शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 20:35 IST

Amravati News: 'आपण मित्रासह ४ जून रोजी रात्री तिच्या रूमवर पोहोचलो असता, ती गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. तिला आपणच खाली उतरविले', असे बयाण प्रतीकने दिले होते.

अमरावतीमधील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरुणीच्या बहिणीने त्याबाबत तक्रार नोंदविली. त्याआधारे, पोलिसांनी मृत तरुणीचा मित्र प्रतीक शरद हिवसे (२४, लक्ष्मीनगर, अमरावती) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्याप्रकरणाला प्रेमाची किनार असल्याचे सीडीआरवरून स्पष्ट झाले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'आपण मित्रासह ४ जून रोजी रात्री तिच्या रूमवर पोहोचलो असता, ती गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. तिला आपणच खाली उतरविले', असे बयाण प्रतीकने दिले होते. पोलिसांनी तिने आत्महत्या केल्याची नोंद घेतली. मात्र मृताच्या मस्तिष्कात इंटर्नल इंज्युरी असल्याचे निरीक्षण पीएम रिपोर्टमध्ये नोंदविले गेले. सबब, पोलिसांनी तपासाची दिशा हत्येकडे वळविली. 

वाचा >>सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल

दरम्यान, शुक्रवारी दुपारी मृत मुलीच्या बहिणीने प्रतीक हिवसे यानेच आपल्या बहिणीचा खून केला, अशी तक्रार दिली. काही दिवसांपूर्वीच तिने आपली प्रतीकसोबत मित्र म्हणून ओळख करून दिली होती, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

संशयित प्रतीकने खुनाची कबुली दिलेली नाही. त्यामुळे मृत तरुणीच्या मस्तिष्कात इंटर्नल इंज्युरी कशी झाली, तिच्या गळ्यावर चट्टे वा अन्य खुणा कशाने आल्या, ते शोधण्याचे आव्हान गाडगेनगर पोलिसांसमोर आहे.

गावकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट

आपल्या गावातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे कळताच संबंधित गावातील अनेकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना विचारणा केली. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिला फासावर लटकविण्यात आले, असे डॉक्टरांनी सांगताच त्यांच्या संताप व दुःखावेगाचा कडेलोट झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीPoliceपोलिसDeathमृत्यू