शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम समितीच्या बैठकीला प्रमुखांची दांडी

By admin | Updated: October 10, 2015 02:01 IST

जिल्हा परिषदेतील बांधकाम समितीच्या बैठकीला आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनी दांडी मारली.

सदस्य संतप्त : इमारतींचे बांधकाम गाजलेयवतमाळ : जिल्हा परिषदेतील बांधकाम समितीच्या बैठकीला आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनी दांडी मारली. शुक्रवारी आयोजित या बैठकीत काही उपविभागीय अभियंत्यांनी अक्षरश: चुकीची माहिती दिल्याने सदस्यांनी रोष व्यक्त केला. आरोग्य व पशुसंवर्धन विभागाच्या इमारत बांधकाम आढाव्यावरून ही बैठक गाजली. बांधकाम सभापती सुभाष ठोकळ यांच्या अध्यक्षतेत समितीची बैठक झाली. बैठकीत दारव्हा येथील सदस्य अमोल राठोड यांनी उपकेंद्र इमारतीच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. भांडेगाव येथील इमारत बांधकाम कोणत्या स्तरावर आहे, याची माहिती बैठकीत मिळाली नाही. दारव्हा येथे समाधान शिबिर असल्याने तेथील उपविभागीय अभियंता बैठकीला गैरहजर होते. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनीसुद्धा या बैठकीला त्यांचे प्रतिनिधीच पाठविले होते. त्यामुळे इमारत बांधकामाची खरी स्थिती काय आहे, त्यात कोणत्या अडचणी येतात, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून काही असहकार्य होते का, याची खातरजमा अनेक सदस्यांना करता आली नाही. योगेश पारवेकर यांनीसुद्धा घाटंजी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या उद्घाटनाचा मुद्दा बैठकीत लावून धरला. उमरखेडमध्ये मुळावा येथे बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतीवरच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुसरा मजला उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र हे शक्य नसल्याने असे करता येत नाही, अशी माहिती देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून ५०-५४ आणि ३०-३४ या शिर्षकाखाली मिळणाऱ्या निधीतून जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येत असलेल्या रस्त्यांवर काम करण्यासाठी नाहरकत द्यावी, यावर बैठकीत चर्चा झाली. मात्र जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर दुसऱ्या कुणीही काम करू नये, असाच ठराव घेण्यात आला. त्यामुळे या मुद्यावरही बैठकीत फार चर्चा झाली नाही. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्यांनी शासनाच्या दरकराराची प्रत ही मराठीतून देण्यात यावी, अशा मागणीचा ठराव घेतला होता. मात्र या ठरावाला अधीक्षक अभियंता अमरावती यांनी स्पष्ट नकार दिला आहे. या बाबत पुन्हा पत्र पाठविण्याचे निर्देश सभापती सुभाष ठोकळ यांनी दिले.बैठकीला दोन्ही बांधकाम विभागातील १० उपअभियंत्यापैकी कळंब व दारव्हा येथील उपअभियंते उपस्थित नव्हते. मागील इतिवृत्ताचे वाचन करून इमारत बांधकामाच्या मुद्यावरूनच बैठकीत सदस्यांनी संताप व्यक्त केला. (कार्यालय प्रतिनिधी)