शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:00 IST

ट्रक चालकावर हल्ला केल्यानंतर पळून जाणाऱ्या काही गुन्हेगारांना पकडण्यासाठी कॉन्स्टेबलने कालव्यात उडी मारली.

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ट्रक चालकावर हल्ला केल्यानंतर पळून जाणाऱ्या काही गुन्हेगारांना पकडण्यासाठी कॉन्स्टेबलने कालव्यात उडी मारली. मात्र तेव्हाच विजेची तार अंगावर पडल्याने शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. आरोपींची कार खांबाला धडकली आणि कालव्यात पडली. त्यांना पकडण्यासाठी दोन्ही कॉन्स्टेबलनेही कालव्यात उडी मारली, पण त्याचवेळी खांबावरून विजेची तार तुटून कालव्यात पडली.

पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नगीना रोडवरील गढी चौकात कारमधून प्रवास करणारे काही गुन्हेगार ट्रक चालकाला मारहाण करत होते. माहिती मिळताच पोलीस रिस्पॉन्स व्हेईकल (पीआरव्ही) चे कॉन्स्टेबल मनोज आणि गंगा राम घटनास्थळी पोहोचले. तेव्हा गुन्हेगारांनी गोळीबार सुरू केला आणि कारमधून पळून गेले.

पळून जाताना त्यांची कार सलामाबाद-भरैराजवळ नियंत्रणाबाहेर गेली. विजेच्या खांबाला धडकली आणि कालव्यात पडली. त्यानंतर दोन पोलीस कॉन्स्टेबलनेही त्यांना पकडण्यासाठी पटकन कालव्यात उडी मारली. याच दरम्यान कारने धडक दिलेल्या खांबावरची विजेची तार तुटून कालव्याच्या पाण्यात पडली, ज्यामुळे कालव्यात विद्युत प्रवाह निर्माण झाला.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वीजपुरवाठा खंडित केला आणि दोन्ही कॉन्स्टेबलना पाण्याबाहेर काढलं. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेलं. जिथे कॉन्स्टेबल मनोज यांना मृत घोषित करण्यात आलं, तर कॉन्स्टेबल गंगा राम यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर पोलीस स्टेशन परिसरातील झाल गावातील रहिवासी नीरज नावाच्या एकाला पकडलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरजचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांच्या शोधासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसेच अटक केलेल्या गुन्हेगाराची चौकशी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी