शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 08:51 IST

फुलंब्री शहरात दरी फाटा भागात राजू स्टील आणि प्लास्टिक नावाचे दुकान आहे.

फुलंब्री: येथील दरी फाटा येथे असलेल्या प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानात शनिवारी माध्यरात्रीला शॉक सर्किटमुळे आग लागून तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीरपणे जखमी झाले. जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फुलंब्री शहरात दरी फाटा भागात राजू स्टील आणि प्लास्टिक नावाचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाण प्लास्टिक साहित्य भरलेले होतेशनिवारी रात्री एक वाजून 45 मिनिटांनी दुकानातील आतील भागात शॉक सर्किटमुळे आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात धुके व गॅस तयार झाला. आग लागल्याची माहिती दुकान मालक व शेजारी असलेल्या दुकान मालकांना समजली असता ते दुकान उघडण्यास धावले. 

दुकानाचे शटर उघडताच आतमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे तीन लोक वेगाने बाहेर फेकले गेले, यात ते लोखंडी पार्टवर आदळले तसेच आगीत होरपळले. यात नितीन रमेश नागरे (वय 25), गजानन वाघ (वय 30), राजू सलीम पटेल (वय 25) या तिघांचा मृत्यू झाला. हे सर्व फुलंब्री येथील रहिवाशी होते.तर घटनेत शाहरुख सलीम पटेल व अजय सुभाष नागरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोघे होमगार्डघटनेतील मयत गजानन वाघ व जखमी शाहरुख पटेल हे दोघे चांगले मित्र होते. ते होमगार्डमध्ये आहेत. शाहरुख पटेल याचा मयत भाऊ राजू पटेल याचे दुकान असल्याने हे आग विझविण्या करीता घटनास्थळी गेले होते.फुलंब्री पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना घाटी रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :fireआगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर