Next

अफवा पसरली आणि आमदारांची झोप उडाली | Bihar MLA Musafir Paswan Fake Death News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:33 AM2021-09-22T11:33:29+5:302021-09-22T11:34:04+5:30

एका अफेवेमुळे आमदार महोदयांची झोपच उडालीय.. हल्ली सोशल मीडियावर गोष्टी पटकन जोरदार व्हायरल होतात. घटना खरी आहे की खोटी हेही तपासलं जातं नाही. त्यातून अफवा पसरते. त्या अफेवेमुळे अनेकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो. अशीच एका आमदाराच्या मृत्यूची अफवा पसरल्याची घटना घडली. लोक त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली द्यायला लागले आणि जिवंत असलेल्या आमदारांची झोप उडाली. बिहारमधील बोचहांचे विद्यमान आमदार मुसाफिर पासवान यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाल्यानंतर त्यांनीच सत्य सांगतलं आहे. 'अरे मी अजून जिवंत आहे' असा खुलासा त्यांना सोशल मीडियाद्वारे करावा लागला आहे.