शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

एका हॉटेलसह दोन दुकाने फोडून चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 5:36 PM

याप्रकरणी फर्नांडिस यांनी रविवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

ठळक मुद्देसुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल दोन चोरटयांनी लांबवला.सचिन तिवारी यांच्या जय महाराष्ट्र झेरॉक्सच्या दुकानातून सहाशे रुपयांची रोकड लांबवली.

कल्याण - पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरात असलेल्या एका हॉटेलसह दोन दुकाने चोरट्यांनी फोडून दुकानातील आईस्क्रिम आणि रोख रक्कम असा सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल दोन चोरटयांनी लांबवला.कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणाऱ्या वॉल्टर फर्नांडिस यांचे बिर्ला महाविद्यालय येथील चिंतामणी कॉलनीमध्ये डि.जे. हॉल नावाचे हॉटेल आहे. फर्नांडिस यांनी शनिवारी हॉटेल बंद केल्यानंतर दोन चोरटयांनी त्यांच्या हॉटेलमधील रोख रक्कम आणि शीतपेयाचे बॉक्स असा ४१०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. त्यानंतर हॉटेलच्या शेजारी असलेले मनोज फडतरे यांच्या मनपसंत आईस्क्रिम आणि झेरॉक्सच्या दुकानातून शीतपेय आणि आईस्क्रिम असा सुमारे साडेपाच हजारांचा मुद्देमाल लांबवला. तसेच, सचिन तिवारी यांच्या जय महाराष्ट्र झेरॉक्सच्या दुकानातून सहाशे रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी फर्नांडिस यांनी रविवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसkalyanकल्याण