Next

गणेशभक्तांचा खोळंबा, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 12:47 PM2019-09-01T12:47:42+5:302019-09-01T12:47:56+5:30

रत्नागिरी - महाडजवळील वडपाले गावाजवळ एका एसटी बसला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या ...

रत्नागिरी - महाडजवळील वडपाले गावाजवळ एका एसटी बसला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. यामुळे कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा मोठा खोळंबा झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते माणगाव दरम्यान झालेली वाहतूक कोंडी मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत.