शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये आतापर्यंत फक्त तीन महिलांनाच मिळाली उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:46 IST

पहिल्याच वेळी विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने सविता मुंढे यांच्यावर विश्वास टाकला आहे.

- सोहम घाडगे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केवळ तीनच महिलांना प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. पहिल्यांदा काँग्रेसने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदा कायंदे यांना १९९९ ला संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये चिखलीच्या माजी आमदार रेखताईा खेडेकर यांना रिंगणात उतरवले. तर २०१९ मध्ये पहिल्याच वेळी विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने सविता मुंढे यांच्यावर विश्वास टाकला आहे.सिंदखेड राजा हे माँ जिजाऊ यांचे माहेर आहे. असे असले तरी मतदारसंघातून उमेदवारी देतांना प्रमुख राजकिय पक्षांनी महिलांकडे दुर्लक्ष केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणत्याही राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिलेली नाही. सिंदखेडराजा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नंदा कायंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले उमेदवार म्हणून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे रिंगणात होते. शिवसेनेकडून छगन मेहेत्रे यांना संधी देण्यात आली होती. या निवडणूकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ५८ हजार मते घेत विजय संपादन केला. काँग्रेसच्या नंदा कायंदे यांना ४२ हजार मते मिळाली मिळाली होती.१९९९ पासून ते २०१४ पर्यंत या मतदारसंघावर डॉ. शिंगणे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. १९९५ मध्येही ते येथून अपक्ष म्हणून छत्रीच्या चिन्हावर निवडून आले होते.दरम्यान, २०१४ मध्ये शिंगणे यांनी निवडणूक लढविली नाही. त्यामुळे पक्षाने महिला उमेदवाराच्या रुपात चिखलीच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांना संधी दिली. परंतू राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात रेखाताई खेडेकर यांना ३७ हजार १६१ मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ६४ हजार २०३ मते घेत पहिल्यांदा आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या विधानसभा निवडणूकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सविता मुंढे यांना संधी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीनेच महिला उमेदवारास संधी दिली आहे. माँ जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघातून आतापर्यंत एकही महिला विजयी झाली नसली तरी महिलांना संधी मिळणे गरजेचे आहे. संधी मिळाल्याशिवाय महिला स्वत: ला सिध्द करु शकणार नाहीत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाsindkhed-raja-acसिंधखेड राजाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019