अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

By बाळकृष्ण परब | Published: September 29, 2020 11:31 AM2020-09-29T11:31:58+5:302020-09-29T11:40:31+5:30

सुशांतच्या मृत्यूप्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे करण्यात येत आहेत. याचदरम्यान, आता बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे

Bihari Bollywood actor Akshat Utkrsh dies in Mumbai, family alleges murder | अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Next
ठळक मुद्देमृत कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष असून, तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये करत होता काम नवोदित कलाकार असलेला अक्षत हा मुळचा बिहारमधील मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूर येथील रहिवासीअक्षतच्या कुटुंबीयांनी त्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची हत्या झाल्याचा केला आरोप

मुंबई/मुझफ्फरपूर - बॉलिवडू अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. सुशांतच्या मृत्यूप्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे करण्यात येत आहेत. याचदरम्यान, आता बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष असून, तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता.

नवोदित कलाकार असलेला अक्षत हा मुळचा बिहारमधील मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूर येथील रहिवासी होता. दरम्यान, मृत अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

अक्षतचे मामा रंजित सिंह यांनी सांगितले की, रविवारी रात्री ९ वाजता अक्षतचे त्याच्या वडिलांशी बोलणे झाले. मात्र त्याच रात्री उशिरा त्याच्या मृत्यूची बातमी कळली. त्याबरोबरच मुंबई पोलीस हे या प्रकरणी सहकार्य करत नसल्याचा आरोप अक्षतच्या मामांनी केला आहे. अक्षत उत्कर्ष हा सिकंदरपूर येथील विजयंत चौधरी ऊर्फ राजू चौधरी यांचा पुत्र होता. त्याचा मृतदेह मुंबईहून पाटणा विमानतळावर आणण्यात आला आहे.

अक्षतच्या मृत्यूप्रकऱणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची एफआयआर नोंदवलेली नाही. तसेच या घटनेबाबत सध्यातरी अधिक माहितीची वाट पाहिली जात आहे. दरम्यान जूनमध्ये झालेल्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे. तसेच दररोज नवनवे दावेही होत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

Web Title: Bihari Bollywood actor Akshat Utkrsh dies in Mumbai, family alleges murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.