धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 04:32 PM2020-06-25T16:32:36+5:302020-06-25T16:37:04+5:30

जव्हार तालूका हा आदिवासी अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो, यात आदिवासी कातकरी समाजाचे लोक असून त्यांची परिस्थिती बिकट आहे.

Shocking! The woman committed suicide and also strangling her daughter till death | धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देदेहेरेपैकी कडव्याची माळ येथील मंगला वाघ वय 30 या विवाहितेने घरची हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला पहिले तिची 3 वर्षीय मुलगी रोशनी हिला साडीने गळफास देऊन जीवे ठार मारले. याबाबत मयत मंगला वाघच्या पतीने जव्हार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हलकीच्या परिस्थितीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची कबुली दिली आहे.

हुसेन मेमन

जव्हार - आदिवासी कातकरी समाजचे दुर्भिक्ष आजही याभागात बघावयास मिळत असून, देहेरेपैकी कडव्याची माळ येथील मंगला वाघ वय 30 या विवाहितेने घरची हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला पहिले तिची 3 वर्षीय मुलगी रोशनी हिला साडीने गळफास देऊन जीवे ठार मारले. नंतर तिने स्वतः गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, घटना मंगळवारी घडली मात्र ती बुधवारी सायंकाळी उघडकीस आली, मंगळवारी दिलीप कामावरून घरी परत आल्यानंतर पत्नी व लहान मुलगी घरी नाही म्हणून मोठ्या मुलीला विचारले. मात्र, तिलाही माहित नव्हते, याने ती नातेवाईकांकडे गेली असेल येईल संध्याकाळपर्यंत असा अंदाज केला, पण ती रात्र झाली तरी काही घरी आली नाही, त्यामुळे मंगळवार रात्री पासून ते बुधवार सकाळ पर्यंत त्याने आजूबाजूच्या नातेवाईकाच्या घरी फिरला मात्र तेथेही तिचा पत्ता लागला नाही, बुधवारी दुपारी तो व तिची मोठी मुलगी हिला घेऊन नवापाड येथे आला असता तेथील एका मुलाने व्हॉट्स अ‍ॅपवरवर एका महिलेने व सोबत एका लहान मुलीने बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला साडीने गळफास घेतल्याचे फोटो दाखवले त्यावेळी त्याला हे बघून त्याला धक्काच बसला ती मंगला व तिची मुलगी रोशनी हिचाच फोटो असल्याचे निष्पन्न झाले.

जव्हार तालूका हा आदिवासी अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो, यात आदिवासी कातकरी समाजाचे लोक असून त्यांची परिस्थिती बिकट आहे. याबाबत मयत मंगला वाघच्या पतीने जव्हार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची कबुली दिली आहे. तिच्या पश्चात पती दिलीप वाघ वय 35 तर मोठी मुलगी नंदिनी वय 7 असा परिवार आहे.
 
दिलीप याची परिस्थिती गरीब व हलाकीची असून, शेतीसाठी जमीन जागा नसल्याने दिलीप व मयत मंगला मोलमजुरी करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होतो, गरिबीच्या परिस्थितीवर मंगला नेहमी विचार करत असायची त्यामुळेच तिने असा टोकाचा पाऊल उचलला असे दिलीप याने फिर्यादीत नमूद केले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी बोलली, अन्...

Web Title: Shocking! The woman committed suicide and also strangling her daughter till death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.