शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

थँक यू सिस्टर! एवढे दोन शब्दच मोठा पुरस्कार; ‘त्यांच्या’ रूपाने ममतेचा स्पर्श, धीराचे बोल देतात जीवनाची उमेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:59 IST

जागतिक परिचारिका दिन: रुग्णालयाचा खरा श्वास म्हणजे परिचारिका

छत्रपती संभाजीनगर : रात्रीचे दोन वाजलेले असतात. बहुतांश शहर गाढ झोपेत असते; पण शहरातील घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, खासगी आणि ग्रामीण रुग्णालयांत काही चेहरे मात्र जागे असतात. हातात इंजेक्शन ट्रे, खांद्यावर जबाबदारी आणि चेहऱ्यावर संयम, अशा परिचारिका एका बेडवरून दुसऱ्या बेडकडे धावत असतात. म्हणूनच डॉक्टरांना ‘जीवनदाता’ म्हटले जात असले, तरी रुग्णालयाचा खरा श्वास म्हणजे परिचारिका असल्याचे चित्र आजही कायम आहे.

दरवर्षी १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात. नर्स, सिस्टर आणि परिचारिका या विविध नावांनी ‘ती’ सर्वांना परिचित आहे. लहान बाळांपासून तर वृद्धांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी ‘ती’ दिवसरात्र झटत असते. रुग्णालयात काम करणाऱ्या अनेक परिचारिका सांगतात की, पगारापेक्षा रुग्ण बरा होऊन हसतमुखाने घरी जाताना पाहणे हा सर्वांत मोठा आनंद असतो. काही रुग्ण डिस्चार्जनंतरही वर्षानुवर्षे संपर्कात राहतात. ‘तुम्ही खूप काळजी घेतली’ एवढे शब्दही त्यांच्यासाठी मोठा सन्मान ठरतात.

हार्टरेट ३० वर, बालकाला ‘सीपीआर’ने जीवदान
‘जेएनएम’, ‘पीसी- पेडियाट्रिक’, ‘एम.एस्सी.’ झालेले आहे. सध्या ‘पीएच.डी.’ सुरू आहे. सध्या ‘घाटी’तील बालरोग विभागाच्या वॉर्डात कार्यरत आहे. गंभीर अवस्थेत बालके येतात. त्यांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी सतत अलर्ट राहावे लागते. मागच्या आठवड्यात हार्टरेट ३० वर आलेल्या बालकाला वेळीच ‘सीपीआर’ दिला. त्यामुळे तो बरा होऊन रुग्णालयातून बाहेर पडला. आपल्या हातून रुग्णसेवा घडते, हे अभिमानास्पद वाटते.
- आम्रपाली निकाळजे, बालरुग्ण परिसेविका

समुपदेशनातून रुग्णांना धीर
‘घाटी’तील मेडिसीन विभागातील एमआयसीयू-डायलिसिस येथे कार्यरत आहे. डायलिसिससाठी येणारे रुग्ण खचलेले असतात. या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना धीर दिला जातो. त्यातूनच अनेकजण पुन्हा उमेदीने उभे राहतात. परिचारिकांना प्रशासकीय बदल्यांतून वगळावे, ही परिचारिका दिनानिमित्त शासनाकडून अपेक्षा.
- द्रौपदी कर्डिले, परिसेविका तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना

३०० वर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
१२ वर्षे रुग्णसेवा दिली. तर १० वर्षे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले. आतापर्यंत ३०० विद्यार्थी घडले असतील. सध्या पडेगाव येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे.
- डॉ. प्रशांत सोनटक्के, पब्लिक हेल्थ नर्स (प्रशिक्षण)

अंतर्गत बदल्या, मग प्रशासकीय बदल्या कशाला?
परिचारिकांच्या दर ३ वर्षांनी अंतर्गत बदल्या होतात. त्यामुळे परिचारिकांना प्रशासकीय बदल्यांतून वगळावे. परिचारिकांच्या बदल्यांतून भ्रष्टाचाराला खत-पाणी घातले जाईल. बदली थांबविण्यासाठी आर्थिक व्यवहार हाेतील. शिवाय बदलीनंतर परिचारिकांचे कुटंब विस्कळीत होईल. त्यामुळे परिचारिकांची प्रशासकीय बदली होता कामा नये.
- इंदूमती थोरात, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन

English
हिंदी सारांश
Web Title : Thank you, Sister! These words a big reward, life's hope.

Web Summary : Nurses tirelessly serve patients, finding joy in their recovery more than pay. They offer crucial support and care, considered the hospital's true breath. Nurse's Day highlights their dedication, with patients' gratitude being the greatest reward for their selfless service.
टॅग्स :Hospitalहॉस्पिटलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर