Inhumanity! In Mumbai, sexual abuse to minor by a man, a lure of Rs 10 | अमानुषपणा! मुंबईत चिमुकलीच्या अब्रूशी नराधम खेळला, १० रुपयांचे दाखवले आमिष 

अमानुषपणा! मुंबईत चिमुकलीच्या अब्रूशी नराधम खेळला, १० रुपयांचे दाखवले आमिष 

ठळक मुद्देया प्रकरणी आरोपीविरोधात पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धारावी पोलिसांनी दिली आहे.

पनवेल पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर परिसरातील एका कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता मुंबईत खळबळजनक घटना घडली आहे. एका ५ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळ्ळजनक घटना घडली आहे. १० रुपये देण्याचं आमिष दाखवून शेजारी राहाणाऱ्या ५९ वर्षाच्या नराधम ५ वर्षाच्या मुलीच्या अब्रुशी खेळला. या प्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाने हाहाकार माजवलेल्या धारावी परिसरात ही लाजिरवाणी घटना घडली आहे.

पीडित चिमुकली हातात १० रुपयांची नोट घेऊन आली. त्याववर आईने तिला पैशाबाबत विचारणा केली. त्यावेळी या घटनेला वाचा फुटली. आईने विचारल्यावर घडलेला सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने धारावी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दाखल घेऊन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नराधमाने पीडित मुलीला आपल्याकडे बोलावून घेतलं होतं. पीडित मुलीला १० रुपये देवून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला, असं पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धारावी पोलिसांनी दिली आहे.

अलीकडेच ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये लाजिरवाणी घटना घडली. या प्रकरणी एका २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर काही दिवसांपूर्वी पनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आला होता. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

 

Web Title: Inhumanity! In Mumbai, sexual abuse to minor by a man, a lure of Rs 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.