लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 08:22 PM2020-06-25T20:22:04+5:302020-06-25T20:25:03+5:30

लॉकडाऊनच्या काळात गर्दी होणाऱ्या सभा, समारंभ, लग्न आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Due to Turmeric ceremony disputes at wedding ceremony disrupted, three charged | लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देपनवेलमध्ये उन्हाळ्यात होणारे विवाह यंदा होवू शकले नाहीत. अनेकांना नाईलाजास्तव यंदा हा जल्लोष साजरा करता आला नाही. या समारंभामधील नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या वादग्रस्त हळदी समारंभामुळे तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल - लॉकडाऊनच्या काळात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडत असताना पनवेल तालुक्यातील नेरे गावात शेकडो नागरिकांच्या उपस्थिती पार पडलेला हळदी समारंभ वादात सापडला आहे. या समारंभामधील नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या वादग्रस्त हळदी समारंभामुळे तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात गर्दी होणाऱ्या सभा, समारंभ, लग्न आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये उन्हाळ्यात होणारे विवाह यंदा होवू शकले नाहीत. अनेकांना नाईलाजास्तव यंदा हा जल्लोष साजरा करता आला नाही. काहींना छोटेखानी घरात लग्न पार पाडून उत्सवावर विरजण घातले. पनवेल तालुक्यातील नेरे गावात एका कुटूंबाने करोनाचे गांभिर्य न ओळखता 14 जुन रोजी मोठ्या थाटामाटात हळद साजरी केली. नवरदेवाची वडील वामन पाटील यांनी पाहूण्यांना खूश करण्यासाठी कुटूंबाने हळदीत खेकड्याच्या जेवणाचा मेन्यु ठेवण्यात आला होता.नेरे गावात पार पडलेल्या या हळदीत तब्बल 500 पेक्षा जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवाराने हजेरी लावली अशी माहिती समोर येत आहे.
 

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाचा भाऊ खोकला, सर्दी आणि ताप सुरू झाला. पाच दिवसांपुर्वी त्याचा मृत्यु झाला. या मृत्युनेच हा अत्यंत छुप्या पध्दतीने पार पडलेला सोहळा उघड झाला. मृत्यू नंतर नवरेदवाच्या भावाचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे उघड झाले आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नवरेदेवाचे वडील वामन पाटील ,भाऊ तसेच वधूच्या वडिलांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.या घटनेत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांनी दिली.

 

इतरांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज

या घटनेननंतर तालुक्यात खळबळ उडालीआहे .मात्र अद्यापही लग्न,हळदी समारंभ पार पडत असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता इतरांनी अशाप्रकारे बेजबाबदार पणा न करता आपल्या सोबत इतरांचे जीव धोक्यात टाकू नये असे अवाहन शासकीय यंत्रणेद्वारे करण्यात आले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

Web Title: Due to Turmeric ceremony disputes at wedding ceremony disrupted, three charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.