Next

मला नटसम्राट म्हणा, फरक पडत नाही...राऊत फडणवीसांना असं का म्हणाले? Fadnavis | Sanjay Raut Natsamrat

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:45 PM2022-01-21T15:45:13+5:302022-01-21T15:47:45+5:30

गोवा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रातल्या नेत्यांमुळे रंगत आलीय. म्हणजे बघा ना, देवेंद्र फडणवीस दररोज शरद पवार आणि संजय राऊतांवर हल्लोबोल करतात. पवारांना फडणवीस साडेतीन जिल्ह्याचे नेते म्हणाले तर संजय राऊतांना नटसम्राट करा अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली. आता फडणवीसांच्या टीकेला राऊतांनाही प्रत्युत्तर दिलंय. मला नटसम्राट म्हटलं तरी फरक पडत नाही असं म्हणत राऊतांनी फडणीसांवर हल्लाबोल केलाय. राऊत फडणवीसांना नेमकं काय म्हणाले, त्याआधी फडणवीस राऊतांना काय म्हणाले होते, फडणवीस अचानक इतके आक्रमक का झालेत यावरच बोलुयात पण त्याआधी बघुयात राऊतांनी नेमकं काय म्हटलंय...