वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘सीपीएस’ बोर्डाने पाठविलेल्या पाच विद्यार्थ्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. ...
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपानेसुद्धा पुसदवर लक्ष केंद्रित केले आहे. या दोनही पक्षांनी पुसदमध्ये उमेदवार दिल्याने पुसदला जणू राजकीय लॉटरी लागली आहे. ...
१२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा कराव ...
एका कर्करूग्णाला मदतीचा हात देऊन येथील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले. खाकी वर्दीतील पोलीस दिसला की सर्वांनाच धाक वाटतो. कायदा आणि सुव्यवस्था राबविताना अनेकदा पोलिसी खाक्या जनतेला सहन करावा लागतो. ...
शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान ...
तालुक्याच्या टाकळी सलामीचे नागरिक गत अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमानंतर त्यांच्या वाट्याला आला. हक्काच्या जागेसाठी चाललेली गावकऱ्यांची लढाई अखेर संपुष्टात आली. ...
ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती उशिरा दिल्याचे कारण पुढे करत विमा दावा नाकारणाऱ्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या नायगाव येथील धीरज उत्तमराव भितकर यांनी दाखल केलेल्या तक्रारप्रकरणात हा निर्णय दे ...
मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण असतानाही, केंद्राने ते केवळ २ टक्के केले आहे. या विरोधात मराठा सेवा संघाने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली. ...
जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेते पद बदलविण्यात आले आहे. आता बाळा पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील नवीन गटनेते बनले आहे. ६१ सदस्यीय जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य निवडून आले होते. ...