मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी, कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 09:41 AM2024-04-26T09:41:52+5:302024-04-26T09:42:39+5:30

Mumbai Coastal Road Project: मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Erection of the Mumbai coastal road arch bridge connecting Bandra Worli sea link completed successfully today | मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी, कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी, कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबई-

मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबईतील कोस्टल रोडवरून थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता यावा, यासाठी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी पिलर ७ आणि ९ च्या मध्ये देशातील सर्वांत मोठा आणि ३० बोइंग जेट वजनाइतका दोन हजार टनांचा ‘बो आर्क गर्डर’ यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे. 

संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला हा गर्डर समुद्रमार्गे वरळीच्या समुद्रात आणण्यात आला. अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा ताळमेळ राखत शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी या गर्डरचे पिलरला जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील १०० वर्ष टिकेल इतका मजबूत गर्डर असल्याचे पालिकेने सांगितले आहे. १३६ मीटर लांब असलेल्या या गर्डरमुळे कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक अंतर जोडले जाणार असून दक्षिणेकडील बाजूच्या चार लेन सज्ज होतील.

प्रियदर्शनी पार्क ते वरळीदरम्यान कोस्टल रोड मे अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वेगाने काम सुरू आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यासाठी दोन हजार टन वजनाचा गर्डर बसविण्यात आला आहे. 

कोस्टल रोड आणि सी लिंकदरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर ८५० मीटर रुंद आणि २७० मीटर रुंद आहे. त्यामुळे वरळी येथे कोस्टल रोडला सी-लिंकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे वांद्रे येथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

Web Title: Erection of the Mumbai coastal road arch bridge connecting Bandra Worli sea link completed successfully today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई