Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : आयटकचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:01 PM2024-04-11T17:01:30+5:302024-04-29T18:38:07+5:30

Maharashtra Lok Sabha elections 2024: Seats, schedule Live Updates : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये आता प्रचाराचा धुरळा उडेल. या सर्व घडामोडींचे अपडेट्स...

maharashtra lok sabha election 2024 48 constituency live updates | Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : आयटकचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : आयटकचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा

Maharashtra 48 constituency 2024 Lok Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. गेल्या दोन वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राज्याचा कौल महायुतीला मिळेल की महाआघाडीला, हे सांगणं कठीण झालंय. त्यामुळे दोन्हीकडून जोरदार प्रचार, हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत.

LIVE

Get Latest Updates

11:00 PM

मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर दगडफेक

मुंबई : मिहीर कोटेचा यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक झाल्याची घटना घढली आहे. ही तिसरी घटना आहे. कोटेचा आणि कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी देवनार पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, ज्या रथावर उमेदवार मिहीर कोटेचा होते त्या रथावर दगडफेक करण्यात आली आहे. 
 

06:22 PM

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघातील सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले

छत्रपती संभाजी नगर लोकसभा १९ मतदार संघातील सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. छाननी झाल्यावर ४४ जण रिंगणात होते आता ३७ उमेदवार रिंगणात आहेत चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली. सर्व उमेदवार किंवा त्यांचे सदस्य उपस्थितीत होते. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला ए बी फॉर्म दिलेल्या नुसार चिन्ह मिळाले. तर काही जणांना समान चिन्ह हवे होते तिथे लकी ड्रॉ पद्धतीने चिन्ह देण्यात आले. निवडणूकीचा पहिला टप्पा पार पडला तीन युनिट लागणार आहेत. ७३४४ बॅलेट युनिट लागणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत त्यांची घोषणा नोंदवून प्रक्रिया पारदर्शक पणाने प्रक्रिया पार पडली प्रत्येकाचे समाधान करूनच कामकाज झाले. आयोगाच्या सूचनांनुसार प्रक्रिया पार पडली. रिक्षा आणि रोड रोलर कपाट या चिन्हांसाठी लकी ड्रॉ झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप स्वामींनी दिली.

05:43 PM

आयटकचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा

कल्याण लोकसभेसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. १ मे या कामगार दिनाचे औचित्य साधत कामगार वर्गाने असे ठरवले आहे की कामगार वर्गाचा जाहीरनामा प्रकाशित करावा. आयटकचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, असे आयटक राज्य उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी सांगितले.

05:09 PM

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून राज्यात करमणूक सुरू; गिरीश महाजनांचा टोला

भाषणाच्या सुरुवातीला गिरीष महाजन यांनी भारत माता की जय जय जय श्रीरामचा नारा देत ' वातावरण निर्मिती केली. त्यानंतर ना. महाजन म्हणाले की, धुळ्यातआज उमेदवारी भरताना गर्दीचे सारे रेकॉर्ड तुटले आहे. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफाट कार्य केले. म्हणूनच तिसऱ्यांदा देश त्यांच्या पाठिशी उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अस्मितेचे प्रश्न मार्गी लावले. धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, सध्या काँग्रेस तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून राज्यात करमणूक सुरू आहे. महिलांना १ लाख देवू, असे करू, तसे करू अशा घोषणा ते देताहेत. परंतु, त्यांनी दहा उमेदवार उभे केल्यावर दोन जणही निवडून येणार नाहीत; असा टोलाही ना. गिरीष महाजन यांनी लगावला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

04:24 PM

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा ग्रामीण भागात प्रचाराचा जोर

हतनूर ग्रामस्थांशी संवाद साधून धनुष्यबाणाला मतदान करण्याचे शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी केले आवाहन. शिवसेना - भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस - मनसे - आर पी आय आठवले गट, रासप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष (क)- प्रहार संघटना महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघांचे उमेदवार संदीपान भुमरे यांना विजयी करण्यासाठी शिवसेना महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी हतनूर, ता. कन्नड येथील जाहीर सभेत येणाऱ्या 13 तारखेला धनुष्यबानालाच मतदान करण्याचे आवाहन केले. जास्तीत जास्त मताधिक्य कन्नड तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा सर्वच नेत्यांनी निर्धार केला.
 

04:20 PM

स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या अपमानाचा बदला मतदार २० तारखेच्या निवडणुकीत घेतील: राहुल शेवाळे

बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायची संधी तिसऱ्यांदा मला याठिकाणी मिळाली. महायुतीतील घटक पक्षांचे मी याठिकाणी आभार मानतो. आशिर्वादरुपी महाशक्ती दर्शन तुम्हाला या रॅलीच्या माध्यमातून घडले असेलच. स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या अपमानाचा बदला मतदार 20 तारखेच्या निवडणुकीत त्याचा बदला घेतील, असे दक्षिण मध्य मुंबई महायुती उमेदवार राहुल शेवाळे म्हणाले.
 

04:09 PM

ओबीसी बहुजन पार्टीकडून मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

ओबीसी बहुजन पार्टीकडून मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे व कल्याण-डोंबिवली हा ओबीसीचा जिल्हे म्हणून ओळखले जातात त्यामुळे माझा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार  मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी दिली आहे.

03:49 PM

मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार

मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता समाजाच्या भावनेचा आदर करत तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार माघार घेत असल्याचे गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे. गंगाधर काळकुटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बीड लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एकच खळबळ उडाली होती. परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाज भावनेचा आदर करून आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

03:24 PM

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव

शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेत खासदार श्रीकांत शिंदे आले असता बाहेरच असलेला शिव वडापावचा आनंद घेतला आहे. श्रीकांत शिंदेंसोबत कार्यकर्त्यांनी देखील वडापाव खाल्ला आहे.

03:04 PM

कल्याणमधून राईट टू रिकॉल पार्टीच्या वतीने अमित उपाध्याय यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

कल्याण लोकसभा मतदारसंघातून राईट टू रिकॉल पार्टीच्या वतीने अमित उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मुदत संपण्याआधी बडतर्फ करण्याचा मतदारांना अधिकार असतो तसेच वोट देणारा वोट वापसी पासबुक कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे मतदारांना त्यांचे अधिकार आणि त्यांचा आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आपण ही निवडणूक लढत असल्याचे उमेदवार अमित उपाध्याय यांनी सांगितले आहे.

02:51 PM

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सभेचे आयोजन

ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजन विचारे म्हणाले की गेली १० वर्ष काम करण्याची संधी दिली. मी अनेक विकासकामे केली. काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर आजची रॅली विजयाची रॅली वाटत होती असे यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच यंदा निष्ठावान वाघाची आणि गद्दारांची लढाई आहे, सर्वांत जास्त लीड घेतल्या शिवाय राहणार नाही असे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.
 

02:28 PM

ठाकरे गटाकडे १३ आमदार आहेत त्यातील ५-६ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत: उदय सामंत

रत्नागिरी शहरामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा सभा प्रभागनिहाय झाल्या आहेत. प्रत्येक सभेला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचे मताधिक्य रत्नागिरी जिल्हा नक्की देईल. नारायण राणे यांना लोकसभेत नक्की पाठवू. भारताच्या जनतेने ठरवले आहे की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. ठाकरे गटाकडे १३ आमदार आहेत त्यातील ५-६ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, २-३ खासदार आहेत ते पण संपर्कात आहेत. काही वर्षांपूर्वी हेच लोकं सांगत होते की जगातील नेते नरेंद्र मोदींसारखा असला पाहिजे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.

01:45 PM

कोल्हापूरच्या सभास्थळी एक लाख लोक होते: उदय सामंत

कोल्हापूरच्या सभास्थळी एक लाख लोक होते. त्यामध्ये युवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. साळवी स्टॉपच्या कॉर्नरला उभाठा गटाला सभा घ्यावी लागते. उद्धव ठाकरे गटाकडे युवकांची ताकद नाही. फसलेली टिम कॉर्नर सभेला, फक्त शिव्या घालण्याचा कार्यक्रम होता, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली.

01:43 PM

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून फॉर्म भरला: शांतिगिरी महाराज

आमच्या लोकसभेच्या मंडळींना निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक निवडणूक जनताजनार्दन कमिटीच्या मार्फत होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून फॉर्म भरला. हा निर्णय आमच्या कमिटीने घेतला. मुख्यमंत्र्यांनी आमचे सगळे मुद्दे शांततेने ऐकून घेतले. ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो. प्रभू रामाच्या हातात धनुष्य आहे त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील. आम्ही महायुती चे उमेदवार या संदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. भक्त परिवाराने विडा उचलला या वेळेला लढायचे आणि जिंकायचे. आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, असे शांतिगिरी महाराज म्हणाले.

01:21 PM

महाविकास आघाडीच्या रॅलीला सुरुवात

महाविकास आघाडीच्या रॅलीला सुरुवात,उबाठा चे नाशिक उमेदवार राजाभाऊ वाजे, तर दिंडोरी चे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

01:10 PM

महायुती अडचणीत आहे, जनतेत प्रचंड रोष आहे: बाळासाहेब थोरात

महायुती अडचणीत आहे, जनतेत प्रचंड रोष आहे. उमेदवारीचा निर्णयच ते घेऊ शकत नाहीत. देशातच परिस्थिती बदलली आहे, भाजप विरोधी लाट आहे. महाराष्ट्रात ४० च्या आसपास महाविकास आघाडी जाऊन पोहोचेल. जनतेचा रोष देशभरात आहे. मोदी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, बेरोजगारी, महागाई, लोकांच्या समस्या यावर मोदी बोलत नाहीत. या देशाचे दुर्देव असे आहे की पंतप्रधान धर्मावर बोलतात, त्यांना वाटते की, धर्मावर बोलले की मत मिळतील. पंतप्रधान देशाचे आहेत. आतापर्यंत काय काम केले पुढे काय करू यावर बोलले पाहिजे. धार्मिक मुद्द्यावर ते बोलतात, मुस्लिम विरोधात बोलले कि हिंदू गठीत होतील असे त्यांना वाटते. गावाच्या पारावरच्या सारखे ते बोलतात, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

01:02 PM

तुम्ही आम्हला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू असा फडणवीस यांनी शब्द दिला आहे: अभिजित पाटील

कारखान्याची साखर जप्त झाली आहे, हा विषय मी त्यांच्या फडणवीस यांच्या कानावर घातला. त्यामुळे कारखान्यासाठी मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. फडणवीस यांनी कारखान्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि ते आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा आहे. भाजप प्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केलेली नाही. तुम्ही आम्हला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू असा फडणवीस यांनी शब्द दिला आहे. ते आम्हाला मदत करत असतील तर लोकसभेला आम्ही देखील त्यांना मदत करू. अभिजित पाटील यांनी अप्रत्यक्षपने लोकसभा निवडणुकीत भाजपाला मदत करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.

01:00 PM

आम्ही राम राम करणारच: देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

आम्ही राम राम केल्याचा एवढा राग ठाकरे गटाला का आहे, भारतात राम राम करायचे नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का, असा सवाल करत, आम्ही राम राम करणारच. राम रामचे नारे आम्ही देणारच. ठाकरे यांनी या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे की, ते म्हणजे महाराष्ट्र आहे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

12:59 PM

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ युवा मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट), मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे अत्यंत जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरातील सर्व प्रभाग स्तरांवर आणि गावागावांत घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. याच प्रचाराचा एक भाग म्हणून युवा आणि नवमतदारांना संबोधित करण्यासाठी या युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विशेषतः नारायण राणे यांच्या अखत्यारीतील एमएसएमई मंत्रालयाने युवकांसाठी आणलेल्या योजना आणि यापुढील प्रस्तावित योजना याविषयी युवकांना संबोधित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. काही वेळातच महायुतीचे उमेदवार नारायण राणे मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

11:30 AM

PM मोदींच्या महाराष्ट्रात तीन सभा

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात... पुणे, सोलापूर आणि कराडमध्ये जाहीर सभा... 

11:29 AM

नाशिकमध्ये मविआचे शक्तिप्रदर्शन

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार... संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करणार... 

11:26 AM

शिंदे सेना - उद्धव सेना येणार आमनेसामने

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन उमेदवार - अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) आणि अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई) आज अर्ज भरणार... आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत निघणार रॅली... त्याचवेळी शिवसेना - शिंदे गटाचे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळेही अर्ज दाखल करणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन...

08:13 PM

बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप रविवारी झाला. यावेळी बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर आले. दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नसते, असे विधान केले होते. त्यावर जरांगे यांनी माझ्या नादी लागू नका, असा इशारा दिला होता. त्यावर पंकजा यांनी याचा खुलासाही केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच रविवारी दुपारी हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले. 

10:56 PM

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला भारत बळकट करायचा आहे: रामदास आठवले

ही विकासाची निवडणूक आहे एकीकडे देशाचा विकास रोखणारे लोक आहेत तर दुसरीकडे देश विकासाकडे नेणारे लोक आहेत. यांच्यात होणारी ही निवडणूक ही महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, पुन्हा एकदा देशाला बळकटी देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी आपण निवडून दिले पाहिजे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आमदार आठवले यांनी केले आहे. राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो यात्रा करतात तर दुसरीकडे हाच भारत देश तोडायची भाषा देखील करतात. त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन करायचे असून, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना, भरघोस मतांनी विजयी करून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

10:04 PM

विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीत मशाल रॅली

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी शहरामध्ये मशाल रॅलीचे आयोजन केले गेले होते. या रॅलीमध्ये युवा सेना सचिव वरून सरदेसाई हे सहभागी झाले होते. त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या मशाल रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये विनायक राऊत यांचे पोस्टर्स व मशालीच्या प्रतिकृती चे पोस्टर्स आणि मशाली घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

09:37 PM

कोल्हापुरातील महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील: एकनाथ शिंदे

कोल्हापुरातील महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. लाखोंच्या संख्येने लोक या सभेला उपस्थित राहतील. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले आहे. महायुतीला मोठा प्रतिसाद मतदारांनी दिला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

09:15 PM

देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय; संजय राऊतांचा सवाल

देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुःख मोदी-शाहांना कळणार नाही. मोदी आणि शाह महाराष्ट्राबद्दल सुडाचे राजकारण करतात. मोदी आणि शाहांना महाराष्ट्राचा राग आहे. देशाच्या लढ्यात महाराष्ट्र सदैव पुढे असतो. म्हणून मोदी-शाह महाराष्ट्राला घाबरतात. यांची सत्ता उलथून टाकण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. एकदा ठिणगी पडली की वणवा भडकतो. महाराष्ट्र लुटून सर्वकाही गुजरातला चालले. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरु आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
 

08:55 PM

उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मतदार मोदींच्या छबीकडे पाहून मतदान करतील: दिनेश शर्मा

महायुतीने मुंबईत अजूनही तीन ठिकाणी उमेदवार दिला नसला त्याने काही फरक पडत नाही. मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी पाहून मतदान करतात, असा विश्वास उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांनी व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांच्या प्रचारासाठी ते कांदिवलीत आले होते. मतदारसंघातील उत्तर भारतीय बहुल भागात त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, मुंबईतील उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने भाजपला मतदान करण्याकरिता रस्त्यावर उतरेल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) भाजपाला मनापासून साथ देत आहे. त्यांची साथ भाजपला लाभल्याने आमचा उत्तर भारतीय मतदार दुखावण्याची शक्यता नाही, असा विश्वास शर्मा यांनी वर्तवला.

08:31 PM

गोदामातील साहित्याचा लोकसभा निवडणूक प्रक्रियेशी संबंध नाही: अशोक शिनगारे

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गोदामात सापडलेल्या निवडणूक विषयक साहित्यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे. या गोदामातील साहित्याचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

08:31 PM

उल्हासनगर शहरात महिला महामेळाव्याचे आयोजन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्हा व महायुतीच्यावतीने, उल्हासनगर खेमानी येथील एस.ई.एस शाळेच्या मैदानात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा महामेळावा आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला व पुरुष नागरिक उपस्थित आहेत.

08:21 PM

काँग्रेसचे नसीम खान यांचा राजीनामा

 काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून माजी मंत्री नसीम खान यांचा राजीनामा. वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने नाराज.

07:48 PM

ही निवडणूक भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी लढाई : वर्षा गायकवाड

काँग्रेस पक्षाचे खूप आभार व्यक्त करते त्यांनी पुन्हा एकदा संधी दिली. देशाच्या संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष असणार आहे. भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई आहे. यावेळी जनतेलाच उतरावं लागेल मैदानामध्ये आणि आम्हाला खात्री आहे जनता सुज्ञ आहे. जनता जशी सरकार बनवते तसेच जनता सरकार खाली देखील खेचू शकते हे यावेळी दिसेल. - वर्षा गायकवाड
 

06:42 PM

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायं. ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

वर्धा- ५६.६६ टक्के
अकोला- ५२.४९ टक्के
अमरावती- ५४.५० टक्के
बुलढाणा- ५२.२४ टक्के
हिंगोली- ५२.०३ टक्के
नांदेड- ५२.४७ टक्के
परभणी- ५३.७९ टक्के
यवतमाळ-वाशिम- ५४.०४ टक्के

05:53 PM

वर्ध्यात ५ वाजेपर्यंत झालेले मतदान,...

वर्ध्यात ५ वाजेपर्यंत झालेले मतदान,...
धामनगाव - ५३.५८
मोर्शी - ५७.६०
आर्वी - ६०.५८
देवळी - ५७.११
हिंगनघाट - ५५.४८
वर्धा - ५६.०६

05:51 PM

बुलढाणा लोकसभा : दुपारी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 

बुलढाणा : ४२.६७
चिखली: ५३.२१
जळगाव जामोद: ४९.५५
खामगाव: ५५.८३
मेहकर: ५८.७२
सि. राजा:  ५३.३१
एकूण:- ५२.२४

05:50 PM

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदान झाले.

यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी

दिग्रस : 57.06 टक्के
कारंजा : 50.41 टक्के
पुसद : 53.18 टक्के
राळेगाव : 61.50 टक्के
वाशिम : 53.81 टक्के
यवतमाळ : 49.46 टक्के

05:14 PM

400 खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे देखील असतील हा शब्द देतो- उदय सामंत

राणे साहेबांनी कोकणाला न्याय दिलेला आहे. 400 खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे देखील असतील हा शब्द देतो. पुढच्या वर्षी रत्नागिरी विमानतळावरून टेक ऑफ होईल. स्वतःची निवडणूक आहे असं समजून प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे - उदय सामंत

04:37 PM

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर साभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभास्थळी आगमन 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा राजापूर येथील राजीव गांधी क्रीडांगणावर होत आहे. सभास्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उपस्थित आहेत.

04:34 PM

चिन्ह कुठलं असलं तरी महायुती म्हणून मतदान होतं त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील- दिपक केसरकर 

चिन्ह कुठलं असलं तरी महायुती म्हणून मतदान होत असतं त्यामुळे नारायण राणे साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीस साहेबांचा राहिलेला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे साहेबानी काम केलेलं आहे - केसरकर

04:33 PM

 नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतिगिरी महाराजांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाचा पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणे झाले आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झाली आहे असे यावेळी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे. 

03:12 PM

भावना गवळींनी बजावला मतदानाचा अधिकार

खासदार भावना गवळी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. वाशिमच्या राजेंद्र प्रसाद विद्या मंदिर परिसरातील शाळेत असलेल्या मतदान केंद्रात जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.

02:58 PM

ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांची अडचण

वर्धा : लोकसभा मतदार संघात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदानाला विलंब झाला. त्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागले. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाटमधील रामनगर वॉर्डातील मतदान केंद्र क्रमांक २३१ येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने तब्बल दीड तास मतदारांना रांगेत उभे राहावे लागले. 

02:32 PM

बुलढाण्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०७ टक्के मतदान 

खामगाव : ३१.६४
जळगाव जामोद : २१.३५  
बुलढाणा : २५.४३
चिखली : २७.८६
मेहकर : ३६.४९
सिंदखेडराजा : ३१.४०
एकुण : २९.०७

02:12 PM

राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजता पर्यंत ३१.७७टक्के मतदान

अकोला: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून सकाळी दुपारी १ वाजता पर्यंत राज्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.  दुपारच्या वाढणाऱ्या उन्हाचा अंदाज बघता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली . ११ वाजेपर्यंत सर्वच मतदार संघाची रांगच रांग होती. त्यामुळे अकरा वाजता पर्यंत १८ .८३ टक्के मतदान झाले होते .दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ -वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

02:05 PM

यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदाना न करण्यासाठी पैसे वाटप

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशांचे वाटप केल्या जात होते. विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला.

01:43 PM

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 1 वाजतापर्यंत 31.47 टक्के मतदान

सकाळी 7 ते 1 वाजता दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

दिग्रस : 34.45
कारंजा : 31.00
पुसद : 31.43
राळेगाव : 35.85
वाशिम : 33.30
यवतमाळ : 23.86

01:30 PM

मतदान यादीत नाव नसल्याने अनेकांचा भ्रमनिराश!

सिंदखेडराजा: स्थानिक मतदार यादीत नाव मिळून येत नसल्याने अनेक मतदारांचा भ्रमनिराश झाल्याचे चित्र आज सकाळ पासून पाहायला मिळाले.आपल्याला मतदान करता येत नसल्याने अनेकांनी प्रशासनावर आपला राग व्यक्त केला. दरम्यान,अनेकांनी मोबाईल अप वर देखील आपले नाव आहे का याची शहानिशा केली मात्र अनेकांना नावे मिळाली नाही. दरम्यान,प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

01:28 PM

अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रावर घोळ

अकोल्यात सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. मात्र, अनेकांची मतदार यादीत नाव नसल्यानं मतदारांना आल्या पावली माघारी जावं लागलं. अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रांवर हा घोळ दिसून आला.

12:26 PM

वाशिम जिल्ह्यात ११ वाजतापर्यंत १९ टक्के मतदान

वाशिम : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात लोकसभा निवडणूकीसाठी २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रियेला थाटात सुरूवात झाली. ११ वाजतापर्यंत तीन विधानसभा मतदारसंघातील १९ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. ऊन्ह तापताच मात्र मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

12:24 PM

अमरावतीत सकाळी ११ पर्यंत १८ टक्के मतदान

अमरावती : लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी  ११ वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने मतदारांनी केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी वाढण्याची शक्यता आहे.

12:11 PM

मतदानासाठी सिंगापूरहून गाठले अकोला

अकोला : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असतानाही अनेक जण मतदानाच्या दिवशी सुटीचा आनंद उपभोगत मतदानाकडे पाठ करतात. अकोला येथील एका युवकाने मात्र राष्ट्रीय कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत थेट सिंगापूर येथून अकोल्याला येत मतदानाचा हक्क बजावला. येथील युवा मतदार परिमल असनारे शिक्षणानिमित्त सिंगापूर येथे असतात. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते बजावलेच पाहिजे या भावनेतून ते अकोल्यात परत आले. 

12:02 PM

राज्यात आठ जागांसाठी ११ वाजेपर्यंत १८.३३टक्के मतदान

राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.३३टक्के मतदान झाले आहे. तर परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१.७७ टक्के मतदान झाले आहे.

11:49 AM

अकोल्यात 11 वाजेपर्यंत 17.37 टक्के मतदान

अकोला पूर्व - 14.25 टक्के
अकोला पश्चिम - 16.07
अकोट - 16.27
बाळापुर : 19.50
मूर्तिजापुर- 19.47
रिसोड- 19.14 टक्के

11:48 AM

बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.९२ टक्के मतदान 

बुलढाणा : लाेकसभेच्या बुलढाणा मतदार संघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. सकाळी मतदानात वाढ झाली आहे.  बुलढाणा सहा विधानसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले हाेते. त्यानंतर आता मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून ११ वाजेपर्यंत १७.९२ टक्के मतदान झाले आहे. 

11:46 AM

यवतमाळ-वाशिममध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान झाले. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान खालील प्रमाणे...

दिग्रस : 20.22
कारंजा : 27.22
पुसद : 18.69
राळेगाव : 20.85
वाशिम : 20.26
यवतमाळ : 11.56

11:27 AM

उमेदवार दिनेश बुब यांनी केलं मतदान

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी आज अमरावतीच्या नेहरू शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

10:49 AM

सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची 7.45 टक्केवारी

वर्धा 7.18 टक्के मतदान

अकोला 7.17 टक्के मतदान

अमरावती 6.34 टक्के मतदान

बुलढाणा 6.61 टक्के मतदान

हिंगोली 7.23 टक्के मतदान

नांदेड 7.73 टक्के मतदान

परभणी 9.72 टक्के मतदान

यवतमाळ-वाशिम 7.23 टक्के मतदान .

10:46 AM

वर्ध्यात अमर काळेंनी बजावला मतदानाचा हक्क

वर्धा लोकसभा मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी आर्वी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी त्यांच्या पत्नी देखील सोबत होत्या. देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक असल्याने सर्वांनी मतदान करावे. ही लोकशाही वाचविण्याची निवडणूक आहे, असं अमर काळे यांनी म्हटलं आहे.

10:39 AM

आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

खामगाव: लोकशाहीचा लोकोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शुक्रवारी स्वतःच्या लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावून एका नवरदेवाने आधी लग्न लोकशाहीचे असा असा प्रत्यात मतदानाचा हक्क बजावला. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे लग्न पूर्वी नवरदेवाने मतदान केले. 

10:22 AM

अकोटमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड

अकोला : अकोट विधानसभा मतदारसंघातील तीन ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मतदान केंद्र ३३३ वरील ईव्हीएममध्ये मध्ये बिघाड झाला तर अकोट शहरातील मतदान केंद्र क्रमांक १५१, १५२ वर मॉक पोल घेताना मशीनमध्ये बिघाड दिसून आला. त्यामुळे वरील तिन्ही ठिकाणी दुसऱ्या मशीन नव्याने लावण्यात आल्या.

10:19 AM

खामगाव विधानसभा मतदारसंघात सकाळच्या टप्प्यात ५.७९ टक्के मतदान 

खामगाव : खामगाव विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ५.७९ टक्के मतदान झाले. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची रांग लागली होती. खामगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार २८९९९२ आहेत. त्यापैकी पुरूष मतदार १५२९६८ असून महिला मतदार १३७०२० आहेत. यापैकी १२२१० पुरूष व ४५८६ महिला मतदारांनी पहिल्या टप्प्यात मतदान केले. पहिल्या टप्प्यात ५.७९ टक्के मतदान झाले. 

10:19 AM

वरवट बकाल मतदान केंद्रावरील  ईव्हीएम मशीन ३० मिनिटे बंद!

वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील १७३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजून १० मिनिटाच्या सुमारास जवळपास ३० मिनिटे ईव्हीएम मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद होती. केंद्रावरील नेमणूक अधिकारी यांनी प्रयत्न करून जवळपास ३० मिनिटांनी मशीन दुरूस्त केली. ३० मिनिटांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यास  सुरूवात झाली. 

10:09 AM

अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात

अमरावती : लोकसभा मतदारसंघातील १९७५ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी ७ पासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. रात्रीपासून अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमी होती. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यत ६.३४ टक्के मतदान झाले. 

10:09 AM

अकोल्यात नऊ वाजेपर्यंत 7.17 टक्के मतदान

अकोला मतदार संघात पहिल्या दोन तासात सकाळी नऊ वाजेपर्यंत 7.17 टक्के मतदान

10:08 AM

यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजतापर्यंत 7.23 टक्के मतदान झाले.

10:07 AM

नांदेडमध्ये ऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

नांदेड मतदारसंघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

10:05 AM

वेब कास्टिंगद्वारे मतदान केंद्रांवर प्रशासनाची नजर !

वाशिम : वाशिम जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू झाली असून येथील सर्व मतदान केंद्रांवर जिल्हा प्रशासनातील अधिकारी वेब कास्टिंगच्या माध्यमातून निरीक्षण व नियंत्रण करत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अपूर्वा बासुर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके वेब कास्टिंग रूम मध्ये उपस्थित आहेत.

09:56 AM

वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी बजावला मतदानाचा हक्क

वाशिम : वाशिम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी २६ एप्रिल रोजी सिविल लाईन्स येथील लॉयन्स विद्या निकेतन शाळा या मतदान केंद्र क्रमांक २२६ येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी करण्यात आलेली सजावट आणि स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांनी बूथ ऑफिसर यांचे कौतुक केले. 

09:55 AM

बुलढाण्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६. ६१ टक्के मतदान 

बुलढाणा लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६. ६१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये खामगाव विधानसभा मतदार संघात ५. ७९ टक्के, चिखली ९. ७० टक्के, जळगाव जामोद ३. १९ टक्के, बुलढाणा ४. ४२ टक्के, मेहकर ९.०७ टक्के आणि सिंदखेड राजामध्ये ७. ४० टक्के मतदान झाले आहे.

09:48 AM

अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी नऊ वाजता पर्यंत ७.१७ टक्के मतदान

अकोला :  अकोला मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात उत्साहात मतदान सुरू झाले असून सकाळी नऊ वाजता पर्यंत ७ १७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे .
दुपारी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता लक्षात घेता सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे बघावयास मिळत आहे. 

09:21 AM

प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

वंचित बहुजन आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्यासह अकोल्यात मतदानाचा हक्क बजावला.

09:19 AM

नवरदेव मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर

महाराष्ट्रातील अमरावती येथील नवरदेव मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाला. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.

09:07 AM

अमरावतीमध्ये मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड

 

अमरावतीच्या रुक्मिणी नगरमध्ये मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड, एक तास मतदार रांगेत

08:59 AM

महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी पळसो मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

अकोला: अकोला लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार पुत्र अनुप धोत्रे यांनी त्यांच्या पळसो येथील गावी जाऊन सकाळी ७ वाजता सपत्नीक मतदान केले.

08:34 AM

नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

अकोला मतदारसंघ तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नवरदेव राहुल महादेवराव सोळंके रा.दहिगाव यांचे सरपंच रविकिरण काकड, पोलीस पाटील अरविंद अवताडे तलाठी संदीप ढोक यांनी स्वागत केले.

08:31 AM

ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले

देवळी (वर्धा): वर्धा लोकसभेचे उमेदवार खासदार रामदास तडस हे परिवारासह देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या १८५ क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान करायला पोहोचले. अगदी सुरवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान ४० मिनिट खोळंबले. सकाळी सव्वापाच वाजता संबंधित केंद्रावरील मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार मशीन दुरुस्त करण्यात आले होते. 

09:33 PM

“उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा, संजय राऊतांना नाही”; फडणवीसांचा टोला

विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपला देश कोणाच्या हातात द्यायचा त्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एकीकडे पर्याय नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याबरोबर महायुतीमधील सर्व पक्ष आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांच्यामागे २६ पक्षांची खिचडी आहे, या शब्दांत भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. 

08:39 PM

मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, महाविकास आघाडीने  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे.  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे. 

05:17 PM

'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मत असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती, अखेर ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली.  काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी बंडखोरी केली. यामुळेआता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे, आज काँग्रेसने सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेश दिले, तर आमदार विश्वजीत कदम यांनी या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील म्हणाले. 

04:16 PM

'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी(दि.26) उत्तर प्रदेशातील आठ जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. संविधान धोक्यात असल्याच्या INDIA आघाडीच्या आरोपांना पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर दिले. संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पदोपदी अपमान करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

01:43 PM

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस; २९ एप्रिलपर्यंत उत्तर मागवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आचारसंहिता उल्लंघनाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. आयोगाने २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.

11:00 AM

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल- विनायक राऊत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष माझ्या बाजूने आहेत. उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिलला रत्नागिरी सभा होईल. 3 मे रोजी कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील. या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. 

10:52 AM

मुख्यमंत्री यांना अडचण होती, त्यांनी मला गुडफेथमध्ये शिरुरमधून लढता का विचारले होते. - छगन भुजबळ

शिरुरमध्ये ओबीसी आणि माळी समाज जास्त आहे तुम्ही तिथून लढता का ? असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारले होते. त्यांचा हेतू हा होता की मी तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल. एक चांगला हेतू होता ते प्रयत्न करणारच. - मी सांगितले की ओबीसी समाज महाराष्ट्रात आहे. माझा संबंध नाशिकला, सगळे पालकमंत्री, आमदार नाशिकला. मी काही मागितलं नाही, नाशिक सोडून मला पाहिजे म्हणून मी कुठेही उभा राहणार ही माझी वृत्ती नाही. त्यामुळे शिरूर ला लढण्याचा प्रश्नच येत नाही, असे छगन भुजबळ यांनी अमोल कोल्हेंच्या दाव्यावर स्पष्ट केले. 

10:35 AM

गॅस सिलेंडरची किंमत 500 रुपयांपर्यंत आणणार, सबसिडी देणार; शरद पवारांकडून जाहीरनामा प्रकाशित

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मर्यादित करणार.
केंद्र सरकारमध्ये रिक्त असलेल्या 30 लाख जागा भरण्याचा आग्रह करणार.  
महिलांना शासकीय नोकरीत 50 टक्के आरक्षण देणार.
डिग्री आणि डिप्लोमा पास झाल्यावर विद्यार्थ्याला साडेआठ हजार शिष्यवृत्ती देणार
शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर. त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू
अग्निवीर योजना आम्ही बंद करू, प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ
 

10:00 AM

शरद पवार आज जाहीरनामा प्रकाशित करणार

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत. यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

05:42 PM

सोनिया गांधीच्या भीतीमुळे हे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाही! अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान, केंद्रीय अमित शाह यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

"हे स्वत:ला शिवसेनेचे अध्यक्ष मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. पण, हे नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण शरद पवार यांनाही दिले होते, पण त्यांनी तब्येतीचे कारण सांगत आले नाहीत. पण आता शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात फिरत आहेत, असंही अमित शाह म्हणाले. 

11:05 PM

शरद पवारांच्या उपस्थितीतील प्रचार सभेने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब केले: अनंत गीते

सभा प्रचाराची सभा नाही तर विजयाची सभा आहे. शरद पवार यांच्या उपस्थिती मधील प्रचार सभेने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष माझ्या निवडणूक प्रचारात आघाडीवर आहेत. ही निवडणूक एकतर्फी होईल, असा दावा ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी केला.

10:55 PM

या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल: नारायण राणे

या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल. लोकसभा निवडणूक झाली की 16 पैकी दहा आमदार शिंदेंच्या गटात जातील. विनायक राऊत खासदार झाले तर त्यांना काय मिळणार? मी खासदार झालो तर मला कॅबिनेट मिळेल केंद्रात चारशे खासदार निवडून नेणार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, असे नारायण राणेंनी म्हटले आहे.

09:11 PM

भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले

महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मात्र, उद्धव ठाकरे यांचे संबोधन सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. मात्र, भर पावसात उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. मोदी-शाह यांचा नोकर असलेला निवडणूक आयोग आहे, त्यांनी आपल्या प्रचारगीतातील जय भवानी शब्द काढायाला सांगितला आहे. तुमचा जो महाराष्ट्राबाबत आकस आहे, त्याचा आम्ही फडशा पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचे आहे ना, पाहा प्रयत्न करून, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिले. आम्हीही जय श्रीराम असा जयघोष करतो. पण जय भवानी याबाबत तुमच्या मनात द्वेष आणि आकस का आहे, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.

07:57 PM

मला व उमेदवार दिनेश बुब ला अटक करण्याचा राणा दाम्पत्याचा कट होता: बच्चू कडू

आम्हाला परवानगी देऊन प्रशासनाने नाकारली. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढची भूमिका स्पष्ट करू. कायदा तोडण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. न्यायालयात जाणार पण न्यायालयावर पण शंका आहे. आचार संहिताचा भंग अमरावती पोलिसांनी केला आता जनतेने याला उत्तर द्यावं. 5 तास पोलीस आयुक्तांनी आमचा प्रचार थांबवला. दूध का दूध पाणी का पाणी करू. मला व उमेदवार दिनेश बुब ला अटक करण्याचा राणा दाम्पत्याचा प्लँन होता राणा दाम्पत्य पोलीसावर दबाव टाकत आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

07:27 PM

स्वतःच्या पक्षातील नेते आपल्याला काय म्हणत आहेत याचा नाना पटोलेंनी विचार करावा: अरुण सावंत

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाना पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करीत आहेत. स्वतःच्या पक्षातील नेतेच तुम्हाला काय म्हणत आहेत याचा नानांनी विचार करावा. काँग्रेसच्या मागील 50- 60 वर्षांबद्दल काय सांगता? मोदींच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आणि मुख्यमंत्र्यांच्या गेल्या दोन वर्षात सर्व जाती धर्माची लोक त्यांच्या कार्यावर खुश आहेत, गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तेव्हा आता खोट्या थापा मारु नका, असा पलटवार शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी केला.

07:00 PM

सांगलीमधील बंडखोरी ही पक्षाच्या हाताबाहेरील, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सांगली मधील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आज अपक्ष निवडणूक लढविण्यासंदर्भात प्रचाराचा नारळ फोडला असून, यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी धुळ्यात प्रतिक्रिया देताना काही बंडखोऱ्या या पक्षाच्या हातात राहत नाही, त्याला काही इलाज नाही असं म्हणत आता ही निवडणूक जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने होणार असं म्हणत, सांगलीतील बंडखोरी ही आमच्या हाताबाहेर असल्याचं मत व्यक्त केल आहे.

06:59 PM

कोल्हापूरच्या औद्योगिक धोरणास संपूर्ण सहकार्य; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असून नवीन औद्योगिक वसाहती स्थापण्यासह कोल्हापूरमध्ये आय.टी.पार्क उभारण्यासह सर्वंकष धोरण बनवून त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नवीन एमआयडीसीच्या माध्यमातून साडे सहाशेहे एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही ते म्हणाले.

06:57 PM

खासदारकीसाठी इच्छुक उमेदवार नेमके गेले कुठे?

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेकांनी खिंड लढविण्याची तयारी केलेली. पण, पक्षाकडून उमेदवारी न मिळणे, मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे जाणे यामुळे अनेकजण नाराज झाले. तरीही काहींनी पक्ष, आघाडी-युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. तर काहीजण अजूनही प्रचारात पूर्णपणे सक्रिय नसल्याचे दिसत आहे.

06:43 PM

लोकनेत्या म्हणून पंकजा मुंडेंकडे पहिलं जातं: डॉ. राजेंद्र शिंगणे

पंकजा मुंडे आल्याने प्रतापराव जाधव यांचे विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. लोकनेत्या म्हणून पंकजा मुंडे आपल्याकडे पहिल्या जाते.  देशाची प्रतिमा नरेंद्र मोदींमुळे झाली. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे.  महाराष्ट्राचा विकास होत आहे. कोण प्रगती करू शकतो, याची जाण ठेवणे गरजेचे आहे, असे डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.

06:42 PM

बारामतीत पराभवाची भीती; अमोल कोल्हेंची महायुतीवर टीका

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार शरद पवार आणि अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना तुतारी हे चिन्ह देऊन सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, असे सांगत बारामतीत पराभवाची भिती दिसून येते, या शब्दांत टीका शिरूर लोकसभेचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

06:40 PM

अशोक चव्हाण यांना गल्लीत पण किंमत नाही: नाना पटोले

अशोक चव्हाण यांनी मर्यादेत बोलावे. त्यांच्या खूप गोष्टी मला माहिती आहेत, त्या बाहेर काढू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. अशोक चव्हाणांना राज्याच्या राजकारणात नाही तर गल्लीच्या राजकारणातही किंमत नाही, असा टोला नाना पटोलेंनी लगावला.

06:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नखांची बरोबरी विरोधकांना येणार नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिल्ली अब दूर नही दिल्ली मे शिट्टी बजेगी, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी परभणीत विरोधकांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीत एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पडायचे काम सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नखांची सुद्धा बरोबरी विरोधकांना येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

06:20 PM

विचार करुन मतदान करावे, कारण हे आपलं शेवटचं मतदान असणार, असं माझं आवाहन: प्रियंका चतुर्वेदी

पुतिन शैलीची लोकशाही देशात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात पाठवा किंवा त्यांना आपल्या बाजूने घ्या. आधी चंदीगड, मग रामटेक, मग खजुराहो याठिकाणच्या उमेदवारांना अपात्र करण्यात आले. आता सुरत जिथं भाजपचा उमेदवार बिनविरोध आणि निवडणुकीशिवाय निवडून आला. ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे. मतदारांना आवाहन करते की, विचार करुन मतदान करावे, कारण हे आपलं शेवटचं मतदान असणार, असे खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.  

05:56 PM

गृहमंत्र्यांची कायदा तोडून सभा होत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही: बच्चू कडू

बच्चू कडू मैदान ताब्यात घेण्याकरिता सायन्स कोर मैदानात दाखल झाले होते .कडू यांनी सभा घेण्याकरिता प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन आवश्यक त्या पैशांचा भरणा केला होता. परंतू ज्यावेळी बच्चू कडू मैदानात दाखल झाले त्यावेळी मैदानात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा मंडप टाकलेला होता. परवानगी असताना राणा यांचा मंडप काढला नाही उलट पोलिसांनी मैदानात येण्यास बच्चू कडूंना मनाई केली. मैदानाची परवानगी असताना बच्चू कडूंना पोलिसांनी मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलीस सुरक्षेचा कारण सांगतात भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना ही न पटणारी गोष्ट आहे भाजपा संस्कार आणि शिस्त प्रिय पक्ष आहे. शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही रवी राणा मात्र भाजपला बदनाम करत आहेत. गृहमंत्र्यांची कायदा तोडून सभा होत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आचारसंहितेचा पूर्णपणे भंग केला जात आहे बच्चू कडू उद्याला दोन लाख लोक घेऊन सायन्स कोर मैदानात दाखल होणार राणांच्या मंडप उभा असताना सुसाट्याचा वारा आला आणि मंडप चा काही भाग खाली कोसळला बच्चू कडूंनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना हनुमानांनी प्रसाद दिला असं वक्तव्य बच्चू कडूंनी केले.
 

05:54 PM

वंचित हा लढाऊ बाण्याचा पक्ष, वंचित थांबणार नाही: सिद्धार्थ मोकळे

वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सत्ताधारी पक्षांनी धमकावल्याने अर्ज मागे घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. अशा पद्धतीने आमच्या उमेदवाराला धमकावून, अर्ज मागे घ्यायला लावून गलिच्छ राजकारण जर इथला सत्ताधारी पक्ष करत असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की, वंचित बहुजन आघाडी हा लढाऊ बाण्याचा पक्ष आहे, प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे अशा कितीही धमक्या दिल्या, धमकावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही, असे खडेबोल मोकळे यांनी सुनावले आहेत.

05:49 PM

भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये: नाना पटोले

राहुल गांधी कधीही पंतप्रधान बनू शकणार नाहीत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान हास्यास्पद आहे. राहुल गांधींनी ठरवले असते तर २००४ ते २०१४ या दहा वर्षात ते केव्हाही पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते गांधी आहेत आणि गांधी कुटुंबाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? लोकसभा निवडणुकीनंतर तुमची अवस्था काय असेल त्याची चिंता एकनाथ शिंदे यांनी करावी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची चिंता करु नये. भाजपाने सांगितले तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये, या शब्दांत नाना पटोलेंनी निशाणा साधला.

05:41 PM

विरोधक जितक्या शिव्या देतील, पंतप्रधान मोदींना तितकाच मोठा विजय मिळेल: देवेंद्र फडणवीस

विरोधक निराश झाले आहेत. पराभवाच्या भीतीने विरोधकांनी आता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केली जाते, तेव्हा पंतप्रधान मोदी यांचा विजय मोठा होतो. विरोधक मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढेच लोकांचे मोदींप्रति असलेले प्रेम वाढेल. बजरंगबली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात. आपल्या राज्यावर आणि देशावर संकटे येतात, ते दूर करण्याकरिता शक्ती मागितली आहे. तसेच आमच्यासाठी बुद्धी, तर विरोधकांकरिता सुबुद्धी मागितली आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी केलेले एक काम दाखवावे. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद होते. पंचवीस वर्ष महानगरपालिका होती. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही. यांची भाषणेही ठरलेली आहेत. उद्धव ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे बोलून दाखवू शकतो, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

05:18 PM

सतेज पाटलांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा

महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एका कार्यक्रमातील सभेतून महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. "मी सुद्धा २५ वर्ष इथं कसलेला पैलवान आहे. कोणाला कधी चितपट करायचं, हे मला माहीत आहे. येथील कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनो माझ्या नादाला लागू नये, अशा शब्दात सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.

05:00 PM

संजोग वाघेरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

04:48 PM

महादेव जानकरांसाठी उदयनराजे धावले

"माझे मित्र महादेव जानकर यांची शिट्टी ही खूण आहे. संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आपण सर्वांनी त्यांना शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून निवडून द्यावं" असं आवाहन उदयनराजेंनी केलं आहे. 

04:31 PM

अपक्ष उमेदवारालाही दिले तुतारी चिन्ह

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आहे. 

04:08 PM

लातूरमध्ये खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीत

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर लोकसभेसाठी २८ उमेदवार मतपत्रिकेवर आहेत. ३१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेस उमेदवारांत लढत होणार हे स्पष्ट झाले असले तरी वंचित फॅक्टरही चर्चेत राहणार आहे.

03:53 PM

भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल - आदित्य ठाकरे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार ही घोषणा देत भाजपा रिंगणात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनीही ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. भाजपा कदाचित चंद्रावर ४०० पार जागा जिंकणार असेल. आमच्या भारत देशात भाजपा ४०० काय २०० जागाही भाजपा पार करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

03:20 PM

नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट!

आमचा नाशिकच्या जागेवर अजूनही दावा कायम आहे, आमच्याकडे महिला उमेदवारही आहेत. आमच्याकडील लोक सतत काम करत असतात. फक्त निवडणुकीसाठी काम करत नाहीत, भाजपामध्येही उमेदवारी खूप आहेत. शिवसेनेकडेही उमेदवार आहेत, महायुतीचा कोण उमेदवार असेल त्यांचा प्रचार करणार आहे असं छगन भुजबळ म्हणाले.  

02:58 PM

मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!

"अजितदादा हे पवारसाहेबांना वडील म्हणतात. मात्र स्वत:चं व्यावसायिक साम्राज्य वाचवण्यासाठी ते आता वडिलांना सोडून भाजपसोबत गेले आहेत. २०१९ ला पार्थ पवार हे श्रीरंग बारणे यांच्याविरोधात निवडणुकीत उभा होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. अजितदादा वडील म्हणून मुलाच्या पराभवाचा बदला घेणार नसतील, पण हा भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी इथं प्रचार करण्यासाठी आला आहे" असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

02:21 PM

सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी विखेंवर - एकनाथ शिंदे

 शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत मेहनत घ्यावी लागेल असे महसूल मंत्री विखे पाटील आपल्याला म्हणाले. मात्र लोखंडेना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी विखे पाटील यांच्यावर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी राहता येथे पार पडलेल्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

01:48 PM

चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय का?, खतांच्या किंमती माहिती आहे का? खतांवर किती जीएसटी लागतो हे माहिती आहे का असे प्रश्न विचारले आहेत. 

01:27 PM

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा हजारवेळा झाली असेल, राजकारणात चर्चा होत असतात. वेगवेगळ्या निर्णयावर होत असतात, वेगवेगळ्या धोरणावर होतात. प्रश्न आहे की अंतिम निर्णय काय? अंतिम निर्णय आहे की, भाजपाबरोबर नाही हा आहे. भाजपाबरोबर जाण्यासाठी आमच्यातील काही लोकांनी चर्चा केली. काही लोक त्यांच्यासोबत गेले. त्यांना वाटतं जाण हिताच आहे, आम्हाला वाटतं जाण हिताच नाही. राजकारणात सुसंवाद ठेवला पाहिजे, सुसंवाद ठेऊन त्याच्यातून निष्कर्ष वेगवेगळे निघत असेल तर त्या निष्कर्षाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, भाजपा आणि आमची विचारधारा वेगळी आहे हाच आमचा निष्कर्ष होता. त्यामुळे चर्चा झाली आणि त्या चर्चेत दोन मत झाली - शरद पवार 

01:12 PM

उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत

सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सोळा जण निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. निवडणुकीचे चित्र यापूर्वीच स्पष्ट झाले असून, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांमध्येच दुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, चिन्हांचेही वाटप अपक्ष उमेदवारांना करण्यात आले.

12:54 PM

"उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.  "उद्धवजी…. तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीये…देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर तुम्ही लाचारीने सपशेल लोटांगण घातलंय. कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ तेवढा तुम्हाला साधायचा होता. स्वर्गीय बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

12:37 PM

वंचितच्या उमेदवारामुळे होणार मतांचे विभाजन

मुंबई दक्षिण मतदारसंघात यंदा मविआ-महायुतीची लढत ही प्रतिष्ठेची समजली जाते. निवडणूक जाहीर होताच मविआतील उद्धवसेनेने या मतदारसंघात पुन्हा एकदा अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीच्या उमेदवारीचा प्रश्न सुटलेला नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी पक्षही उमेदवार देणार असे बोलले जात आहे. यापूर्वी मनसेचा महायुतीला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि वंचितच्या उमेदवारामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मतांच्या विभाजनाची शक्यता नाकारता येत नाही.

12:19 PM

उमेदवारांचा पदयात्रांवर भर

उत्तर पूर्व मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी दुसऱ्या फेरीतील प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांनी पहिल्या फेरीत जवळपास सगळा मतदारसंघ पिंजून काढला आहे. दोन्ही उमेदवारांनी पदयात्रांवर भर दिला होता.

12:08 PM

गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

"जे चांगलं आहे आणि योग्य आहे त्यांचं नाव सर्वजण घेतील. जगभरात मोदींचं नाव घेतलं जात आहे. तुम्ही जर पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं नाही तर जग घेईल. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात आणि गेल्या 10 वर्षांत देशात जे काही घडलं, ते यापूर्वी कधीही घडलं नव्हतं" असं गोविंदाने म्हटलं आहे.

11:53 AM

महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची पुण्यात सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे दाैऱ्यावर येणार आहेत. २९ एप्रिल रोजी त्यांचा पुणे दाैरा असणार आहे. पंतप्रधानांची सभा आणि रोड शो होणार आहे. तसेच ते एकदिवसीय मुक्कामासाठी राजभवन येथे असणार आहेत. या कालावधीत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

11:36 PM

ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, कोण असली कोण नकली लवकरच करेल: राजू पाटील

ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. कोण असली कोण नकली वाघ हे लवकरच करेल. राजकारण करा परंतु नेरिटीव्ह सेट करू नका. एक नरेटिव्ह केले जात आहे. एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही. आम्ही वारंवार बघतोय एवढ्या घटना राजकीय घडल्या असता काय उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करून साधे विचारणा सुद्धा केली नाही. त्यांच्या घराशेजारी शपथविधी होता. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले नाही. आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे. राज ठाकरेंनी आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयापैकी हा निर्णय आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या निवडणुका राज्यसभा, विधानसभा आमचे समर्थन मागितले. त्यामुळे मी हे बोललो होतो, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

10:54 PM

विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही: अनिल देसाई

काँग्रेस नेते चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वात इंडिया अलायन्स आणि सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला सर्व नेते आणि पदाधिकारी हे उपस्थित होते. उत्तम असा प्रतिसाद आम्हाला या बैठकीला मिळाला. जिथे जिथे जात आहोत तिथे उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. आम्ही सर्व ठिकाणी प्रचार करतोय सर्व जाती धर्मातले लोक मला भेटतात माझ्यासोबत आहेत, असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे.

10:22 PM

माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील दोन्ही उमेदवारांना दिल्या शुभेच्छा

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूकीत उभा असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह शिवसेनेचे श्रीकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर शिसेनेच्या फूट पडल्या नंतर ठाकरे गटात राहणे पसंत केले होते .कल्याण लोकसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते .मात्र  गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त झाले आहेत. आगरी सामुहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून माध्यमांसमोर बोलतांना त्यांनी टीका टिपणी करणे टाळत कल्याण लोकसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या दोन्ही उमेदवाराना शुभेच्छा दिल्या आहेत.

09:40 PM

गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, जीवन राष्ट्राला समर्पित केले: CM एकनाथ शिंदे

दहा वर्षात एकही सुट्टी न घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केले आहे. दुसरीकडे राहुल गांधी थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात आणि तिथे भारताची बदनामी करतात. जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांपासून आपण लांब राहिले पाहिजे. मराठा आरक्षण देण्याची मी शपथ घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता १० टक्के आरक्षण दिले. काहीजण न्यायालयात आरक्षण रद्द करण्यासाठी गेले. संधी असताना राजकारण दिले नाही. मराठा समाजाचा केवळ राजकारण करण्यासाठी वापर केला. परंतु काही विघ्नसंतोषी लोक राज्यात फिरत असून त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. ते काही देणारे नाहीत. पण जर तुम्हाला मिळणारे असेल ते हिसकावून घेणारे आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. 

09:31 PM

दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा; उद्धव ठाकरे कडाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व उद्योग गुजरातला पळवून नेत आहे. दुसरीकडे विदर्भात बेकारी वाढत आहे. गेल्या १० वर्षात एकही उद्योग येथे आला नाही. जगाचा पोशिंदा संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. तरीही ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ असे नरेंद्र मोदी म्हणत आहे. त्यांनी गुजरातला सर्व उद्योग नेल्याने आता मोदी यांनाही गुजरातला परत जा म्हणण्याची वेळ आली आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. 

08:53 PM

खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील भाजपा नगरसेवकांसह, काँग्रेस नगरसेवकांची घेतली भेट

खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील  प्रतिष्ठित लोकांची भेट घेतली. आज सकाळपासूनच कल्याण ग्रामीण डोंबिवली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक संस्था व मंडळांच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. सायंकाळी डोंबिवली पश्चिमेकडील माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, काँग्रेसचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, जितू भोईर यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्तींची सदिच्छा भेट घेत आहेत.

08:28 PM

महायुतीच्या उमेदवारांना डझनभर नेते माझ्या विरोधात प्रचारासाठी आणावे लागतात: रविकांत तुपकर

महायुतीच्या उमेदवारांना डझनभर नेते माझ्या विरोधात प्रचारासाठी आणावे लागतात. राष्ट्रीय अध्यक्षांपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे येऊन माझ्यावरच तुटून पडतात. याचा अर्थ समजून घ्या, जनतेने ठरवलेले आहे. शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला सभागृहात पाठवायचे, हा निर्णय जनतेचा झालेला आहे. हा सर्वे त्यांच्यापर्यंत गेलेला आहे, त्याच्यामुळेच त्यांनी धास्ती खाल्लेली आहे. मोठमोठे कॅबिनेट मंत्र्यांना आणतायत. त्यांना कितीही नेते आणू द्या, नेते तिकडं जनता आमच्यासोबत राहणार आहे. विजय हा सत्याचाच होणार, असे बुलढाण्याचे उमेदवार रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

08:09 PM

माढा लोकसभेसाठी माणमधील सर्वाधिक मतदार

सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेल्या माढा लोकसभेसाठी सहा विधानसभा मतदारसंघातील मतदार आपला हक्क बजावणार आहे. या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. तसेच मतदारांची आकडेवारीही समोर येत आहे. त्यानुसार माढा मतदारसंघात १५ मार्चपर्यंत नोंदणी असलेले १९ लाख ८० हजार ८५९ मतदार आहेत. तरीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दहा दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येते. त्यामुळे आणखी काही मतदारांचा आकडा वाढलेला आहे. या निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदार हे माण विधानसभा मतदारसंघातील आहेत. माणध्ये ३ लाख ४८ हजार २०५ मतदारांची नोंद झालेली आहे. त्यानंतर माळशिरसमध्ये ३ लाख ३५ हजार ८२३ मतदार आपला हक्क बजावणार आोत. तर माढा विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ४५०, फलटण ३ लाख ३४ हजार ८५५, करमाळा ३ लाख १६ हजार ७४५ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात ३ लाख १० हजार ५१ मतदार हे १५ मार्चपर्यंत नोंद झालेले आहेत. यावरुन माढा लोकसभेसाठी ६ लाख ८२ हजार मतदार हे सातारा जिल्ह्यातील असणार आहेत हे स्पष्ट झालेले आहे.

08:08 PM

लातूर लोकसभेच्या मैदानात २८ उमेदवार, दोन मतदान यंत्रे लागणार

लातूर लोकसभा मतदारसंघात २८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात तीन जणांनी माघार घेतली आहे. दरम्यान, लोकसभेसाठी एकुण ३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यात छाननीत पाच जणांचे अर्ज बाद झाले होते. आता तिघांनी माघार घेतल्याने २८ जण उमेदवार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

07:43 PM

अकृतीशील प्रीतम मुंडेंमुळेच बीड मागास: जयंत पाटील

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या अकृतीशील असून गेल्या पाच वर्षात मतदारसंघात त्यांनी काय कामं केली हे लोकांसमोर आणणार असून, प्रीतम मुंडे यांच्यामुळेच बीड जिल्हा मागास राहिल्याचा आरोप करत, बीडची निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

07:36 PM

वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता

वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.  सोलापूर लोकसभेचे वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.  अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.  राहुल गायकवाड हे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आहेत.

07:15 PM

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. जनतेने ठरवले आहे की, अब की बार ४०० पार. देशात कोण आहे त्यांच्यासमोर? राहुल गांधी गरम झाले की, परदेशात थंड हवा खायला जातात, इथे उन्हाळा, पावसाळा, दिवस रात्र या देशाची सेवा करणारा पंतप्रधान हा नरेंद्र मोदींच्या रुपाने मिळाला. देशाची बदनामी करणाऱ्याला की देशाची उन्नती करणाऱ्याला लोक निवडून देणार? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

07:13 PM

तुम्ही आगरी आणि कोळी समाजाची माफी मागितली पाहिजे: वर्षा गायकवाड

पियुष गोयल यांना कोळीवाड्यातून फिरताना माशांचा वास सहन झाला नाही. आगरी आणि कोळी नागरिकांनी मोर्चा काढला. कोळीवाड्यातून फिरताना नाकाला रुमाल लावला, याबद्दल त्यांनी निश्चित करण्यासाठी चालते त्या ठिकाणी गेले होते आमचे काही कार्यकर्ते होते. निदर्शन संपल्यानंतर सिग्नलवर गाडी थांबली असता भाजपचा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते. महिला आणि मुले यांच्यावर हल्ला केला त्याची तक्रार करण्यासाठी आलो आहोत. त्यांच्यावर केस घेतली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायदा सुव्यवस्था पाळणे हे पोलिसांचे काम आहे आम्ही अपेक्षा करतो त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. ज्यांना माशांचा वास सहन होत नाही त्यांची तुम्ही बाजू घेता. मला त्यांना विचारायचे आहे की, तुम्ही निवडणूक का लढत आहात, अशी टीका काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केली.
 

07:10 PM

जालन्यात शिवसेना दलित आघाडीचे ॲड. भास्कर मगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज

न्यायालयीन लढाई लढणारे ॲड. भास्कर मगरे यांनी लोकसभेसाठी जालना मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मगरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जामुळे जालन्यासह राज्यात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. कारण ॲड .भास्कर मगरे हे शिवसेना शिंदे गटाचे दलित आघाडीचे प्रमुख असून एकीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे महायुतीकडून जालना लोकसभेसाठी उमेदवार आहेत. यावेळी बोलताना ॲड. भास्कर मगरे म्हणाले की मी माझ्या या जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये गोरगरीब कष्टकरी व गायरान धारक यांच्या अडीअडचणी न्यायालयीन मार्गाने सोडवल्या आहेत त्यामुळे माझ्या मागे मोठा जनसमुदाय उभा राहिलेला आहे आणि या जनसमुदायाने सुचवले आहे की तुम्ही आमच्यासाठी संसदेत आवाज उठवणारे एकमेव व्यक्ती आहे, एक अभ्यासू व सुशिक्षित आहात त्यामुळे या जालना जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर मी उभा रहावे अशी इच्छा संपूर्ण जालना जिल्ह्यातून व्यक्त करण्यात आली होती आणि त्यावरूनच मी आज हा माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये मी महायुती कडूनही फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष ही फॉर्म भरलेला आहे. आता २६ तारखेपर्यंत बघू पक्ष व पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात ते आणि तसे नाही झाले तर मी अपक्ष म्हणून लढेल अशी प्रतिक्रिया ॲड. भास्कर मगरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

07:08 PM

भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांचीही इच्छा होती: रवी राणा

नवणीत राणा यांना तिकीट देऊन माझी चूक झाली, मी अमरावती करांची माफी मागतो, असे वक्तव्य शरद पवार यांनी अमरावती येथील सभेमध्ये केले. यावर रवी राणा प्रतिक्रिया देत म्हणाले की, २०१९ मध्ये  शरद पवार यांचा पाठिंबा नवनीत राणा यांना मिळाला होता. आज नवनीत राणा यांना शरद पवार यांच्या आशीर्वादानेच खासदार बनण्याची संधी मिळाली. आज नवनीत राणा भाजपामध्ये गेल्या, तेव्हा नवनीत राणा यांनी त्यांना सांगितले होते, त्यांना आशीर्वाद दिला. त्यामुळे शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या, त्याच भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांची सुद्धा इच्छा होती, म्हणून अजित पवार यांना त्यांनी भाजपसोबत पाठवले. अचानक सुप्रिया सुळे यांच्या हट्टापाई त्यांना थांबावे लागले. शरद पवार यांच्या मनात भाजप आहे, फक्त ओठावर विरोध आहे, त्यांचा मनामधल्या भाजपमध्ये नवनीत राणा आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे शरद पवार बोलले असतील, असे रवी राणा म्हणाले.

07:06 PM

जनतेकडे आम्ही स्वाभिमानाने जाऊ शकतो: विशाल पाटील

ही लढाई जनतेची, अस्तित्वाची, स्वाभीमानाची आहे. माझ्या उमेदवारीला अनेक अडथळे आणायचा प्रयत्न. कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँगेसचा मी विशाल पाटील बंड केलेला उमेदवार आहे. काँग्रेस पक्षाचा विचाराचा उमेदवार आहे. मी सर्व पक्षीय उमेदवार आहे. पदाची अपेक्षा केली हा काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचा लढा आहे. मी स्वार्थ पाहिला नाही. जनतेकडे आम्ही स्वाभिमानाने जाऊ शकतो. मला चिन्ह मिळू नये, माझे बॅलेट मशिनवर नाव सर्वांत खाली यावे असेपर्यंत झाले. हे सगळे कोण करतय याचा लवकर खुलासा करू, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. माघार न घेण्याच्या निर्णयाबाबत ठाम असलेले विशाल पाटील माध्यमांशी बोलत होते.

04:03 PM

लोकसभा निवडणुकीत भाजपनं उघडलं विजयाचं खातं; इतर सर्व उमेदवारांची माघार!

Lok Sabha Elections 2024: सर्वत्र लोकसभा निवडणूक २०२४ चे वारे वाहत असताना गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे. सुरतची जागा बिनविरोध जिंकण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले असून, भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाकडून याची घोषणा केली जाईल. सुरत येथील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. तर बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

03:51 PM

लोकसभेच्या मैदानात विशाल पाटील यांची माघार नाहीच; कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीची सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यापूर्वी अपक्ष, छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी माघार घेणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे सांगली लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

02:27 PM

अमित शाह यांचा २४ तारखेचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौरा रद्द: रविंद्र चव्हाण

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार होते. पण, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपा नेरे रविंद्र चव्हाण यांनी दिली.अमित शाह २४ तारखेला येणार होते. पण, वातावरणातील बदलामुळे हा दौरा रद्द झाला आहे. लवकरच दोऱ्याची पुढील तारीख जाहीर केली जाईल, असंही चव्हाण म्हणाले.

11:50 AM

...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

महाविकास आघाडी सरकार काळात माझा प्रत्येकवेळी अपमान होत होता, माझ्या खात्यामध्ये १०० टक्के हस्तक्षेप केला जात होता, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात प्रचारसभा सुरू आहेत. 

 

09:55 AM

माघार घ्या, अन्यथा कारवाई करणार; सांगलीत विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा

महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघ उद्धव सेनेच्या वाट्याला गेल्याने बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. सांगलीत तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून, इथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची मुदत आहे.  

11:45 AM

'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत, १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. भाजपाने या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. भाजपा या निवडणुकीत किती जागा जिंकणार यावर अनेकांनी दावे केले आहेत. आता आणखी एका प्रसिद्ध अर्थतज्ञांनी दावा केला आहे. अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांनी २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी भाजप स्वबळावर ३३० ते ३५० जागा जिंकू शकेल, असा दावा त्यांनी केला. तामिळनाडू सारख्या राज्यात ५ जागा जिंकू शकतात असंही त्यांनी म्हटले आहे.

06:01 PM

अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे गट शिवसेनेला मिळाली असून शिवसेनेने आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली. भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमधील रस्सीखेच संपली. तसेच पक्षांतर्गत उमेदवारीवरून सुरू असलेल्या विविध नावाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.

04:51 PM

बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला

बारामतीत केव्हा काय होईल याचा कोणीच नेम सांगू शकत नाही. कारण पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होऊ घातली आहे. गेल्यावेळी सुप्रिया सुळेंविरोधात लाखो मते पडली होती. आता पवारांच्या घरातील मुलगी आणि सून अशा दोन्ही एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. सुळेंविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले आहे. त्यांच्या अर्जात काही दोष निघाला आणि अपात्र ठरला तर आपला दावा असावा म्हणून खुद्द अजित पवारांनी डमी अर्ज दाखल केला होता. यावरून रोहित पवारांनीही टीका केली होती. आता हा अर्जच बाद ठरला आहे. 

01:59 PM

"जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल"; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसच्या राजकुमारांना वायनाडमध्ये संकट दिसत आहे. त्यांना जसं अमेठीतून पळून जावं लागलं तसंच वायनाड सोडावं लागेल" असं म्हणत निशाणा साधला आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला.

12:10 PM

'इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले, निवडणुकीच्या आधीच हार मानली'; पीएम मोदींचा नांदेडमधून हल्लाबोल

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. 'देशात इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले आहे, मतदाता मत द्यायला जातात तेव्हा बोलतात की , या इंडिया आघाडीवाल्याकडे चेहराच नाही. एवढा मोठा देश आम्ही कोणाकडे द्यायचा. इंडिया आघाडीवाल्यांना हे सांगताच येत नाही. या लोकांनी दावे काहीही केले तरी त्यांनी निवडणुकीआधीच हार मानली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली. 
 

11:46 AM

'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल' : शरद पवार

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. 'पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, यावेळी आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, ऐनवेळी शरद पवार यांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला, यामुळे पहाटेचा शपथविधी झाला',असा दावा अजित पवार यांनी काल केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या.  या दाव्याला आता खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.'भाजपासोबत जायला आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि राहणार नाही', असं सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला. 

08:17 PM

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान

सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून 77.57% मतदान झाले आहे. दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याचा असून 76.10% मतदान झाले आहे. मेघालय 69.91%, मध्य प्रदेश 63.25%, तामिळनाडु 62.08%, यूपी 57.54%, बिहार 46.32%, उत्तराखंड    53.56%, जम्मू-कश्मीर 65.08%, राजस्थान 50.27%, छत्तीसगढ़ 63.41%, असम 70.77%, पाँडिचेरी 72.84%, अरुणाचल 64.07%, नागालैंड    56.18%, मिजोरम 53.96%, सिक्किम 68.06%, मणिपुर 68.62%, अंडमान निकोबार 56.87%, लक्षद्वीप 59.02%, महाराष्ट्र 54.85% एवढे मतदान झाले आहे. 
 

06:49 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राणे कुटुंबीय आमची अशीच लढत -  विनायक राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राणे कुटुंबीय आमची अशीच लढत आहे. त्यामुळे ही ब्याद भाजपला देखील परवडणारी नाहीय. शिवसैनिक तर पेटून उठलाय. शिवसेनेच्या पहिल्या गद्दाराला धडा शिकवायला ही निवडणूक वन साईड होणार. निकाल ज्यावेळी येईल विनायक राऊत यांचा विजय हा अडीच लाखांनी होईल. आजचे शक्ती प्रदर्शन म्हणजे केविलवाणा प्रयत्न -  विनायक राऊत -  खासदार

06:30 PM

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 56.87% मतदान

सकाळी 7 ते सायंकाळी 05 पर्यंत
गोंदिया जिल्हा
63- अर्जुनी मोरगाव- 53.20
64- तिरोडा - 56.69
65- गोंदिया - 56.11
66- आमगाव -64.60

भंडारा जिल्हा :
भंडारा - 56.79
साकोली - 58.79
तुमसर  - 58.94

06:07 PM

भंडारा जिल्हा : विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी

भंडारा जिल्हा : विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी

दुपारी 5 वाजेपर्यंत

अर्जुनी मो. - 53.20
भंडारा - 56.79
गोंदिया - 56.11
साकोली - 58.79
तिरोडा - 56.69
तुमसर  - 58.94

05:18 PM

जिथे आम्हाला गरज आहे तिथे दोन्ही मित्र पक्षांनी आम्हाला सहकार्य करावे व पाठिंबा द्यावा - भरत गोगावले

नाशिकच्या जागेसाठी भुजबळ यांनी माघार घेतली असेल तर त्यांचे स्वागत आहे. याचबरोबर जर मोदींना चारशे पार करून पंतप्रधान करायचे असेल आणि महाराष्ट्रामध्ये 45 प्लस खासदार निवडून आणायचे असतील तर एकमेकांच्या जागेवर आग्रह धरण्यापेक्षा जिथे ज्याला गरज आहे तिथे त्यांनी समोरच्याला मदत करावी. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभे आहोत. त्याचप्रमाणे जिथे जिथे आम्हाला गरज आहे तिथे दोन्ही मित्र पक्षांनी आम्हाला सहकार्य करावे व पाठिंबा द्यावा,  असे आवाहन भरत गोगावले केले. 

03:58 PM

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी दाखल करताना किरण सामंत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रवींद्र चव्हाण तसेच शिवसेना नेते दिपक केसरकर उपस्थित होते.

03:57 PM

रत्नागिरी सिंधुदूर्गमध्ये लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मतदान मिळालं असतं - किरण सामंत

महाराष्ट्रामध्ये 45 प्लस करण्या करीता तसेच कुटुंबाशी चर्चा करून माघार घेतली नाराज नाही. या मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मतदान मिळालं असतं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी राहाणाराच ते सहाजिकच आहे. भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याने सांगितले म्हणून मी उमेदवारी मागे घेतल्याचे ट्विट डिलिट केले होते, असे किरण सामंत म्हणाले. 

03:56 PM

प्रियंका गांधींचे निकटवर्तीय कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात, बाजीराव खाडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

कोल्हापूर लोकसभेच्या रणांगणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय. काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले नेते बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बाजीराव खाडे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी तयारी केली होती. आपला माणूस मातीतला माणूस ही टॅगलाईन वापरत शहरासह ग्रामीण भागात  मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजीही केली होती. प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाची जबाबदारी देण्यात आली होती यामध्ये त्यांना सहकार्य करणाऱ्या टीम मध्ये बाजीराव खाडे यांचाही समावेश होता.

2019 ला माझ्या उमेदवारीचा विचार होता मात्र तो डावलला गेला. वरिष्टांचा निर्णय राज्य पातळीवर मानला जाणार नसेल तर वरिष्टांचा अपमान कशाला करायचा असं म्हणत खाडे यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. 

03:54 PM

दुपारी 3.00 वाजेपर्यंतचे मतदान...

भंडारा गोंदिया      :  45.88
चंद्रपूर                 : 43.48
गडचिरोली-चिमुर : 55.97
नागपूर                : 38.43
रामटेक               : 40.10

03:51 PM

कुरखेडा तालुक्याच्या पाच बूथवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; दोन तासांनी उशिरा सुरू झाले मतदान

गडचिरोली कुरखेडा तालुक्यातील पाच बुथवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मतदान उशिरा सुरू झाले. बुथ परिसरात मतदानासाठी नागरिकांची रांग लागली असतानाच काही काही मतदारांना ताटकळत राहावे लागले.

03:16 PM

नाशिकच्या उमेदवारी संदर्भात माघार घेतो: छगन भुजबळ

महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून अद्यापही तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच गेल्या काही दिवसांत काय काय घडामोडी घडल्या, याची माहिती देत, छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारी संदर्भात माघार घेतो, अशी मोठी घोषणा केली.

03:13 PM

मतदाररथात बसवून नवमतदारांची बुथपर्यंत वाजत-गाजत मिरवणूक

लाेकशाहीच्या उत्सवात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शुक्रवारी गडचिराेली शहरात नव मतदार, दिव्यांग, वृध्दांची मतदार रथामध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मतदान केंद्रापर्यंत पाेहाेचल्यानंतर मतदारांनी हक्क बजावला.

03:12 PM

गडचिरोलीत दुपारी १ वाजतापर्यंत ४० टक्के मतदान

नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात गडचिराेली-चिमुर लाेकसभा क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल राेजी शुक्रवारला मतदानाची प्रक्रिया घेण्यात येत आहे. तीन जिल्हयातील ६ विधानसभा क्षेत्राचा समावेश असलेल्या या लाेकसभा क्षेत्रात सकाळी ७ पासून दुपारी १ वाजतापर्यंत एकुण ४०.३१ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यापेक्षाही गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यात दुपारी १ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी अधिक हाेती. 

01:40 PM

दुपारी १ वाजेपर्यंत किती मतदान झाले?

भंडारा गोंदिया : ३४.५६%
चंद्रपूर : ३०.९६ %
गडचिरोली-चिमुर : ४१.०१ %
नागपूर : २८.७५ %
रामटेक : २८.७३ %

01:39 PM

भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क

पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान घेण्यात येत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत वणी आणि आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघात मतदार मतदान करण्यासाठी केंद्रांवर येत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रतिभा धानोरकर तर महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार अशी लढत होत आहे. भाजपचे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी देखील कुटुंबासहीत मतदानाचा हक्क बजावला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काट्याची टक्कर नाही आहे कारण प्रतिभा धानोरकर यांची सुधीर मुनगंटीवार यांच्याशी विकासाच्या बाबतीत तुलनाच होत नाही, प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात केलेले काम शून्य आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आहे.

01:27 PM

वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू; तुळशी येथील वराने सहकुटुंब केले मतदान

लाेकशाहीच्या उत्सवात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथील एका वराने शुक्रवारी सकाळी विवाह समारंभासाठी गावातून वरात निघण्यापूर्वी मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ‘वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू’ याचा प्रत्यय तुळशी येथे आला. देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील रहिवासी सुरेश अवसरे यांचे चिरंजीव प्रफुल यांचा विवाह मु. सोनी (चप्राड) ता. लाखांदूर जि. भंडारा येथील रहिवासी आनंदराव भावे यांची कन्या शिल्पा हिच्या सोबत शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११: ३० वाजता नियाेजित हाेता. हा विवाह साेहळा वधुमंडपी सोनी (चप्राड) येथे पार पडणार हाेता. विवाह संमारंभाला जाण्यापूर्वी वराने आई-वडील, आजी, काका यांच्यासह तुळशी येथील बुथ क्रमांक १३३ वर सहकुटूंब मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. 

12:10 PM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी १९.१७ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत  १९.१७ टक्के मतदान झाले आहे.

11:55 AM

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी लागले रांगेत, सर्वसामान्यांप्रमाणे मतदान

एरवी मतदान करताना व्हीआयपी किंवा मोठे अधिकारी थेट मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावताना दिसतात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत लागून मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या साधेपणामुळे सर्वसामान्यांकडूनदेखील कौतुकोद्गार काढण्यात येत होते.

11:46 AM

तीन ठिकाणी तांत्रिक अडचण; हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहोचविले नवीन ईव्हीएम

तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचात मतदान प्रक्रिया सुरु असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आले व प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.

11:45 AM

सकाळी ११ वाजेपर्यंत किती झाले मतदान?

भंडारा गोंदिया : १९.७२ %
चंद्रपूर : १८.९४ %
गडचिरोली-चिमुर : २४.८८ %
नागपूर : १७.५३ %
रामटेक : १६.१४ %

11:43 AM

नाना पटोले यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील साकोली या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

11:26 AM

सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर या उमेदवारांचेही मतदान

काही किरकोळ घटना वगळता चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान सुरू आहे. चंद्रपूर तालुक्यातील पिपरी येथे एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर शहरातील सिटी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर वरोरा येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. 

11:24 AM

आधी लोकशाहीचे 'कर्तव्य', नंतर नवरदेव बोहल्यावर; लग्नाची वरात, मतदान केंद्रात

भावनेपेक्षाही कर्तव्य महत्त्वाचे असते, असे म्हणतात. या उक्तीला साजेसे काम शेवटच्या टोकावरील सिरोंचा येथील एका कुटुंबाने केले. लग्नाची वरात कर्नाटकला निघण्यापूर्वी नवरदेवाने कुटुंबासह मतदान केंद्र गाठले व लगीनघाईतही मतदानाचा अधिकार बजावत नंतर बोहल्यावर चढणे पसंत केले. हरिश शिंदे असे नवरदेवाचे नाव आहे. त्यांचे सिरोंचात पुस्तकांचे दुकान आहे. १९ एप्रिलला कर्नाटकात त्यांचा विवाह होणार आहे. याच दिवशी मतदान असल्याने शिंदे कुटुंबापुढे पेच निर्माण झाला होता. घरात पै-पाहुणे, लग्नाची घाई असतानाही हरिश शिंदे यांनी मतदान करुनच बोहल्यावर चढण्याचे ठरवले.

11:14 AM

देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री आणि पत्नीसह केले मतदान

11:11 AM

किशोर जोरगेवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. आपल्या एका मताने आपण लोकशाहीच्या मंदिरात आपला प्रतिनिधी पाठवतो. मी माझे कर्तव्य बजावले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठीचे माझे कर्तव्य पार पाडले आहे. मी चंद्रपूरकरांना विनंती करतो की, लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावावा. 

11:10 AM

ईव्हीएम मशिन बंद पडल्याने तासभरापासून मतदान ठप्प

गोंदियातील गोरगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील मतदान केंद्र क. ४८ वर ईव्हीएम मशिन बंद पडल्याने तासभरापासून मतदान ठप्प.

11:00 AM

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीत

आमच्या एनडीएच्या सर्वच कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. खूप वर्षांनी भाजपला ही जागा मिळाली आहे मला खात्री आहे इथे कमळ फुलेल नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील. संकल्प पत्र पूर्ण करण्याचा संकल्प भाजपने केलेला आहे. आम्ही मागचे दोन संकल्प 99 टक्के पूर्ण केलेले आहेत मोठे निर्णय मोदीजी तिसऱ्या टर्ममध्ये घेतील. तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपला देश पुढे येईल मोदीजी, शहाजी, नड्डाजी यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपला ही जागा दिली अडीच लाखांच्या मताधिक्याने विनायक राऊत पडतील. 48 पैकी 40 पैकी जास्त भाजप जिंकेल. गोव्यातील आम्ही दोन्ही जागा जिंकू. उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला याचा परिणाम अजिबात होणार नाही, नारायण राणे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

10:54 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि आईसह नागपूर येथे मतदान केले. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.

10:38 AM

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परिवारासह ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर येथील देलनवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, या देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी, या देशाचे मूलभूत अधिकार जनतेला मिळावे म्हणून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

10:32 AM

नागपूर विभागात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान

नागपूर विभागातील ५ लोकसभा मतदारसंघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान पार पडले.

10:31 AM

भंडारा -गोंदियात सकाळी ९ पर्यंत ७.२२ टक्के मतदान

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्यात मतदान सुरू झाले. मतदारसंघातील एकूण २१३३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तिव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहचत आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मतदारसंघात ७.२२ टक्के मतदान झाले होते.

10:12 AM

लालबहादूर शास्त्री मतदान केंद्रावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे मतदान

भंडारा शहरातील लालबहादूर शास्त्री केंद्रावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सपत्नीक  येऊन मतदानाचा हक्क बजावला.

09:54 AM

भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत

भंडारा जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही सकाळीच मतदानासाठी गर्दी उसळलेली पाहण्यात आली.

09:48 AM

नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा; गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी

माओवादग्रस्त व राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते तर ज्येष्ठ नागरिकांनीही गर्दी केली होती.

09:47 AM

१०१ टक्के मोठ्या मार्जिनने जिंकणार: नितीन गडकरी

भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. नितीन गडकरी सहकुटुंब मतदान करण्यासाठी पोहोचले. यावेळी पत्रकारांशी बोलताना १०० नाही तर १०१ टक्के जिंकणार. यावेळेस मार्जिन वाढेल. भाजपाचा ४०० पारचे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

09:45 AM

नागपुरात मतदानाचा उत्साह

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. नागपुरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुकुशीला मुकुंद चितळे या ८३ वर्षीय आज्जींनी तसेच शितल लोहकरे या १८ वर्षाच्या मुलीने मतदानाचा हक्क बजावला.

09:26 AM

महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान होत आहे. नागपूर,  रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.

09:24 AM

मतदानाला तासभर उशीर

नागपूर लोकसभा मतदारसंघात इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहावं लागलं. दिघोरी येथील जयमाता शाळा मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान ७ वाजता सुरू होणार होतं, परंतु इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ती बदलावी लागली आणि सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी मतदान सुरू झालं.

07:55 PM

छ.संभाजीनगर लोकसभेसाठी हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा मी आज फॉर्म भरला आहे. हा फॉर्म फक्त धर्म पाळण्यासाठी भरला असून सर्वसामान्य लोकांचे हाल मी पाहत आहे. पिण्याचे पाणी लोकांच्या हक्काचं आहे, पिक विमा, वीजबिल, मोफत आरोग्य मिळणे या सर्व गोष्टी हक्काच्या असताना सुद्धा त्यांना मिळत नाहीत. हे पाहून मला वेदना होतात. सर्वसामान्य नागरिकांचे काम करणे हा माझा उद्देश आहे. - हर्षवर्धन जाधव, माजी आमदार

05:06 PM

सरकारचीच भाकरी फिरण्याची आली आहे वेळ: रोहिणी खडसे

बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे. बारामतीची जनता ही शरद पवारांच्या पाठीशी आहे. सरकारचीच आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.

05:05 PM

संजयकाका पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सांगलीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काढलेल्या रॅलीत भाजपा आणि महायुतीचे नेते तसेच कार्यकर्ते सहभागी झाले.

05:00 PM

सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलेय ५५ लाखांचे कर्ज

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी थेट टक्कर होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उसने घेतले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर भावजय आणि भाच्याचे एकूण ५५ लाखांचे कर्ज आहे, अशी माहिती समोर येत आहे.

03:49 PM

विनायक राऊत यांचा विजय निश्चित झाला: वैभव नाईक

नारायण राणे हे त्यांच्या दोन मुलांसाठी भांडत होते. अखेर स्वतःसाठी उमेदवारी घेतली. त्यामुळे विनायक राऊत यांचा विजय निश्चित झाला आहे. खरेतर नारायण राणे पहिल्या बाकावरील नेते आहेत. पण किरण सामंत सारख्या व्यक्तीमुळे राणेंची ऊमेदवारी १३ व्या यादीत जाहीर त्यामुळे ते १३ व्या बाकावरचे नेते झालेत. केवळ आपल्या दोन मुलांचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी राणेंनी ऊमेदवारी घेतली. पण त्यांची गुंडगिरी आत्ता चालणार नाही.  कोकणातील जनता राणेंना हरवणार आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केली.

03:46 PM

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी डमी अर्ज भरला

खबरदारी म्हणून अजित पवारांनी डमी उमेदवारी अर्ज भरला आहे. छाननी पूर्ण झाल्यावर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर होईल.  तेव्हा अजित पवार आपला डमी अर्ज मागे घेणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

03:45 PM

मोदींना भीती आहे की आपला फोटो नसला तर लोक आपल्याला विसरतील: पृथ्वीराज चव्हाण

मोदी सांगत आहेत की, देशाची अर्थव्यवस्था पाचवी क्रमांक झाली आहे, याचा मला अभिमान आहे. मात्र मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असती, भाजपाच्या जाहीरनामावर मोदींचे ४२ फोटो आहेत.अनेक ठिकाणी मोदी आपला फोटो वापरत आहेत. मोदींना भीती आहे की आपला फोटो नसला तर लोक आपल्याला विसरतील, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

03:42 PM

विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार: नारायण राणे

कुठलेही काम सूरु करायचे असेल किंवा निवडणूक लढवायची असेल तर ग्रामदेवतच दर्शन घेतो. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात जागा वाटपाबाबत महायुतीत कोणताही तिढा नव्हता. उमेदवारी मिळणार हे अगोदरच माहिती होते. प्रचारालाही सुरुवात केली होती. विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ४०० पार करायचे आहे. विकसित देश बनावा, आत्मनिर्भर बनावा, हे आपले प्रचाराचे मुद्दे असतील, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. 

02:52 PM

७० हजार कोटींचा घोटाळा केलाय, त्यांना उपमुख्यमंत्री करणे हीच मोदी गॅरंटी: सुषमा अंधारे

जाहिराती खोट्या गोष्टींची केल्या जातात. आता मोदींची गॅरंटी खरी असेल का मग? मोदी साहेब मी ७० हजार कोटींचा घोटाळा केलाय, ते म्हणाले, या या मी तुम्हाला उपमुख्यमंत्री बनवतो. हीच ती मोदींची गॅरंटी, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

02:07 PM

गावागावातील म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार घड्याळ सोडून का वाजवत आहेत तुतारी?: रामदास आठवले

अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहेत सुप्रिया सुळे, अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे... कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला.... अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला.. म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत येण्याचा सल्ला... सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ही बाहेरची आहे सून, सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजित पवार फेडतील बारामतीकरांचे ऋण..., अशा चारोळ्या करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या सभेत सुनेत्रा पवारांना दिल्लीत पाठवण्याचे आवाहन केले.

01:54 PM

जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा: आदित्य ठाकरे

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची टीम इन्फ्ल्युएन्सर आणि पॉडकास्टना त्यांचे कार्यक्रम होस्ट करण्यासाठी सांगत आहे. मीच त्यांच्यासाठी एक आव्हान देतोय, त्यांनी माझ्यासोबत पॉडकास्ट करावे आणि महाराष्ट्रातील सर्व मुद्द्यांवर आणि गुजरातला पाठवलेल्या सर्व उद्योगांवर बोलूया, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले. एक्सवर आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

01:49 PM

मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा; पंकजा मुंडेंचे आवाहन

ही निवडणूक जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. सर्वांनी मिळून योगदान द्या. लोकसभेवर गेल्यावर मतदारसंघाचा आजवर झाला नाही तितका विकास करेन. त्यानंतर पुढच्या ५ वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला आपण खासदार करू. परंतु, जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही. मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा. ही पाच वर्षे जिल्ह्याच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत, असे बीडमधील भाजपा उमेदवारी पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

01:41 PM

आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी आमदार, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. 

01:40 PM

राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य; भाजपाला विश्वास

महायुतीत कुठेही रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीत जागा वाटप होऊनही सांगलीत बंडखोरी झाली. त्यांची अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात महायुतीत मात्र तसे होणार नाही, असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.

01:39 PM

बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील: देवेंद्र फडणवीस

बारामतीला कोणी थांबवू शकत नाही. सुनेत्रा वहिनींनादेखील कोणी थांबवू शकत नाही. बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. बारामती लोकसभा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा उमेदवारीसाठी अर्ज भरताना घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

12:53 PM

अजित पवारांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाचे भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे. अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला. अब की बार, बारामतीत सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार यांचे वक्तृत्व आणि कर्तृत्व दोन्ही चांगले आहे. सुनेत्रा पवारांना मत म्हणजे विकासाला मत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुण्यात महायुतीत सभा झाली. त्यात ते बोलत होते.

12:45 PM

सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव

बारामातीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्याच्या कल्पनेतून झाला असल्याचा विशेष उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला. घडाळ्याला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत याचाही आवर्जून उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला. बारामती लोकसभा मतदार संघातून माहयुतीकडून सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुनेत्रा पवार बोलत होत्या.

12:41 PM

ही निवडणूक गावकी-भावकीची नाही, हलक्या कानाने मतदान करू नका: अजित पवार

कारण नसताना लोकसभेची निवडणूक भावनिक केली जात आहे. घराघरात जाऊन भेटीगाठी घेतल्या जात आहेत. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहूल गांधी अशी आहे. ही निवडणूक गावकी-भावकीची नाही. हलक्या कानाने मतदान करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यात आली यावेळी पवार बोलत होते. 

12:10 PM

सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली तरी अजितदाद मलाच मत देतील: सुप्रिया सुळे

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीनंतरही अजित पवार आपल्याला मतदान करतील. कदाचित माझा मराठीतला कार्य अहवाल वाचला नसावा. मी आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देईन. त्यांनी यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर ते मेरीटवर मलाच मतदान करतील, असा अजब दावा सुप्रिया सुळे यांनी केला.

12:08 PM

माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे: सुप्रिया सुळे

माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे. आत्तापर्यंत लोकसभेत जे बोलले ती भाषणे ऐका. मी फक्त जनतेच्या हितासाठी बोलत आले, यापुढेही बोलत राहीन. सातत्याने चंद्रकांत पाटील म्हणतात की, आम्हाला शरद पवारांना संपवायचे आहे. शरद पवार आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे. भाजपच्या पोटात होते ते ओठांवर आले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

11:56 AM

भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार

अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर लवकरच शरद पवार गटात जाणार आहेत. होळकर यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

11:54 AM

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार

सोलापूर लोकसभा जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रणिती शिंदे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रोड शो करत प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

11:19 AM

साताऱ्यात उदयनराजे उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाजपाकडून साताऱ्यात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे अगदी थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

11:18 AM

उद्या उमेदवारी अर्ज भरणार: नारायण राणे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर आता उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

11:17 AM

रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा असल्याचे चित्र होते. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा दोन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते. अखेरीस शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडला आणि भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली.

08:23 PM

निधी देतो मतदान द्या, याचा अर्थ अजित पवार यांना खात्री आहे मत मिळणार नाहीत - सतेज पाटील

कोल्हापुरात 11 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. प्रत्येक गावात जनता शाहू महाराजांच्या पाठीशी आहे. तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल. लोक अजित पवारांना मतदान करणार नाहीत, निधी देतो मतदान द्या याचा अर्थ त्यांना खात्री मतदान मिळणार नाही. दोन वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतेय, अशी टीका सतेज पाटलांनी केली.

07:24 PM

 द्रौपदीचा अर्थ काय? हे त्यांनी समजवून सांगावे, डोक्यातले विष बाहेर आले आहे  - जितेंद्र आव्हाड

अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं आहे.  ज्या काकांनी ५०% महिलांना आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला, शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला, ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले, ज्या संविधानाच्या माध्यामातून न्याय दिला आंबेडकरांनी त्याचं महाराष्ट्रात माणूस स्त्रिया द्रौपदी झाल्या असत्या असे म्हणतात. त्यांनी सर्व महिला वर्गाची माफी मागावी, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

07:14 PM

प्रत्येकाचा वेळ काळ असतो, मला नाही वाटतं कुणी सहा वेळा उपमुख्यमंत्री होईल - अजित पवार

तुम्हाला वाईट वाटेल चार वेळा मुख्यमंत्री झाले असताना विकासकामे किती झाली आणि चार वेळा मी उपमुख्यमंत्री असतानाची विकासकामे ही तुमच्या डोळ्यादेखत कुणी केली हे तुम्हाला माहित आहे. त्याकाळामध्ये फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची मात्र आता माझे सर्व भावंड पायला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. आता तर काकी (प्रतिभा पवार) प्रचार करताना मला सांगण्यात आले, मी तर डोक्यालाचा हात लावला, असे अजित पवार म्हणाले. 

07:13 PM

मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. - अमित ठाकरे

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करणार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईत उद्धव ठाकरे आणि मविआला एकही जागा मिळणार नाही. त्यांच्या विरोधात वातावरण आहे. तसेच राज आणि नरेंद्र मोदी यांची मुंबईत एकत्र सभा होणार असल्याची माहितीही अमित ठाकरे यांनी दिली. 

06:02 PM

महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील तोफा थंडावणार; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान

१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघात आता प्रचार शेवटच्या टप्प्यावर आला असून आज सायंकाळी प्रचारसभा आणि प्रचार थांबणार असून शुक्रवारी या मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य मतपेटीत असणार आहे.

05:43 PM

"विशाल पाटलांनी हे पाऊल का उचललं, याचा विचार होणं गरजेचे"

विशालदादा, ऑल द बेस्ट! विशाल पाटील यांच्यावर काय अन्याय झाला आहे, हे फक्त त्यांचा संघर्ष माहिती असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्ता आहे असं म्हणत आमदार सत्यजित तांबे यांनी सांगलीतील विशाल पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. 

05:37 PM

पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकणार: अजित पवार

तो सर्व्हे आहे, रिझल्ट काय लागतो ते बघा. पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ओपिनियन पोल समोर येत आहे. पैकी एका ओपिनियन पोलमधून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज या पोलमधून वर्तवण्यात आला आहे. यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.

04:23 PM

रक्षा खडसेंविरोधात आमचा उमेदवार लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल: रोहिणी खडसे

प्रत्येकाला आपआपल्या  पक्षाच्या उमेदवाराच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल मत व्यक्त करणे काही गैर नाही. मात्र आम्ही हवेत गोळीबार करत नाही. थोड्या दिवसांत तुम्हाला सगळे लक्षात येईल आणि आम्ही लाखांच्या लीडने निवडून येऊ, असा आम्हाला विश्वास आहे. फक्त आता आकडेवारी सांगण्यापेक्षा आम्ही कामावर भर देतोय, आमचे उमेदवार श्रीराम पाटील हे तळागाळापर्यंत पोहोचत आहेत, संपर्क करत आहेत. रक्षा खडसेंविरोधात आमचा उमेदवार लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल, असा दावा  एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केला.

04:21 PM

महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुढी पाडवा मेळाव्यादिवशी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना दिली.

04:10 PM

देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात: सुशीलकुमार शिंदे

सोलापूर जिल्हा पारंपारिक दुष्काळी आहे. ४५ वर्षांपूर्वी एकमेव उजनी धरण उभारले गेले. सोलापूर जिल्ह्यास उजनी धरणाचे पाणी पुरत नाही. असे असले तरी सोलापूरचे चित्र बदलत आहे. ऊस, फळबागा अशा नगदी पिकांच्या माध्यमातून दुष्काळावर मात झाली आहे. एकापेक्षा जास्त लहानमोठी धरणे असायला, सोलापूर हे पुणे किंवा नागपूर नाही. देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल किंवा बहुतेक त्याचा त्यांना विसर पडला असावा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार झालेले दिसतात, असा पलटवार सुशीलकुमार शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर केला.
 

03:27 PM

अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार

एकच गोष्ट सांगतो की, १९ तारखेला अर्ज भरणारच. भाजपाकडून तिकीट मिळावे अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय याचे आत्मपरिक्षण उदयनराजेंनी केले पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचे आत्मपरिक्षण केले पाहिजे. शक्तिप्रदर्शन काय असते? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे, असे अभिजित बिचुकले यांनी म्हटले आहे. 

03:18 PM

लोकशाही वाचविण्यासाठी भाजपाला धडा शिकवा, पंजाला मतदान करा: विजय वडेट्टीवार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी शेवटची रॅली चामोर्शी शहरात झाली. या रॅलीचे नेतृत्व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. प्रचार संपत आहे आता जबाबदारी मतदारांची आहे. देशातील सत्ताधारी भाजपचे जुमलेबाज सरकार हे गेले दहा वर्ष तुमच्याशी खोटे बोलले, नुसती आश्वासन दिली.यावेळी मात्र कमळाला धडा शिकवला पाहिजे. पंजाला मतदान करा, असे आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

03:16 PM

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराकडे काँग्रेसची पाठ?

दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराला काँग्रेसचे नेते पदाधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दक्षिण मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

02:36 PM

विरोधकांकडे ना बॉलर, ना बॅट्समन, ते सगळेच राखीव खेळाडू: CM एकनाथ शिंदे

विरोधी पक्षांची आघाडी मोदी व्देषाने पीडित आहे. मोदींना हरवायचे असा त्यांनी पण केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकड़े ना बॉलर आहेत ना बॅट्समन जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली. 

02:31 PM

छगन भुजबळांचा महायुतीला अल्टिमेटम

नाशिकसाठी ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या, पण २० मेच्या आधी निर्णय घ्या. कारण, २० मेचा मुहुर्त आहे, त्यामुळे त्या आधी निर्णय झाला तर बरे होईल. कुठल्याही पक्षाला नाशिकची जागा सोडा, पण २० मेच्या आधी सोडा, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीला अल्टिमेटम दिला आहे.

02:02 PM

नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसांत निश्चित होईल: हेमंत गोडसे

नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसांत निश्चित होईल. एक सकारात्मक निर्णय होईल. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. विद्यमान खासदार म्हणून जनसंपर्क ठेवला आहे. गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. संघटनात्मक बांधणी उत्कृष्ट पद्धतीने झाली आहे. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे धनुष्यबाण निवडून येईल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला. 

02:02 PM

लोकसभेसाठी उमेदवारीची संधी मिळो अन् विजय प्राप्त होवो: हेमंत गोडसे

रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरात दर्शन घेतले. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवारां निवडून यावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे देशाची मोठी प्रगती होत आहे. पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्याची संधी मिळू दे. आपल्यालाही उमेदवारीची संधी मिळू दे आणि विजय प्राप्त होऊ दे. यश मिळू दे, असे साकडे काळाराम मंदिरात दर्शन घेताना घातले, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. 

01:31 PM

राजू पारवेंचा विजय पक्का: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजू पारवे यांचा विजय पक्का आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

01:29 PM

भाजपाचे उमेदवार सुभाष भामरेच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे.

11:57 AM

पक्षातील माणूस बंडखोरी करत असेल तर काँग्रेसने कारवाई केली पाहिजे: संजय राऊत

सांगतील काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पारंपरिक जागा आहे, असे म्हणता. पण तिथे भाजपाचा आमदार आणि खासदार आहे. पक्षातील माणूस बंडखोरी करत असेल तर , काँग्रेसने कारवाई करायला हवी, असे स्पष्ट मत संजय राऊतांनी व्यक्त केले.

11:46 AM

पंतप्रधान मोदींना स्वतःची निवडून यायची गॅरंटी नाही: संजय राऊत

इंडिया आघाडी देशभरात ३०५ जागा जिंकणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. पंतप्रधान मोदींना स्वतःची निवडून यायची गॅरंटी नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.

11:44 AM

एकनाथ खडसेंना धमकी, तक्रार दाखल

परवापासून मला धमकीचे कॉल येत आहेत. त्यात दाऊद आणि छोटा शकीलचा उल्लेख करण्यात येतो. आपकी कोई खैर नहीं, आपको मार देंगे. आपको मारना है, अशी धमकी मला दिली. कोणी खोडसाळपणा करत असेल असे मला आधी वाटले होते. पण नंतर पोलिसांना कळवले तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

11:42 AM

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकत नाही: अजित पवार

लोकसभा ही १४० कोटी जनतेची निवडणूक आहे. गावकीची निवडणूक नाही. कुणाचा फायदा होईल यापेक्षा कुणी फायदा केला याचा विचार करा. राहुल गांधी यांचे नाव नाईलाजाने घ्यावे लागते. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

06:23 PM

मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, संविधान बदलाच्या टीकेवरून प्रत्युत्तर

संविधानाच्या नावाखाली जे लोक आम्हाला रात्रंदिवस शिव्या देत आहेत, त्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत सत्ता होती. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची त्यांची हिंमत नव्हती.  हा मोदी आहे, जो संविधानाला समर्पित आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही आपले संविधान मोठ्या थाटात लागू झाले. नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पूर्णिया येथे एका प्रचार सभेला संबोधित केले. 
 

05:03 PM

"सासूचे ४ दिवस संपले आणि सुनेचे ४ दिवस येऊ द्या"

जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ बघा, सासूचे ४ दिवस संपले आणि सुनेचे ४ दिवस येऊ द्या, सुन बाहेरची असते का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. ४० वर्ष झाली तरी बाहेरची...आयाबहिणींनो सांगा. या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही मला ३०-३५ वर्ष खूप प्रेम दिलंय. तसेच प्रेम द्या असं आवाहन अजित पवारांनी बारामती येथील प्रचारसभेत केले. 

04:12 PM

मला राजकारणापेक्षा समाजकारणाचा अनुभव - सुनेत्रा पवार

बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नक्कीच चांगले मताधिक्य मिळणार आहे. गेल्या २५ वर्षापासून मी सामाजिक कार्य करतेय. ग्राम स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनेवर मी काम केले. मी संसदेत लोकांचे प्रश्न मांडू शकते. ही निवडणूक असल्यानं आरोप प्रत्यारोप होणारच आहेत. मला राजकारणापेक्षा समाजकारणाचा अनुभव आहे - सुनेत्रा पवार, महायुतीच्या उमेदवार, बारामती

02:07 PM

मुस्लीम लीग आणि भाजपाचे जुने संबंध - उद्धव ठाकरे

मुस्लीम लीगचा जास्त अनुभव भाजपाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्या काळात काँग्रेस येऊ नये यासाठी मुस्लीम लीगसोबत युती करून प.बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. ज्या मुस्लीम लीगनं देशाच्या फाळणीची भाषा केली होती. त्यामुळे ती आठवण असेल. मोहन भागवत जामा मशीदला गेले होते. नरेंद्र मोदीही गेले होते - उद्धव ठाकरे

02:01 PM

आघाडी धर्म पाळा, काँग्रेस वरिष्ठांच्या सूचना

सांगलीच्या जागेवरील तिढा पाहता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार विश्वजित कदम हेदेखील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे अशा सूचना वरिष्ठांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्निथला यांच्यासोबतही कदम यांची फोनवरून चर्चा झाली. यातून लवकर तोडगा काढावा जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली. 

01:33 PM

उमेदवारी मिळताच उदयनराजेंचं शरद पवारांना खुलं चॅलेंज

उमेदवारी मिळाल्याचा आनंद असून येत्या १८ तारखेला मोठ्या ताकदीनं अर्ज दाखल करायला जाणार आहे. मविआनं ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्यावर कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे शरद पवारांनी नैतिकता सांगू नये. शरद पवारांना खुलं आव्हान देत जर माझ्यावर एखादा भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी १८ तारखेला फॉर्म भरणार नाही आणि फॉर्म भरल्यानंतरही दाखवला तरी फॉर्म मागे घेईन असं खुलं आव्हान उदयनराजेंनी शरद पवारांना दिले आहे. 

01:29 PM

आघाडी धर्म पाळा, काँग्रेस वरिष्ठांच्या सूचना

सांगलीच्या जागेवरील तिढा पाहता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार विश्वजित कदम हेदेखील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे अशा सूचना वरिष्ठांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्निथला यांच्यासोबतही कदम यांची फोनवरून चर्चा झाली. यातून लवकर तोडगा काढावा जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली. 

11:44 AM

"संविधान बदलणार नाही"

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान होते, म्हणून चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला. जेव्हा मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे घेतली, तेव्हा भारताच्या संविधानासमोर हात जोडून ते स्वीकारले. संविधान बदलण्याचा विचार आजपर्यंत कुणी केला नाही - देवेंद्र फडणवीस 

11:41 AM

साताऱ्यात 'तुतारी' निनादली

सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करण्याआधी मविआचे जोरदार शक्तिप्रदर्शन

11:39 AM

कोल्हापूरमध्ये महायुतीचं शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार.. हातकणंगलेत धैर्यशील मानेही अर्ज भरणार...

05:02 PM

"उद्धव ठाकरेंवर आंधळा विश्वास ठेवला"

मुख्यमंत्रिपदाच्या मोहात उद्धव ठाकरे अडकले त्यामुळे शिवसेना फुटली. आम्ही उद्धव ठाकरेंवर आंधळा विश्वास ठेवला. देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण विश्वास ठेवला, मित्राने धोका दिला त्यापेक्षा आपलेच चुकले असं आम्ही म्हणू. शरद पवारांनी याआधी २ वेळा आमच्याशी चर्चा करून फसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर भरवसा ठेवणं कठीण आहे. २०१७-१८ मध्ये स्वत: शरद पवार अमित शाहांना भेटले, शिवसेनेला सोडून माझ्यासोबत सरकार बनवा हा त्यांचा आग्रह होता. परंतु आम्ही उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला होता - आशिष शेलार, भाजपा नेते

01:04 PM

राजू शेट्टींची 'स्वाभिमानी'ही सांगलीच्या आखाड्यात

सांगली मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रिंगणात; पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर

09:32 PM

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर! पालघर, मुंबई, रायगडमधील उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उत्तरमधून बीना रामकुमार सिंग यांना तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीव कुमार आप्पाराव कलकोरी, मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

08:13 PM

"बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल"

सुनेत्रा पवारांच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल. बारामतीपेक्षा जास्त लीड पुरंदरमधून मिळेल. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालं असून आम्ही प्रचंड ताकदीने दौरे एकत्रित करत, लोकांना समजावत अजित पवारांना १९९१ साली बारामतीपेक्षा जास्त लीड दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला यंदाच्या निवडणुकीत करायची आहे. बारामतीत समसमान मते होतील, पण पुरंदरमध्ये बारामतीपेक्षा जास्त लीड आम्ही देऊ - विजय शिवतारे, शिवसेना नेते

06:20 PM

"...ते राज ठाकरेच सांगू शकतील!"

"गेल्या १० ते १५ वर्षांत राज ठाकरेंचे तीन-चार निर्णय मी बघितले आहेत. कधी भाजपाबाबत एकदम तिखट प्रतिक्रिया दिली आणि बाजूला झाले. कधी पाठिंबा दिला. त्यांना नक्की काय करायचं होतं, हे मला सांगता येणार नाही. त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता पाठिंबा दिला आहे. बघू दोन तीन दिवसांत काय ते स्पष्ट होईल. त्यांनी असा निर्णय का घेतला हे राज ठाकरेच स्पष्ट करू शकतील" - शरद पवार

06:17 PM

शाहू छत्रपती दत्तक; मंडलिकांच्या विधानाने खळबळ

"आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे" - संजय मंडलिक

06:15 PM

लोकशाहीत विरोधकांना महत्त्व!

एकही विरोधी पक्षाची जागा निवडून देऊ नका, असं नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र, लोकशाहीत विरोधकांना महत्त्व आहे. मोदी वगळता इतर सर्व पंतप्रधानांनी विरोधी पक्षांचा सन्मान केलाः शरद पवार

06:09 PM

मविआचा माढ्याचा उमेदवार ठरला!

शरद पवारांचा महायुतीला धक्का! धैर्यशील मोहिते-पाटील १४ एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार... १६ एप्रिलला माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार... 

Web Title: maharashtra lok sabha election 2024 48 constituency live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.