अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:52 PM2020-06-29T20:52:30+5:302020-06-29T20:54:14+5:30

सायंकाळच्या सुमारास चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून दुर्गंध येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावून घेतले.

panic over the body of an unidentified woman being found in Tempo | अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

Next
ठळक मुद्दे टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर हे आल्यानंतर टेम्पोतील गोणीत मृतदेह असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले.त्या महिलेची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. महिलेची हत्या कोणी केली आणि का केली याचा पोलीस तपास करत आहेत.

नालासोपारा -  नालासोपारा पूर्व, चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. सायंकाळच्या सुमारास चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून दुर्गंध येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी या प्रकार उघड झाला आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. 

टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर हे आल्यानंतर टेम्पोतील गोणीत मृतदेह असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ती गोणी उघडून पाहिली त्यावेळी त्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. टेम्पोत मृतदेह नेमका कुठून आला आणि मृत महिला कोण आहे? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्या महिलेची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. महिलेची हत्या कोणी केली आणि का केली याचा पोलीस तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक

 

मृत्यूशी झुंज देतेय! आजीच्या कुशीत झोपलेली नात; मामाच्या वासनेला बळी पडली

 

कुत्र्याला मारण्यापासून रोखले, संतापलेल्या माथेफिरुने ९ महिन्यांच्या मुलीचा घेतला जीव

Web Title: panic over the body of an unidentified woman being found in Tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.