Next

थलपती विजयने स्वत:च्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला | Actor Thalapathy Vijay FIR Against parents

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:54 PM2021-09-21T13:54:19+5:302021-09-21T13:56:13+5:30

रजनीकांत राजकारणात येणार अशी चर्चा होती. मात्र अचानक रजनीकांत यांनी माघार घेतली. आणि अनेक लोक निराश झाले. आता रजनीकांतनंतर थलपती विजयने राजकारण यावं अशी अनेकांची मनोमन इच्छा आहे. साऊथचा सुपरस्टार म्हणून थलपती विजयला ओळखलं जातं. नुकतंच हीट झालेलं वाती कमिंग हे गाणं त्याचंच.. मास्टर आणि थेरी सारख्या चित्रपटांनी त्याला देशभरात प्रसिद्ध केलं. तामिळ चित्रपटात सध्या तो आघाडीचा अभिनेता आहे. त्याचे चित्रपट हे रजनीकांतच्या चित्रपटांनादेखील मागे टाकत बक्कळ कमाई करतात. त्यावरुन त्याचे चाहते किती असतील हे लक्षात येतं. पण याच चाहत्यांचा फायदा घेत विजयच्या कुटुंबियांनी मात्र राजकारण सुरु केलंय.