IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...

IPL 2026: आयपीएल २०२६ ची साखळी फेरी अखेरच्या टप्प्यात आली असली तरी प्लेऑफमध्ये खेळणाऱ्या संघांचा फैसला अद्याप होऊ शकलेला नाही. यादरम्यान,  आज रविवारी होत असलेल्या दोन महत्त्वपूर्ण लढतींमधून प्लेऑफमधील दोन संघांचं भवितव्य निश्चित होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 11:15 IST2026-05-17T11:15:16+5:302026-05-17T11:15:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: The real upheaval in the points table of IPL 2026 will happen today, the fate of Punjab will be decided, along with... | IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...

IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...

आयपीएल २०२६ ची साखळी फेरी अखेरच्या टप्प्यात आली असली तरी प्लेऑफमध्ये खेळणाऱ्या संघांचा फैसला अद्याप होऊ शकलेला नाही. यादरम्यान,  आज रविवारी होत असलेल्या दोन महत्त्वपूर्ण लढतींमधून प्लेऑफमधील दोन संघांचं भवितव्य निश्चित होणार आहे. १६ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालेलं आहे. तर आज पंजाब आणि राजस्थान या दोन संघांची स्पर्धेतील वाटचाल कशी असेल याचं चित्र स्पष्ट होणार आहे. 

सात सामन्यांत सहा विजय मिळवल्यानंतर सलग ५ पराभव पत्करावे लागल्याने पंजाब किंग्सची स्पर्धेतील वाटचाल अडखळली आहे. दरम्यान, आज गुणतक्त्यात अव्वलस्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धची लढत ही पंजाब किंग्ससाठी महत्त्वाची ठरणार आहे. यंदाच्या हंगामात दमदार सुरुवात करणारा पंजाबचा संघ सध्या करा अथवा मरा अशा स्थितीत पोहोचला आहे. आता एका सामन्यात जरी पराभव  झाला तरी पंजाबचा संघ स्पर्धेतून बाद होऊ शकतो. पंजाबचा संघ सध्या १३ गुणांसह गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पंजाबला अखेरच्या २ सामन्यांत मेहनत घ्यावी लागणार आहे.

याशिवाय राजस्थान रॉयल्सचा संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. राजस्थानचे सध्या ११ सामन्यातून १२ गुण झाले आहेत. तसेच उर्वरित  तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यास राजस्थानचे १८ गुण होतील. तसेच एखाद्या सामन्या पराभव जरी झाला तरी १६ गुण आणि चांगल्या रनरेटसह राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी आपलं आव्हान कायम ठेवू शकेल.  त्यात आज बंगळुरूविरुद्धच्या लढतीत पंजाबचा पराभव झाला तर राजस्थान रॉयल्सची प्लेऑफच्या दिशेने होणारी वाटचाल आणखीनच सोपी होणार आहे.

आयपीएलमध्ये आज होणाऱ्या दोन लढतींपैकी पहिल्या लढतीत पंजाब किंग्सचा सामना रॉयल  चॅलेंजर बंगळुरूसोबत होणार आहे. तर दुसऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. दिल्लीचे १२ सामन्यांमधून १० गुण झाले असून, पुढचे दोन्ही सामने जिंकले तरी दिल्लीचे १४ गुण होतील, त्यामुळे दिल्लीचा संघ प्लेऑफमधून जवळपास  बाद झाला आहे. सद्यस्थितीत बंगळुरू आणि गुजरातच्या संघांचं प्लेऑफमधील स्थान  जवळपास निश्चित  झालेलं आहे. उर्वरित दोन जागांसाठी चेन्नई, राजस्थान, हैदराबाद आणि पंजाबचे संघ शर्यतीत आहेत.    

Web Title : IPL 2026 प्लेऑफ की दौड़ तेज: पंजाब का भाग्य और राजस्थान के मौके

Web Summary : आज के महत्वपूर्ण आईपीएल मैच प्लेऑफ स्थान तय करेंगे। आरसीबी लगभग अंदर है, जबकि पंजाब को आरसीबी के खिलाफ जीतना जरूरी है। राजस्थान को बाकी मैच जीतने होंगे। दिल्ली लगभग बाहर है। चेन्नई, हैदराबाद भी दौड़ में हैं।

Web Title : IPL 2026 Playoff Race Heats Up: Punjab's Fate and Rajasthan's Chances

Web Summary : Crucial IPL matches today will decide playoff spots. RCB is almost in, while Punjab faces a must-win situation against RCB. Rajasthan needs to win remaining games. Delhi is nearly out of contention. Chennai, Hyderabad are also in contention for playoffs.