बालिका अत्याचार प्रकरण; ५३ वर्षीय आरोपीचा आजारपणाचे कारण देऊन जामीन अर्ज, हायकोर्टाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 14:23 IST2026-05-06T14:22:24+5:302026-05-06T14:23:44+5:30

'माता मुलीची प्रतिष्ठा पणाला लावून खोटा गुन्हा करणार नाही'

"No Mother Would Risk Daughter's Dignity for a False Case": Aurangabad Bench Denies Bail to 53-Year-Old Accused | बालिका अत्याचार प्रकरण; ५३ वर्षीय आरोपीचा आजारपणाचे कारण देऊन जामीन अर्ज, हायकोर्टाने फेटाळला

बालिका अत्याचार प्रकरण; ५३ वर्षीय आरोपीचा आजारपणाचे कारण देऊन जामीन अर्ज, हायकोर्टाने फेटाळला

छत्रपती संभाजीनगर : कोणतीही माता आपल्या मुलीची प्रतिष्ठा पणाला लावून खोटा गुन्हा दाखल करणार नाही. पीडितेच्या वैद्यकीय अहवालात अत्याचाराचे स्पष्ट संकेत असल्याने आरोपीला जामीन देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी लातूर जिल्ह्यातील एका गावात ९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ५३ वर्षीय दत्तात्रय चिमनशेट्टे या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

पीडित बालिका २ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीच्या औषधांच्या दुकानात गोळ्या आणण्यासाठी गेली होती. आरोपीने मुलीला दुकानावरील खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हे कुकृत्य कोणालाही न सांगण्यासाठी १५ रुपये दिले होते. याप्रकरणी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६४(२) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.

त्याला शारीरिक व्याधी असल्याचे सांगून आरोपीने जामिनाची मागणी केली होती, परंतु वैद्यकीय तपासणीत तो लैंगिक कृत्य करण्यास सक्षम असल्याचे निष्पन्न झाले आहे. अखेर गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितेचे वय लक्षात घेता खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. शासनातर्फे सहायक सरकारी वकील प्रिती व्ही. डिग्गीकर यांनी आरोपीच्या जामीन अर्जास विरोध केला.

Web Title : बालिका अत्याचार मामला: 53 वर्षीय आरोपी की जमानत याचिका खारिज।

Web Summary : लातूर में 9 वर्षीय बच्ची के साथ दुर्व्यवहार के आरोपी 53 वर्षीय व्यक्ति की जमानत उच्च न्यायालय ने खारिज कर दी। अदालत ने पीड़िता की मेडिकल रिपोर्ट और अपराध की गंभीरता का हवाला दिया। बीमारी के आधार पर आरोपी की याचिका खारिज कर दी गई क्योंकि मेडिकल परीक्षणों में उसकी क्षमता की पुष्टि हुई।

Web Title : Child abuse case: Court rejects bail for 53-year-old accused.

Web Summary : The High Court denied bail to a 53-year-old accused of abusing a 9-year-old girl in Latur. The court cited the victim's medical report and the seriousness of the crime. The accused's plea based on illness was rejected as medical tests confirmed his capability.