घोन्सा येथील श्रीराम गोरक्षण ट्रस्टमधील पाच जनावरे पिकअप वाहनातून लंपास करत असताना गोरक्षणमधील कर्मचाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान, पिक वाहन एका झाडावर जाऊन आदळले. काही क्षणातच या वाहनाने पेट घेतला. ...
राळेगाव येथे बुधवारी धनगर समाजबांधवांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच समाजबांधवांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. ...
जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रि ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट वाटपात गुजरात पॅटर्नची अंमलबजावणी केली जाण्याची चिन्हे आहेत. त्याची झलक मंगळवारी विधान परिषदेच्या तिकीट वाटपात दिसून आली. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी या पॅटर्नचा धसका घेतला आहे. ...
अधिक महिन्यामुळे यावर्षी गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात असला तरी निवडणुकांचे वर्ष असल्याने खबरदारी म्हणून पोलीस आतापासूनच तयारीला लागले आहे. त्या अनुषंगाने क्रियाशील व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ...
पावसाअभावी वणी शहरातून वाहणारी निर्गुडा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे. नजीकच्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास वणी शहरात पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे. ...
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेला अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ...
नवीन सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात करा, असे फर्मान सोडण्यात आले. पण विद्यार्थ्यांच्या हाती याच दिवशी पूर्ण पुस्तके पडतील याची दक्षता घेण्यात आली नाही. ...