Shocking! Thieves broke into the temple and killed three priests | धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

ठळक मुद्दे गणेश, प्रकाश आणि आनंद अशी या पुजाऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही चुलत भाऊ होते असून ते मंदिरात पुजाऱ्यांचे काम करत.

मंड्या : कर्नाटक येथील मंड्यामध्ये एका मंदिरातल्या 3 पुजाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मंड्या परिसरातील गट्टालू येथील श्री अराकेश्वर मंदिरात ही घटना घडली. शुक्रवारी पहाटे मंदिरात चोरट्यांनी प्रवेश केला आणि झोपलेल्या पुजाऱ्यांची निर्घृण हत्या केली. गणेश, प्रकाश आणि आनंद अशी या पुजाऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही चुलत भाऊ होते असून ते मंदिरात पुजाऱ्यांचे काम करत. त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या दानपेट्यांवर डल्ला मारला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथकं स्थापन केली जातील अशी माहित मंड्याचे पोलीस अधीक्षक परशुराम यांनी दिली. 
 

हे मंदिर इथलं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचा कारभार हा सरकारकडे आहे, मुझराई विभागाच्या अंतर्गत हे मंदिर येत असून ब गटात हे मंदिर मोडतं. कोरोनामुळे पुजारी हे मंदिरातच झोपत होते. पहाटे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान चोरटे मंदिरात घुसले होते. 3 पेक्षा त्यांची संख्या जास्त असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांनी झोपलेल्या पुजाऱ्यांवर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली अशी माहीती पोलिसांनी दिली आहे.

त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या तीन मोठ्या दानपेट्या पळवून नेल्या. मंदिराबाहेर त्या फोडून त्यातले पैसे लंपास केले अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. सकाळी जेव्हा स्थानिक गावकऱ्यांना मंदिराची दारं उघडी दिसली तेव्हा त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं. त्यानंतर गावकऱ्यांना धक्काच बसला. तीन पुजारी मृतावस्थेत आढळून आले. मंदिराच्या गाभाऱ्यात दरोडेखोरांनी तोडफोड केली होती. दानपेट्या पळविण्यासाठी त्यांनी तोडफोड केली असावी असंही पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?

 

आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय  

 

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली 

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

Web Title: Shocking! Thieves broke into the temple and killed three priests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.