प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 06:12 IST2026-05-17T06:12:11+5:302026-05-17T06:12:26+5:30

नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडमध्ये; सीबीआय पथकाकडून अश्विनी कदम या महिलेच्या घराची आठ तास झाडाझडती, ‘टेलिग्राम’द्वारे अनेकांपर्यंत पोहोचला पेपर?  

Prof. Manisha Mandhare in CBI's net; Third arrest in Pune | प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक

प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील जीवशास्त्राची वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरूनाथ मांढरे हिला दिल्लीत अटक केली आहे. प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे यांच्यानंतर ही पुण्यातील व्यक्तीची तिसरी अटक आहे. 

नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ती तज्ज्ञ म्हणून सहभागी होती. तिने पुण्यातील मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचे तपासात समोर आले आहे. या वर्गांमध्ये शिकवण्यात आलेले अनेक प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.  
बिबवेवाडीतील ब्युटीपार्लर चालक मनीषा वाघमारे हिला सीबीआयने  अटक केली होती. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एप्रिल २०२६ मध्ये तिच्या घरी बोलावले होते. तेथे प्रा. मांढरेने विद्यार्थ्यांना प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती दिली होती. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर प्रा. मांढरेला अटक झाली.  मांढरेला जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांची माहिती होती. यातील बहुतांश प्रश्न ३ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे निष्पन्न झाले. 

आतापर्यंत ९ जणांना अटक 
या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरूग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण नऊ आरोपींना अटक
केली आहे. त्यापैकी ५ आरोपींना न्यायालयात हजर केले असून, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात
आली आहे. 
शुभम खैरनारचे बॅंक पासबुक ताब्यात  : नाशिक : अटक करण्यात आलेला शुभम खैरनार (२६) याच्या चौकशीत आता आर्थिक व्यवहारांचा 
मोठा धागा समोर येत आहे. सीबीआयने शुभमचा मोबाइल, लॅपटॉप, बँक पासबुक, कागदपत्रे आणि काही डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. 
 

Web Title : प्रोफेसर मांढरे नीट पेपर लीक में गिरफ्तार; पुणे में तीसरी गिरफ्तारी

Web Summary : प्रोफेसर मनीषा मांढरे नीट पेपर लीक मामले में दिल्ली में गिरफ्तार। आरोप है कि उन्होंने लीक हुए प्रश्नों से छात्रों को ट्यूशन दी। पुणे से दो अन्य सहित भारत भर में नौ गिरफ्तारियां हुईं। वित्तीय लेनदेन की जांच जारी है।

Web Title : Prof. Mandhare Arrested in NEET Paper Leak; Third Pune Arrest

Web Summary : Professor Manisha Mandhare arrested in Delhi for NEET paper leak. She allegedly tutored students with leaked questions. Nine arrests made across India, including two others from Pune. Financial transactions are under investigation.