दोन सदस्यांच्या पॅनेलने मृतदेहाचे पोस्टमार्टम केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे नमूद केले आहे. विष दिल्याची माहिती काढण्यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेमिका आणि तिच्या नवीन प्रियकराला ताब्यात घेतले आहे. बलजितच्या शेतात पोलिसांनी मृताचा मोबाइलही जप्त केला आहे. 

 

गर्लफ्रेंडने विष मिसळून खायला दिले, नव्या प्रियकराने गळा आवळून खून केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीपच्या प्रेयसीने आपल्या नवीन प्रियकरसमवेत त्याला जिवे मारण्याचा कट रचला होता. खुनाची अंमलबजावणी करण्यापूर्वी या महिलेने १३ वेळा  तरुणीचे तिच्या प्रियकराशी फोनवर बोलणे झाले होते.

बडी बरखेडीतील बारात घरापासून बलजितसिंग यांचे शेत 200 मीटर अंतरावर आहे. मृतदेह सापडलेले गटार शेताजवळून जाते. या नाल्यातून कुलदीपचा मृतदेह मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपी महिलेची काटेकोरपणे चौकशी केली, त्यानंतर तिने कुलदीपचा तिच्या प्रियकराने खून केल्याची कबुली दिली. गेल्या दोन वर्षांपासून तिचे कुलदीपशी प्रेमसंबंध होते, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून ती त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या संपर्कात आली आणि त्यांची जवळीक वाढली. पण प्रियकर कुलदीपला त्याची प्रेयसी भेटणं त्या युवकाला खटकत होतं. 

नव्या प्रियकराच्या भानगडीत कुलदीपपासून सुटका करण्यासाठी दोघांनी मिळून हा कट रचला होता. त्याला भेटण्याच्या बहाण्याने तिने कुलदीपला बागेत बोलावले आणि वेलची दुधात विष घालून प्यायला दिले. दूध प्याल्यानंतर कुलदीपने उरलेले दूध बाहेर फेकले. यावर तिच्या नव्य प्रियकराने त्याचा गळा आवळून खून केला. दोघांनी कुलदीपचा मृतदेह आणून नाल्यात फेकला. ग्रामस्थांनी दोन्ही आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

Web Title: The thorn of the lover removed together with the new lover; murder mixed with poison in milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.