नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 04:19 PM2020-06-24T16:19:55+5:302020-06-24T16:22:23+5:30

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या हत्येचा गुंता अद्याप सुटलेला नाही. 

Half-naked woman's body found in fridge, possibility of rape and brutal murder | नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी सायंकाळी उशिरा यमुनानगरच्या रेल्वे वर्कशॉप कॉलनीमध्ये राहणाऱ्या ५७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मृत महिलेचे घर सील केले आहे. घरातील सर्व सामानही इतरत्र पसरलेलं दिसून आलं.

यमुनानगर -  हरयाणामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलीस देखील या घटनेने चक्रावून गेले आहेत. मंगळवारी सायंकाळी उशिरा यमुनानगरच्या रेल्वे वर्कशॉप कॉलनीमध्ये राहणाऱ्या ५७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही महिला घरी एकटी राहत होती. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. थरारक बाब म्हणजे महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले होते. नग्न अवस्थेत मृतदेहाचा एक भाग फ्रिजमध्ये तर दुसरा फ्रिजच्या बाहेर फेकण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या हत्येचा गुंता अद्याप सुटलेला नाही. 

पोलिसांनी मृत महिलेचे घर सील केले आहे. घरातील सर्व सामानही इतरत्र पसरलेलं दिसून आलं. या महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ५७ वर्षांची ही महिला रेल्वे वर्कशॉपच्या कॅन्टीनमध्ये काम करत होती. गेले दोन - तीन दिवस महिलेच्या घरातून शेजाऱ्यांना हालचाल न दिसल्याने त्यांनी पोलिसांनी कळवले. नंतर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नग्न अवस्थेत महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे केलेले आढळले. एक फ्रिजमध्ये तर दुसरा मृतदेहाचा भाग बाहेर पडला  होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण

 

धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

 

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

Web Title: Half-naked woman's body found in fridge, possibility of rape and brutal murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.