"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."

By कोमल खांबे | Updated: May 17, 2026 11:25 IST2026-05-17T11:24:44+5:302026-05-17T11:25:15+5:30

'राजा शिवाजी' सिनेमा रिलीज झाल्यानंतर दिशाच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांना हा सिनेमा पाहता आला नाही, याची खंत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने बोलून दाखवली. 

raja shivaji actress disha pardeshi said her dad could not watch the movie | "राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."

"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."

Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी अभिनेत्री दिशा परदेशीने अफझलखानच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या सिनेमात दिशाने संजय दत्तसोबत स्क्रीनही शेअर केली. तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, 'राजा शिवाजी' सिनेमा रिलीज झाल्यानंतर दिशाच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांना हा सिनेमा पाहता आला नाही, याची खंत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने बोलून दाखवली. 

दिशाने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "बाबांनी 'राजा शिवाजी' सिनेमा पाहिला नाही, याची खंत वाटते. खरं सांगायचं तर माझी आई आणि बिल्डिंगमधले काही फ्रेंड्स राजा शिवाजी बघायला गेले. तेव्हा आई बाबांना म्हणाली होती की तुम्ही पण चला. आमच्या घरी कुत्र्याचं एक छोटं पिल्लू आहे. तर त्याला सांभाळण्यासाठी बाबा सिनेमा पाहायला गेले नाहीत. तुम्ही जा मी नंतर जाईन असं ते म्हणाले. त्यानंतर पुढचा आठवडा मी सिनेमाच्याच गडबडीत होते. त्यात मी थोडीशी बिझी होते. बाबांनी सिनेमा पाहिला नव्हता त्यामुळे मी ठरवलं की पुढच्या आठवड्यात सोमवार, मंगळवारी मी बाबांना सिनेमा पाहायला घेऊन जाईन. आम्ही दोघं चित्रपट बघू".


'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्रीने 'राजा शिवाजी'मध्ये साकारली संजय दत्तच्या पत्नीची भूमिका, म्हणते- "अफजलखानची बेगम..."

"माझ्यापेक्षा जास्त हे स्वप्न त्यांचं होतं. आईबाबांनी नेहमीच मला सपोर्ट केलाय. पण, शनिवारीच बाबा गेले... ते लोकांना फोन करून सांगत होते की माझी मुलगी आहे या सिनेमात तर तुम्ही आवर्जुन राजा शिवाजी सिनेमा बघा. ते खूप खूश होते की इतक्या मोठ्या सिनेमाचा मी भाग आहे", असं म्हणत दिशाने खंत व्यक्त केली. याआधी दिशा 'लाखात एक आमचा दादा', 'कन्याकुमारी', 'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' या मालिकांमध्ये दिसली होती. 

Web Title : 'राजा शिवाजी' देखने से पहले पिता का निधन: दिशा परदेशी का दुख

Web Summary : दिशा परदेशी ने 'राजा शिवाजी' में अफजल खान की पत्नी की भूमिका निभाई। फिल्म रिलीज से पहले उनके पिता, जो फिल्म देखने के लिए उत्सुक थे, का निधन हो गया। वे गर्व से सभी को फिल्म देखने की सलाह दे रहे थे।

Web Title : Father passed before seeing 'Raja Shivaji': Actress Disha Pardeshi's regret.

Web Summary : Disha Pardeshi played Afzal Khan's wife in 'Raja Shivaji.' Her father, eager for its release, passed away before seeing the film. He was proudly recommending the movie to everyone.