बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:01 AM2024-05-07T09:01:31+5:302024-05-07T09:02:08+5:30

बारामती विधानसभा मतदारसंघातील शहरातील १२, ग्रामीण भागातील ४७, दौंडमधील ३३, पुरंदरमधील ३१, भोरमधील ३१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांवर गैरप्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Fear of malpractices at 157 centers in Baramati; Supriya Sule suspected, demand to election officials | बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क   
पुणे : बारामतीची निवडणूक सध्या देशपातळीवर गाजत असून, पवार कुटुंबातील ही लढाई आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. बारामतीत मंगळवारी मतदान होत आहे. या  मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी सुमारे १५७ मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडण्याची भीती महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून, खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.  

बारामती विधानसभा मतदारसंघातील शहरातील १२, ग्रामीण भागातील ४७, दौंडमधील ३३, पुरंदरमधील ३१, भोरमधील ३१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांवर गैरप्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

तक्रारीत ठोस कारण नाही 
nयाबाबत द्विवेदी म्हणाल्या, सुळे यांची तक्रार आली आहे. त्यात ठोस कारण दिलेले नाही. 
nमात्र, तरीदेखील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Fear of malpractices at 157 centers in Baramati; Supriya Sule suspected, demand to election officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.