शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाने यंदा चांगले संकेत दिले आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याचे वृत्त धडकले. जिल्ह्यातही वातावरणात बदल होऊन दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. भंडारा शहरात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. तुमसर तालुक्यात सायंकाळी ५ वाजता अर्धा तास जोरदार पाऊस बरसला.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर पाऊस : लाखांदूरमध्ये गत २४ तासात २९.४ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे वृत्तासोबतच भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. तुमसरपासून लाखांदूरपर्यंत आणि साकाेलीपासून भंडारापर्यंत सर्वत्र पाऊस कोसळला. लाखांदूर येथे तर गत तीन दिवसांपासून पाऊस कोसळत असून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता जोरदार पाऊस झाला. लाखांदूरमध्ये गत २४ तासात २९.४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा फटका धान मळणीला बसत आहे. कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाने यंदा चांगले संकेत दिले आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याचे वृत्त धडकले. जिल्ह्यातही वातावरणात बदल होऊन दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. भंडारा शहरात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. तुमसर तालुक्यात सायंकाळी ५ वाजता अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. तालुक्यातील काही भागात पावसाची नोंद झाली. मोहाडी तालुक्यात सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. साकोलीतही अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. लाखनी आणि पवनी तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. पालांदूर परिसरात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाला होता. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी परिसरात अर्धा तास पाऊस बरसला. लाखांदूर तालुक्यात गत दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. गुरुवारी वादळात वीज कोसळून एक गाय ठार झाल्याची घटना तालुक्यात घडली होती. जिल्ह्यात सध्या धान मळणीचे काम शेवट्या टप्यात आहे. अनेकांचा धान उघड्यावर असून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.

जिल्ह्यात १५ ते १७ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन - केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाले असून पुढील प्रवास निर्विघ्नपणे झाल्यास भंडारा जिल्ह्यात १५ ते १७ जून दरम्यान मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या पूर्व मोसमी पावसाच्या सरीवर पेरणी न करता समाधानकारक पाऊस झाल्यास (७५ ते १०० मिमी) जमिनीत ओलावा आल्याची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. हवामान आधारित कृषी सल्ला व अचूक अंदाज प्राप्त होण्यासाठी जिल्हा हवामान केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. एन.एस. वझिरे, साकोली येथील कृषि विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १ ते ४ जून दरम्यान ६.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. त्यात लाखांदूर तालुक्यात आतापर्यंत ३४.३ मिमी, पवनी १०.२ मिमी आणि लाखनी ३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी