शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृह उपअधीक्षकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 17:31 IST

ससून रुग्णालयात रात्रपाळीला जाण्यासाठी सांगितल्यामुळे आला होता राग..

पुणे : ससून रुग्णालयात कैद्याच्या बंदोबस्ताची ड्युटी लावल्याच्या कारणावरुन कारागृहातील एका कर्मचार्‍याने थेट वरिष्ठ अधिकार्‍याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कारागृह कर्मचार्‍याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयकुमार सोमनाथ शिंदे (वय ३९, रा.शासकीय कर्मचारी निवासस्थान, येरवडा) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी चंद्रमणी अर्जुनची इंदुरकर (वय ५५, रा. शासकीय वसाहत, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली.चंद्रमणी हे येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारागृहातील आरोपी प्रकाश फाले याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी कारागृहातील कर्मचारी जयकुमार शिंदे याला ससून रुग्णालयात रात्रपाळी ड्युटी ला जाण्याचा लेखी आदेश चंद्रमणी यांनी दिला होता. त्याचा राग आल्यावर जयकुमार याने चंद्रमणी यांना दररोज मला ससून रुग्णालयात जाण्यास सांगतोय, तुझा आदेश असला तरी मी ससून रुग्णालयात जाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर लेखी आदेश चंद्रमणी यांच्या अंगावर भिरकवला. त्यावर चंद्रमणी यांनी वरिष्ठांची बोलण्याची ही पद्धत आहे का अशी विचारणा केली. त्यामुळे जयकुमार याने रागाच्या भरात त्यांच्या हातातील पेन हिसकावून घेत़ मी ससून रुग्णालयात ड्युटीला जाणार नाही. मला एक वर्षाचा मुलगा आहे. जर त्याला काही कमी जास्त झाले तर मी तुझ्या खानदानाला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंग