छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात दीड लाखाच्या आतील कर्ज अंशत: माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे. ...
शहरात गोळा झालेल्या कचºयामधील प्लास्टिक वेगळे करून खतनिर्मिती करण्याचा प्रयोग नगरपालिका हाती घेणार आहे. त्यासाठी सॅग्रिकेशन मशिनचा वापर केला जाणार आहे. हा प्रयोग राबविण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासन इंदूर आणि सांगलीचा दौरा करणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने खासगी गोदाम अधिग्रहित करून धान्य साठविण्याची तयारी सुरू केली. मात्र या गोदामात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथे धान्य घेऊन जाणारे ट्रक मधातच फसतात. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ् ...
हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यात ‘पोखरा’ योजना राबविली जात आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेत यवतमाळ तालुक्यातील १४ गावांत प्रारंभ करण्यात आला. ...
शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शासनाने शेती उत्पादीत प्रत्येक मालाचे हमी भाव जाहीर केले. हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापारी किंवा यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद पणन व विनियमन अधिनियमात केली आहे. ...
वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे. ...
गेल्यावर्षी बोंडअळीच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या शेतकºयांवर यावर्षी वाणीचे संकट घोंगावत आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील जवळपास १०० एकरातील कपाशी पीक वाणीने फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहे. ...
वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल, ग्लोबल वार्मिंग आदींचा विचार केला असता आयुष्यात वन मोठे की धन मोठे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्याचे आॅक्सिजन आपण विकत घेऊ शकत नाही. ...
नवीन घेतलेल्या होंडा शाईन बाईकच्या आवाजाने त्रस्त ग्राहकाला न्याय तर, साई पॉर्इंट आणि होडा मोटर्सला ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. मोटरसायकलला नवीन इंजिन आणि इतर बाबींचे दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे. ...