५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 07:13 PM2020-06-25T19:13:13+5:302020-06-25T19:23:03+5:30

पोलिसांनी दोन्ही आरोपी आणि मृताच्या पत्नीला अटक केली आहे. हत्येमध्ये वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

5 Husband's unfortunate end after love marriage; The first wife gave the Rs 1 crore to do murder her husband | ५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

googlenewsNext
ठळक मुद्देमृत युवक विकास ऊर्फ नीटू (३५) हा बड़ौली गावचे रहिवासी नरसिंह यांचा मुलगा होता. मृताने आपली पहिली पत्नीची ओळख नोकर म्हणून इतर बायकांसमोर ठेवली. यामुळे कंटाळलेल्या मृताच्या पहिल्या पत्नीने हत्येचा कट आखला.

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात बड़ौत पोलिसांनी गुरुवारी एका युवकाच्या हत्येचा खळबळजनक खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाच्या पहिल्या पत्नीने संपत्तीच्या वादातून सुपारी देऊन पतीची हत्या करण्यात आली होती. कोतवाली परिसरातील बडौली गावात पाच दिवसांपूर्वी एका युवकाची हत्या करण्यात आली. गुरुवारी या हत्या प्रकरणात बड़ौत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. युवकाच्या पहिल्या पत्नीने संपत्तीच्या वादातून एक कोटी रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या केली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपी आणि मृताच्या पत्नीला अटक केली आहे. हत्येमध्ये वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

मृत युवक विकास ऊर्फ नीटू (३५) हा बड़ौली गावचे रहिवासी नरसिंह यांचा मुलगा होता. तो दिल्लीत एका खासगी कंपनीत नोकरी करायचा. पाच दिवसांपूर्वी तो गावात आला असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा हा तरुण गावातील घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या दुसर्‍या घरात झोपला होता. त्यावेळी तीन इसम दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार करून त्याला ठार मारले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ माजली.


याबाबत माहिती मिळताच एसपी अजय कुमार, सीओ आलोक सिंह आणि कोतवाल पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याचवेळी तीन पथकांना हल्लेखोरांना पकडण्यासाठी तैनात करण्यात आले होते. मृत विकासने पाच प्रेम विवाह केले असल्याचे सांगण्यात आले असून हे देखील सांगण्यात आले की, मृताने आपली पहिली पत्नीची ओळख नोकर म्हणून इतर बायकांसमोर ठेवली. यामुळे कंटाळलेल्या मृताच्या पहिल्या पत्नीने हत्येचा कट आखला. त्यानंतर बावली गावात गुन्हेगारी विश्वात नुकत्याच दाखल झालेल्या दोन शूटर्सना त्या महिलेने संपर्क साधला. यानंतर त्या दोन शूटर्सनी हत्येची सुपारी घेऊन गुन्हा घडवून आणला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

Web Title: 5 Husband's unfortunate end after love marriage; The first wife gave the Rs 1 crore to do murder her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.