Ulhasnagar police's big action; Offence registered on selling food shops | उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर गुन्हे

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर गुन्हे

ठळक मुद्देदुकाने व सार्वजनिक ठिकाणी सोशल डीस्टंन्सचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.

उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत खाद्य पदार्थ विकणाऱ्या तब्बल ७ दुकानांवर उल्हासनगरपोलिसांनी धडक कारवाई करीत गुन्हे दाखल केले. तसेच शहराच्या गर्दीच्या ठिकाणी नागरिक मास्क विना सर्रासपणे फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असताना, दुसरीकडे गर्दीच्या ठिकाणी नागरिक मास्क विना फिरत असल्याचे चित्र आहे. तर दुकाने व सार्वजनिक ठिकाणी सोशल डीस्टंन्सचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. यावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. दरम्यान उल्हासनगर पोलिसांनी कॅम्प नं-१ व २ परिसरातील गोल मैदान, शिरू चौक, बेवस चौक, आवत राम चौक परिसरातील काही खाद्य पदार्थाची दुकानें रात्री उशिरा पर्यंत उघडी ठेवत असल्याची माहिती मिळाली. उल्हासनगर पोलिसांनी रविवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान विष्णु हॉटेल, आईसक्रीम दुकान, चायनीज फूड दुकान अश्या एकून ७ दुकानावर कारवाई करून गुन्हा दाखल केला. 

महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी दुकानात सोशल डिस्टंन्सचे उल्लंघन केल्यास प्रथम १० हजार, दुसरी वेळा १५ हजार तर तिसरी वेळा दुकानें बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी मास्क वापरले नाहीतर प्रथम वेळा ५००, दुसरी वेळा १ हजार तर तिसरी वेळा गुन्हा दाखल करण्याचा आदेश यापूर्वी आयुक्तांनी काढला असून त्याची अंमबजावणी करण्याची जबाबदारी सबंधित प्रभाग अधिकारी व दक्षता समितीवर सोपविण्यात आली. प्रभाग अधिकारी व दक्षता समिती यांनी त्याची अंबलबजवणी करावी. अशी मागणी होत असून आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे संकेत महापालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिला आहे.

 

 दुकानदार व नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन टाळावे

शहरात दुकानदार व नागरिकांकडून सोशल डिस्टंन्टचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. असेच उल्लंघन राहिल्यास कोरोना रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रभाग अधिकारी व दक्षता समिती कारवाई करणार असल्याचे संकेत जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने यांनी दिली आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

Web Title: Ulhasnagar police's big action; Offence registered on selling food shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.